अश्विनने मोडला कपिल देव यांचा खास विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय गोलंदाज


अश्विनने चरिथ असलंकाला विराट कोहलीकरवी झेलबाद करून ही कामगिरी केली.

मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कपिल देवचा विक्रम मोडला. अश्विन आता कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे. कपिल देव यांचा विक्रम मोडून त्याने हा पराक्रम केला. अश्विनने चरिथ असलंकाला विराट कोहलीकरवी झेलबाद करून ही कामगिरी केली. अश्विनने आता कसोटीत ४३५ विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८९, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५६, इंग्लंडविरुद्ध ८८, श्रीलंकेविरुद्ध ५५, न्यूझीलंडविरुद्ध ६६, बांगलादेशविरुद्ध १६, वेस्ट इंडिजविरुद्ध ६० आणि अफगाणिस्तानविरुद्ध ४३५ कसोटी बळी घेतले.

भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे यांच्यानंतर सर्वाधिक विकेट घेतल्या असून कपिल देव दुसऱ्या क्रमांकावर होते. पण आता अश्विन भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात तीन विकेट घेत कपिल देव यांचा विक्रम मोडला. कपिल देव यांच्या नावावर ४३४ कसोटी विकेट आहेत आणि अश्विनच्या नावावर ४३५ कसोटी विकेट आहेत.

हेही वाचा :  श्रद्धा वालकर हत्या, घटस्फोट... संसदेत 'लिव्ह-इन'वर बंदी घालण्याची मागणी, तुम्ही सहमत आहात का?

अनिल कुंबळेंनी भारताकडून ६१९ कसोटी बळी घेतले आहेत. भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत हरभजन सिंग चौथ्या क्रमांकावर आहे. भज्जीच्या खात्यात ४१७ कसोटी बळी आहेत. त्याचबरोबर इशांत शर्मा आणि झहीर खान दोघेही ३११ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहेत.

तर मुथय्या मुरलीधरनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम आहे. मुरलीधरनने ८०० कसोटी विकेट घेतल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाचा दिवंगत शेन वॉर्न ७०८ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आहे, ज्याने ६४० विकेट्स घेतल्या आहेत आणि अनिल कुंबळे हे ६१९ कसोटी बळींसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. श्रीलंकेचा पहिला डाव ६५ षटकांत १७४ धावांत आटोपला. अशा प्रकारे भारताने श्रीलंकेविरुद्ध ४०० धावांची आघाडी घेतली. त्याने श्रीलंकेला फॉलोऑन दिला आहे. तिसऱ्या दिवशी दोन सत्रे खेळली गेली. चहापानाच्या वेळी श्रीलंकेची दुसऱ्या डावाची धावसंख्या ३५ षटकांत ४ बाद १२० अशी आहे. अँजेलो मॅथ्यूजने २७ आणि चरित अस्लंकाने २० धावा केल्या आहेत. दोघांमध्ये १३ चेंडूत २६ धावांची भागीदारी झाली. अस्लंकाने जडेजाच्या एका षटकात २ षटकार आणि २ चौकार लगावले.

हेही वाचा :  फॉलोअर्स वाढवण्यासाठी रस्त्यावर रिव्हर्समध्ये पळवली कार; पण स्वप्नातही विचार केला नसेल असं घडलं



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक…; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News Today: अँटोप हिल परिसरात दोघा चिमुकल्यांचा कारमध्ये अकडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या …

RBI च्या कारवाईनंतर कोटक महिंद्राचे शेअर्स गडगडले; घ्यावेत का? एक्सपर्ट काय म्हणतात?

Kotak Bank Share Price: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. …