पोट साफ न होणं, भयंकर मुळव्याध 100% बरा करतात या 15 भाज्या,खेचून बाहेर फेकतात आतड्यातील घाण

Best Vegetables For Piles Treatment : मूळव्याध किंवा Piles ही एक सामान्य समस्या आहे ज्याचा अनेकांना त्रास होतो. जेवणामध्ये फायबरची कमतरता, बैठी जीवनशैली आणि कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचालींमध्ये समावेश न घेणे ही मूळव्याध होण्याची मुख्य कारणे आहेत. रोगाची सुरूवात Constipation अर्थात बद्धकोष्ठतेपासून होते. जेव्हा तुमचे पोट बद्धकोष्ठतेमुळे साफ होत नाही, तेव्हा ते मूळव्याधचे रूप धारण करते. जेव्हा मूळव्याध होतो तेव्हा गुदद्वाराच्या नसा सुजतात, त्यामुळे बाहेरील भागात फोड येतो आणि जर स्थिती अधिक गंभीर असेल तर रक्त देखील येऊ शकते, ज्याला रक्तस्त्राव होणारा मूळव्याध म्हणतात.

या स्थितीत, शौचाला गेल्यावर तीव्र वेदना आणि जळजळ जाणवू शकते. आता तुम्ही म्हणाल की अशा गंभीर समस्येवर नेमका उपचार काय आहे? तर मंडळी, मूळव्याधासाठी उपलब्ध असणाऱ्या औषधांमध्ये अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. काही प्रकरणांमध्ये, शस्त्रक्रिया देखील आवश्यक असू शकते. जर तुम्हाला औषध किंवा शस्त्रक्रियेशिवाय मूळव्याधापासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही आधी तुमच्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. अशा काही भाज्या आहेत ज्यात फायबरचे प्रमाण चांगले असते, त्यांचे सेवन केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता आणि मूळव्याधाच्या लक्षणांपासून आराम मिळू शकतो. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  बारीक कंबर हवी असेल तर वापरा श्रद्धा कपूरच्या या फिटनेस ट्रिक्स

फ्लॉवरच्या गटातील भाज्या

फ्लॉवरच्या गटातील भाज्या

तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोली, फ्लॉवर, केले आणि फ्लॉवर यांसारख्या भाज्यांचा समावेश करावा. NCBI च्या अभ्यासानुसार, या भाज्यांमध्ये केवळ फायबरचे प्रमाणच जास्त नाही तर त्यामध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म देखील आहेत. उदाहरणार्थ, एक कप (76 ग्रॅम) ब्रोकोलीमध्ये सुमारे 2 ग्रॅम फायबर असते.

(वाचा :- How Remove Belly Fat या एका उपायाने वाफ बनून उडून जाते पोट आणि मांड्यांवरची चरबी, लटकणारं पोट होतं कायमचं सपाट)​

कंदमुळे

कंदमुळे

मुळव्याध असणाऱ्या रुग्णांनी मुळा, शलजम, रताळ, बीटरूट आणि गाजर यांसारख्या कंदमूळ प्रकारातील भाज्या खाव्यात. या भाज्या फायबरने परिपूर्ण असतात. आपल्याला प्रत्येक भाजीतून सुमारे 3-5 ग्रॅम फायबर मिळते.
(वाचा :- Diabetes Yoga : डायबिटीजच्या औषधांपासून कायमची मुक्ती देतात हे 5 उपाय, स्वत: एक्सपर्ट्सनी दिली योग्य माहिती..!)​

शिमला मिरची

शिमला मिरची

शिमला मिरची मूळव्याधअसणाऱ्या रुग्णांसाठी एक उत्तम उपाय आहे. प्रत्येक कप (92 ग्रॅम) चिरलेल्या शिमला मिरचीमध्ये सुमारे 2 ग्रॅम फायबर असते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या भाजीमध्ये 93% पाणी असते, जे मूळव्याधीने त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक आहे.
(वाचा :- ​Potato side effect सावधान, डॉक्टर म्हणतात या पद्धतीने बटाटा खाणा-याच्या नसा होतात नष्ट आणि शरीरभर पसरतो कॅन्सर)​

हेही वाचा :  Bleeding Piles : मुळव्याध झालाय? मग औषधं व सर्जरी सोडा, घरच्या घरी करा या 5 उपायांनी मिळवा मुक्ती..!

ओव्याचे झाड

ओव्याचे झाड

शिमला मिरचीप्रमाणेच अजमोद किंवा ओव्याची पानांमध्ये देखील भरपूर प्रमाणात पाणी तसेच फायबर असते. हे शौच, मल किंवा स्टुल मऊ करते आणि शौचाला बसलेलं असताना पोट साफ होत नसल्याने जाणवणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी मदत करते. अजमोद, ओव्याच्या या एका मोठ्या देठात सुमारे 1 ग्रॅम फायबर आणि 95% पाणी असते. तुम्ही ते तुमच्या सॅलड्स, सूप किंवा स्टॉजमध्ये घालून खाऊ शकता.
(वाचा :- शास्त्रज्ञांचा दावा, नसांत साचलेलं घाण विषारी कोलेस्ट्रॉल झटक्यात बाहेर फेकतो कांदा, फक्त या पद्धतीने करा वापर)​

काकडी आहे बेस्ट

काकडी आहे बेस्ट

उन्हाळ्यात डिहायड्रेशन आणि पोटाच्या समस्या टाळण्यासाठी काकडीचे अधिक सेवन करावे. मूळव्याध असणाऱ्या रुग्णांसाठी काकडी अतिशय उत्तम फूड आहे. शिमला मिरची आणि अजमोदप्रमाणेच काकडीमध्येही फायबर आणि पाणी चांगले असते. काकडीची साल कधीही काढू नये हे लक्षात ठेवा
(वाचा :- शास्त्रज्ञांचा सल्ला – जेवणाआधी खा फक्त इतके बदाम, रक्तातील साखर कधीच वाढणार नाही, कायमचा टळेल डायबिटीजचा धोका)​

बटाटे आणि टोमॅटो

बटाटे आणि टोमॅटो

USDA च्या मते, साल असणाऱ्या मध्यम भाजलेल्या बटाट्यामध्ये 2.1 ग्रॅम फायबर असते. बटाट्यामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. इतर भाज्यांपेक्षा बटाट्याचा प्रभाव जास्त असतो. त्याचप्रमाणे, टोमॅटोमध्ये फायबर आणि पाणी देखील मुबलक प्रमाणात असते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे मल जाणे सोपे होते.
(वाचा :- पाण्याला विष बनवतात या 11 गोष्टी, शरीराचा एक एक अवयव होतो कायमचा बाद,पिण्याआधी न चुकता करा CDCच्या या 5 गोष्टी)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  Food For Constipation : जुन्यातील जुना बद्धकोष्ठतेचा समूळ नाश करतील हे ६ पदार्थ, आतड्यांमधली घाण काढून टाकतील

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मोठी बातमी! भाजपाचे शिंदे ठाकरे गटात; अंबादास दानवे म्हणाले, ‘महिनाभरात भाजपाचे किती लोक…’

लोकसभा निवडणूक निकालानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. यादरम्यान …

…मग मला मराठेच का त्रास देत आहेत? मराठा आमदारांना आवाहन करताना जरांगे भावुक

Manoj Jarange Patil Emotional Appeal: मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे मराठा आमदारांना साद घालताना …