Barsu Refinery: पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्रकल्प फक्त कोकणात का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर

Barsu Refinery: बारसूमध्ये रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्प आणण्यावरुन सध्या विरोधक राज्य सरकारला घेरत आहेत. पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्रकल्प फक्त कोकणात का आणले जात आहेत? अशी विचारणा विरोधक करत आहेत. यावर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उत्तर दिलं आहे. झी 24 तास तर्फे आयोजित ‘महाराष्ट्र इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’मध्ये उदय सामंत यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी बारसू रिफायनरीवर भूमिका मांडताना कोकणातील तरुणांना विचार करण्याचं आवाहन केलं. 

“नाणारमध्ये प्रकल्प रद्द झाल्याने बारसूमध्ये प्रकल्प नेण्यात आला. 22 जानेवारी 2022 ला एक पत्र केंद्र सरकार नव्हे तर पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांना लिहिण्यात आलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या पत्रात प्रकल्प महाराष्ट्रात आल्यास जीडीपी किती पटीने वाढेल, पर्यावरणाचा ऱ्हास करणारा प्रकल्प आहे की नाही. तेथील ओसाड जमिनी यावर भाष्य केलं होतं. पेट्रोकेमिकल प्रोडक्टचे टॅक्समुळे दर कमी होतील, यामुळे जगातील मोठा प्रकल्प महाराष्ट्रात यावा अशी विनंती करण्यात आली होती,” अशी माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. 

“मातीचं परीक्षण सुरु आहे. सर्व्हेक्षण सुरु आहे की माती परीक्षण यावरुन गोंधळ सुरु आहे. माती परीक्षण झाल्यानतंर कंपनी प्रकल्प आणायचा की नाही यासंबंधी निर्णय घेणार आहे. काहींनी कातळ शिल्पावरुन आरोप केले आहेत. पण आम्ही ते शेतकऱ्यांकडेच ठेवणार आहोत. याउलट आम्ही तिथे सुशोभीकरण करत पर्यटन सुरु करणार आहोत. त्यातून येणारा पैसा त्या शेतकऱ्यालाच मिळणार आहे,” असं उदय सामंत म्हणाले. बेरोजगारीवर मात करण्यासाठी मोठे प्रकल्प आणावलेच लागतील असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं. 

हेही वाचा :  स्मार्टफोन विकतांना जरा सांभाळूनच ! खरेदी करणारा सहज मिळवू शकतो तुमचे Deleted Photos, पाहा डिटेल्स

“सरकारने अद्याप भूसंपादन सुरु केलेलं नाही. पण या प्रकल्पासाठी 5000 एकर जमिनीची गरज 2900 एकर जमिनीचं संमतीपत्र मिळालं आहे. यावरुन काहीजण बाहेरचे असल्याचा आरोप आहे. तसं असलं तर त्यांची चौकशी होईल. पण असली तरी ही जमीन 1000 एकरपर्यंत असतील. स्थानिकांची संख्या जास्त आहे याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. लोकांमध्ये उगाच गैरसमज परसवला जात आहे,” असा आरोप उदय सामंत यांनी केला आहे. 

“आम्ही पत्रकार आणि स्थानिकांना जामनगरला घेऊन जाणार आहोत. हापूस आंब्याचं उत्पादन बंद होईल असा दावा केला जात आहे. मी घेतलेल्या माहितीनुसार जामनगरमध्ये 600 एकरवर आंब्याची लागवड होत असून त्याचा दर्जा उत्तम असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान येथे होणारी रिफायनरी 100 पटीने जास्त आधुनिक तंत्रज्ञान असणारी आहे,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. 

पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्रकल्प फक्त कोकणात का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर दिलं की, “मी पण कोकणातील आहे. हे प्रकल्प समुद्रकिनारी होणारे प्रकल्प आहेत. जिंदाल झाला तेव्हा माझा विरोध होता. त्यानंतर मी प्रेझेंटेशन घेतलं होतं. त्यांनी 3000 लोकांना रोजगार दिला आहे. बाजूला माझ्या मतदारसंघात फिनोलेक्सचा प्लांट आहे. पण ज्यावेळी तो झाला तेव्हा 800 लोकांना रोजगार मिळाला. बारसू ही काय माझी प्राथमिकता नाही. पण कोकणातील प्रत्येक तरुणाने विचार केला पाहिजे. कोकणातील तरुण चाकरी करण्यासाठी मुंबई, पुण्यात येतो. बंगळुरुत मला माझ्या जिल्ह्यातील 500 मुलं इमारतीला रंग मारताना भेटली. असे प्रकल्प झाले तर स्थानिक मुलं तिथंच राहतील आणि रोजगार निर्मिती होईल आणि कायापालट होईल”.

हेही वाचा :  "कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भांडी घासायला...," उद्धव ठाकरेंचा CM एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …

‘Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..’; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अ‍ॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा …