कायम तरूण व लहान दिसण्यासाठी ही 5 कामं करतो हा डॉक्टर, खरं वय ऐकून घसरेल पायाखालची जमीनच

Tips To Stay Young : कितीही रोखून ठेवा पण एक दिवस म्हातारपण येणारच आहे हे सर्वांनाच माहीत असते. वाढते वय ही अशी गोष्ट जी कोणीच रोखू शकत नाही. हे सगळे माहित असून सुद्धा सर्वांच्या मनात कायम तरूण, लहान आणि दीर्घायुषी राहण्याची छुपी इच्छा देखील असते. जर तुमची देखील अशी इच्छा असेल तर मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या की बाहेरील शरीर तुम्ही कितीही प्रयत्न करून तरूण ठेवू शकत नाही. मात्र शरीराच्या आतील अवयव नक्कीच पूर्णपणे तरूण आणि जिवंत ठेवता येतात.

अमेरिकन डॉक्टर मार्क हायमन याच तत्त्वावर काम करत आहेत आणि त्यांनी हा प्रयोग स्वत:वरच करून पाहिला आहे. आज वयाच्या 63 व्या वर्षीही ते खूप तंदरूस्त आणि निरोगी दिसतात. त्यांनी ‘यंग फॉरएव्हर’ नावाचे एक पुस्तक सुद्धा लिहिले आहे, ज्यामध्ये चिरतरूण राहण्याच्या अनेक टिप्स सांगण्यात आल्या आहेत. पण तरूण दिसण्यासाठी अमेरिकन डॉक्टर मार्क हायमन नेमकं करतात काय? हेच आंपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य :- Instagram/drmarkhyman)

हेही वाचा :  Jalna Crime : तिसऱ्या लग्नाच्या गोष्टीचा वर्षभरातच शेवट... पत्नीला ट्रॅक्टरखाली चिरडत पतीनं केला अपघाताच बनाव

वीगन डाएट

वीगन डाएट

डॉ. मार्क हायमन वीगन डाएट अर्थात शाकाहारी आहाराचे पालन करतात. ते फक्त तेच अन्न खातात जे फक्त झाडपाला आणि वनस्पतींपासून उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून बनवले जाते. या आहारात फायटोकेमिकल्सचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यामुळे वयानुसार आवश्यक पोषण योग्य प्रमाणात मिळते.
(वाचा :- टीबीने दरवर्षी 4.5 लाख लोकांचा मृत्यू, 1 रूग्ण 15 लोकांस करतो संक्रमित,टीबी मुळासकट उपटून टाकते ‘STOP’ टेक्निक)​

प्रोटीन शेक पिणे

प्रोटीन शेक पिणे

डॉ. मार्क हायमन फिट राहण्यासाठी व्यायामाकडे पूर्ण लक्ष देतात. ज्यासाठी त्यांना प्रोटीनचीही गरज असते. हे प्रोटीन मिळवण्यासाठी तो व्यायामाच्या 1 तास आधी प्रोटीन शेक घेतात.
(वाचा :- Protein Breakfast : वाढलेल्या वजनाचा काटा सर्रकन घसरेल खाली, हाडं होतील लोखंडासारखी टणक, खा हे 6 चविष्ट पदार्थ)​

हे व्यायाम करतात

हे व्यायाम करतात

तंदरूस्त आणि तरूण दिसण्यासाठी डॉ. मार्क हायमन आठवड्यातून 4 ते 5 दिवस व्यायाम करतात. यासाठी ते रेजिस्टेंस बँडचा वापर करतात, कारण यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो. सोबतच रोड बाइकिंग, माऊंटनन बाइकिंग, टेनिस, पोहण्याचा सरावही ते नित्यनियमाने करतात.

(वाचा :- शास्त्रज्ञांचा दावा, तुमच्या या चुकीमुळे झपाट्याने वाढतोय पोट व आतड्याचा कॅन्सर, ही 5 लक्षणं बेतू शकतात जीवावर)​

हेही वाचा :  10 मिनिटांचा वेळ काढून दिसू शकता तब्बल 16 वर्षे लहान व तरूण

शारीरक लवचिकतेसाठी करतात योग

शारीरक लवचिकतेसाठी करतात योग

वाढत्या वयानुसार शरीराच्या लवचिकतेकडेही लक्ष दिले पाहिजे. ज्यासाठी डॉ. मार्क हायमन हॉट योग आणि विन्यास योग करतात. यामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही सुधारते.

(वाचा :- पुरूषहो, या अवयवांत वेदना झाल्यास सावधान, लघवीच्या प्रेशरने रोज गाढ झोपेतून उठत असाल तर झालाय प्रोस्टेट कॅन्सर)​

झोप आहे गरजेची

झोप आहे गरजेची

डॉ. मार्क हायमन सांगतात की, आतून तरुण दिसण्यासाठी दररोज 7 ते 8 तासांची झोप घेणे गरजेचे आहे. डॉ. मार्क हायमन स्वत: रात्री 10 पर्यंत झोपतात आणि सकाळी 6 ते 7 वाजता उठतात. तसेच, ते झोपण्यापूर्वी मॅग्नेशियम घेण्यास विसरत नाही आणि खोलीत पूर्ण अंधार करूनच झोपतात.
(वाचा :- Piles Remedy: पोट साफ न होणं आणि भयंकर मूळव्याध 100% बरा करतात या 15 भाज्या, खेचून बाहेर फेकतात आतड्यांतील घाण)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पुणे अपघात प्रकरणात मद्यपान करताना अल्पवयीन आरोपीबरोबर तो आमदारपूत्र कोण? दडपण्याचा प्रयत्न’

Pune Accident Case : राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे …

15 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? CM अ‍ॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

Maharashtra News Today: सर्वसामान्यांना आता पावसाचे वेध लागले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होणार …