या जोडप्याने पब्लिक प्लेसमध्ये असं काहीतरी केलं की लोकांनी धरून मारलं, भयंकर कारण आलं समोर

ही गोष्ट 2018 सालची आहे, जेव्हा कोलकाता येथील डमडम मेट्रो स्टेशनवर खुलेआम प्रेम व्यक्त करताना एकमेकांना मिठी मारणाऱ्या जोडप्याला लोकांनी मारहाण केली होती. या घटनेचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर इतके व्हायरल झाले की संतप्त लोकांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी करत मेट्रो स्टेशनबाहेर निदर्शने केली. अशा प्रकरणांमध्ये आरोपींना काही दिवस शिक्षा होत असली, तरी ज्यांच्यासोबत हा छळ झाला त्याचं काय? एकमेकांच्या शेजारी उभे राहणे हे ‘अश्लील कृत्य’ आहे का? समजा ते जोडप्याऐवजी भाऊ-बहीण किंवा मित्र असतील तर?

अशावेळी त्यांच्यावर आक्षेप घेणारे आपण चुकीचे नाही का ठरत? बरं, ही काही पहिलीच वेळ नाही. आजकाल अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत, जिथे प्रेमविरोधी पथके कपल्सना PDA च्या विरोधात धमकावत असतात. काही लोक अशी दादागिरी योग्य मानत नाहीत. तर काहींच्या मते थोडा तरी धाक तरूण पिढीच्या मनात असणे चांगले असते. या संदर्भात आम्ही काही वयस्कर स्त्री पुरुषांशी बोललो आणि मतं जाणून घेतली. त्यांनी PDA का आवडत नाही हे सांगितले. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  माझी कहाणी : माझ्या चुलत भावच्या पत्नीच्या डोळ्यात मी खुपतेय, कारण ऐकून हादरुन जाल

माझ्या नवऱ्याने असे कधीच नाही केले

माझ्या नवऱ्याने असे कधीच नाही केले

मी देखील पब्लीकली माझे प्रेम व्यक्त करणारी स्त्री होते. पण लग्नानंतर आता या सगळ्या गोष्टी मला सहन होत नाहीत. जेव्हा मी सार्वजनिकरित्या जोडप्यांना चुंबन घेताना किंवा हात धरताना पाहते तेव्हा मला त्यांचा हेवा वाटतो. मी इतरांसमोर ही गोष्ट कधीच कबूल करू शकत नाही. मात्र माझे पती अशा पद्धतीने माझ्याबाबत प्रेम व्यक्त करत नाहीत आणि म्हणूनच मला या गोष्टींचा तिरस्कार वाटतो.

(वाचा :- लग्नानंतरही विसरता येत नाहीयेत जुन्या प्रेमातील रोमॅंटिक आठवणी? असे व्हा ब्रेकअपच्या दु:खातून कायमचे मुव्ह ऑन)​

ही वाईट गोष्ट आहे

ही वाईट गोष्ट आहे

मी पूर्णपणे PDA च्या विरोधात आहे. मला वाटते की ही गोष्ट आदरार्थी नाही. अशा गोष्टी कोणासाठीही उघड्या डोळ्यांनी पाहणं सोपं नक्कीच नाही आणि कोणालाही ते पाहताना लाजिरवाणंच वाटेल. भले कपल्सना लाज वाटत नसेल तरी इतरांना वाटणारच. विचार करा की एखादी वृद्ध व्यक्ती हे सर्व पाहत असेल तर तिच्यासाठी ही गोष्ट किती लाजिरवाणी गोष्ट आहे. पण आजची मुलं निर्लज्ज आहेत, तुमचा विचार कोण करतंय याची त्यांना पर्वा नाही.

(वाचा :- प्रेमाचा जुगार खेळण्याआधी जाणून घ्या तुमचा पार्टनर स्वार्थी तर नाही ना? हे 5 संकेत आहेत Selfish लोकांची निशाणी)​

हेही वाचा :  किम जोंग लठ्ठ लोकांना करणार बारीक, निश्चयावर ठाम... प्यायला दिले 'हे' पेय

माझे मनोरंजन होते

माझे मनोरंजन होते

PDA माझ्यासाठी एक मनोरंजनाची गोष्ट आहे. कोण काय करतंय हे पाहायला मला आवडतं आणि जर कोणी सार्वजनिकरित्या अश्लील चाळे करत असेल तर मी बिनधास्त त्यांच्याकडे पाहतो. त्यांना जर त्यात काही लाज वाटत नसेल तर आपल्याला का वाटावी? आपण फक्त मज्जा बघायची. कोणालाही समजवायला जायचे नाही. शेवटी हे आयुष्य त्यांचे आहे.

(वाचा :- 40 वर्षांच्या संसारात शबाना आझमी-जावेद अख्तरमध्ये आजवर कधीच झाली नाहीत भांडणं, या एका मॅजिक ट्रिकचीच सर्व कमाल)​

मला अनकम्फर्टेबल वाटते

मला अनकम्फर्टेबल वाटते

मला PDA बाबत नेहमीच अनकम्फर्टेबल वाटते. म्हणजे हे सगळे करणाऱ्या जोडप्यांना अनकम्फटेर्बल वाटत नाही पण मला मात्र या गोष्टी पाहवतच नाहीत. जोडप्यांना सार्वजनिक ठिकाणी एकमेकांचा हात पकडणे, मिठी मारणे, चुंबन घेणे आवडते. पण माझ्या मते हा सगळा दिखावा आहे. या सर्व खाजगी गोष्टी आहेत, ज्या बंद दाराच्या आड केल्या पाहिजेत. ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा लोकांना तुम्ही तुमचे प्रेम का दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. अशा प्रकरणांमध्ये मर्यादा असावी. ज्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे.

(वाचा :- गडगंज श्रीमंत घराण्याची सून तर झाली, पण नवऱ्याने जे केलं ते ऐकून हादराल, यासाठी जबाबदार ठरले सासरचे कुटुंबच)​

हेही वाचा :  Onion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!

आपण दुसऱ्यांचे आयुष्य ठरवू शकत नाही

आपण दुसऱ्यांचे आयुष्य ठरवू शकत नाही

मला वाटते की PDA हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग आहे. कोणी काय करावे हे आपण ठरवू शकत नाही. भारतात व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि कोणीही व्यक्ती त्याला जसं हवं तसं जगू शकतो. त्यामुळे मुळात आपल्याला त्यांना अडवण्याचा अधिकार नाही. हो, थोडी मर्यादा नक्कीच पाळली गेली पाहिजे. कारण हा भारत आहे आणि आपली संस्कृती, विचारसरणी थोडी वेगळी आहे. पण हो ही गोष्ट ज्याची त्याला समजली पाहिजे.

(वाचा :- लव्ह मॅरेज करून सासरी आले अन् एक दिवस अचानक नव-याच्या रूममध्ये असं काहीतरी सापडलं जे पाहून काळजात चर्रर्र झालं..!)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …