RRRस्टार राम चरणच्या घड्याळाची किंमत कोटींच्या घरात, लक्झरी लाइफस्टाइल पाहून डोळे विस्फारतील,

राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटातून जगभरातून आपल्या अभिनयाचा डंका गाजवणारा अभिनेता म्हणजे राम चरण. मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा राम चरण आज त्याच्या अभिनयाच्या जोरावर मेहनतीने आपले स्थान मिळवले आहे. आज आपल्या अभिनयाने तो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. आज राम चरणच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या लक्झरी लाइफबद्दल जाणून घेऊयात. साऊथच्या या सुपरस्टारकडे करोडोंची प्रॉपर्टी तर आहेच, पण घड्याळांपासून ते कारपर्यंतची किंमतही करोडोंमध्ये आहे. (फोटो सौजन्य – Instagram @alwaysramcharan)

कलेक्शनमधील स्वस्त घड्याळ देखील लाखाच्या घरात

कलेक्शनमधील स्वस्त घड्याळ देखील लाखाच्या घरात

राम चरण याच्याकडे सर्वात कमी किमतीचे घड्याळ देखील लाखांचे आहे. Rolex Yacht Master ll हे घड्याळ असून ते अतिशय लोकप्रिय ब्रँड चे आहे. पण इतर घड्याळांच्या तुलनेत त्याचे घड्याळ सर्वात स्वस्त आहे, या घडाळ्याची किंमत १३ लाख रुपये आहे. हे 18 कॅरेट सोन्यापासून बनवले गेले आहे.

राम चरणाचे घड्याळ कोटींचे आहे

राम चरणाचे घड्याळ कोटींचे आहे

अहवालानुसार राम चरणची एकूण संपत्ती सुमारे १३०० कोटी रुपये आहे. ज्यामध्ये आलिशान बंगले, कार, महागडी घड्याळे आणि कपड्यांपासून काही कंपन्यांचाही समावेश आहे. घड्याळांबद्दल बोलायचे झाले तर, राम चरण यांना घडाळे खूप आवडतात. त्यांच्याकडे जवळपास ३० घड्याळांचा संग्रह आहे. ज्यामध्ये रिचर्ड मिल ब्रँडचे RM 61-01 योहान ब्लेक आहे, ज्याची किंमत सुमारे 30 मिलीयन आहे.

हेही वाचा :  ज्युनियर एनटीआर-रामचरणच्या जोडीने प्रेक्षकांवर केली जादू! RRRचे IMDb रेटिंग पाहिलेत?

रिचर्ड मिल ब्रँड आवडता आहे

रिचर्ड मिल ब्रँड आवडता आहे

राम चरण यांच्याकडे रिचर्ड मिल ब्रँडचे घड्याळ आहे, जे त्याच्या विशिष्ट डिझाइनसाठी ओळखले जाते. या ब्रँडची घड्याळे खूप महाग असतात. Richard Mille RM029 ची किंमत सुमारे 85 लाख रुपये आहे.

राम चरणाला घड्याळांची आवड आहे

राम चरणाला घड्याळांची आवड आहे

राम चरण यांच्या संग्रहात Patek Philippe Nautilus घड्याळ देखील समावेश आहे. अनेक सेलिब्रिटींना या ब्रँडचे घड्याळ घालायला आवडते. रोझ गोल्ड एडिशन हे अभिनेत्याने घेतलेले मॉडेल आहे ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे. या घड्याळाची किंमत सुमारे 1.25 कोटी असेल.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने …