ऋजुता दिवेकरने सांगितल्या Weight Loss मध्ये होणाऱ्या हमखास ३ चुका, यामुळे इंचभरही हटणार नाही चरबी

प्रत्येक वर्षाचा पहिला महिना म्हणजे जानेवारी महिना हा आरोग्याच्या संकल्पांनी भरलेला असतो. अनेकजण या दिवसात स्वतःला फिटनेस राखण्याचं आश्वासन देतात. बहुतेक लोक चरबीपासून आपण कसे लांब राहू याचा प्रवास सुरू करतात. परंतु याबाबत कोणतीच पुरेशी माहिती न घेता डाएट सुरू केल्याने त्याचा उलटा परिणाम होतो. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्हाला हे समजले पाहिजे की, हा एक दिवसाचा किंवा आठवड्याचा प्रवास नाही. त्यामुळे, झटपट निकाल मिळविण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत तर नाहीत ना?

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये वजन कमी करण्याच्या टिप्स शेअर केल्या आहेत. ऋजुता कायमच नैसर्गिक पद्धतीने आरोग्य जपण्याचा सल्ला देते. या पोस्टमध्ये ऋजुतामेवजन कमी करण्याच्या प्रवासातील त्या 3 चुका सांगितल्या आहेत. ज्या सामान्यतः लोक वजन कमी करण्यासाठी आवश्यक समजून करतात. महत्वाची बाब म्हणजे यामुळे तुमची चरबी अगदी इंचभरही हलणार नाही. (फोटो सौजन्य – Rujuta Diwekar इंस्टाग्राम / iStock)

हेही वाचा :  Fact Check: कांद्याच्या रसाने टक्कल पडणे होते दूर? काय आहे सत्यता जाणून घ्या

वेट लॉसकरता या चुंकापासून सावध राहा

कार्ब्स फूड खाणे टाळा

कार्ब्स फूड खाणे टाळा

बर्‍याच लोकांना असे वाटते की, कार्बोहायड्रेट टाळल्याने वजन लवकर कमी होते. त्यामुळे घरी बनवलेले सामान्य पदार्थ जसे की रोटी-भात, इडली, उपमा, पोहे खाणे टाळा. पोषणतज्ञ ऋजुता मात्र या गोष्टी लगेच बंद करायला सांगितल्या आहेत. कारण अभ्यासानुसार, जर तुम्ही तुमच्या आहारातून कार्बोहायड्रेट पूर्णपणे काढून टाकले, तर तुम्ही दैनंदिन कामांकरता अजिबातच उत्साही नसाल. यासोबतच थकवा आणि आळसही अनुभवाल.

(वाचा – प्रजासत्ताक दिनाला भरभरून खाल्लेल्या जिलेबीचे Health Benefits जाणून घ्या, थंडीत खाल्ल्यावर अधिक लाभ)​

जास्त जेवण खाणे – बिंज ईटिंग डिसऑरर्डर

जास्त जेवण खाणे - बिंज ईटिंग डिसऑरर्डर

जास्त अन्न खाण्याच्या सवयीला Binge Eating Disorder असेही म्हणतात. हे बहुतेक अशा लोकांकरता आहे जे आपल्या स्वतःच्या आरोग्याचा फार विचार करत नाहीत. खास करून शरीराचे वजन किंवा स्वतःचे सौंदर्य. अशा परिस्थितीत, लठ्ठ लोक त्यांचे आवडते पदार्थ खाणं टाळतात. खूपवेळ उपाशी राहतात आणि कोणत्याही वेळी खूप जास्त अन्न खातात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही स्थिती आरोग्यावर खूप गंभीर परिणाम दर्शवते. जेव्हा भूक लागेल आणि दोन दोन तासांनी आहार हलका घेणे महत्वाचे असते.

हेही वाचा :  Maharashtra Weather : आभाळ फाटलं! मराठवाडा, नगर-नाशिकमध्ये गारपिटीचा तडाखा; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

​(वाचा – १०८ किलो वजन कमी केल्यानंतर पुन्हा वाढलं Anant Ambani चं वजन, आई नीता अंबानीने सांगितलं या आजाराचं कारण)​

आरोग्याची काळजी न घेता व्यायाम करणे

आरोग्याची काळजी न घेता व्यायाम करणे

निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. पण वजन कमी करणाऱ्या लोकांमध्ये याची क्रेझ आहे. यामुळे तो अकार्यक्षम व्यायाम करू लागतो. व्यायामाची आणि आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेऊन वजन कमी करणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप आणि आहार मिळत असेल तेव्हाच वर्कआउट्स योग्य प्रकारे काम करतात. म्हणून, जर तुम्ही रात्री थकले असाल किंवा आजारी असाल, तर 500 कॅलरीज बर्न केल्यानंतर किंवा दिवसातून 100 सूर्यनमस्कार पूर्ण केल्यानंतर धावू नका. असे केल्याने तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास कठीण होऊ शकतो.

​(वाचा – दारूमुळे Liver सडू लागल्याची ही सुरूवातीची ६ लक्षणे, किती प्रमाणानंतर दारू बनते विष)​

वेटलॉसकरता या गोष्टींची घ्या काळजी

वेटलॉसकरता या गोष्टींची घ्या काळजी

ऋजुता दिवेकर सांगतात की, जर तुमचे वजन कमी होत असेल तर चांगल्या परिणामांसाठी डाएटिंगऐवजी घरी बनवलेले सर्व प्रकारचे पदार्थ पुरेशा प्रमाणात खा. तसेच, शरीराची गरज आणि स्थिती लक्षात घेऊन व्यायाम करा.

हेही वाचा :  ऋजुता दिवेकरने सांगितल्या, वजन कमी करताना हमखास केल्या जाणाऱ्या ३ चुका

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …