कसूरी मेथी बनवा घऱच्या घरी, सोपी पद्धत

Kasuri Methi: सुकी मेथी आणि त्याचा दरवळणारा सुगंंध तसंच खाण्यात मिक्स केल्यानंतर वाढणारी चव हे वर्णन ऐकूनच तोंडाला पाणी सुटते. अनेक पौष्टिक तत्वांनी युक्त असणारी कसूरी मेथी आपण जेवणात वापरत असतो. बटाट्याची भाजी असो अथवा कढी, वाग्यांचे भरीत असो कसूरी मेथीमुळे स्वाद दुप्पट वाढतो.

How To Make Kasuri Methi At Home: तसं तर बाजारात अगदी सहजपणाने कसूरी मेथी मिळते. मात्र घरी तयार करण्यात आलेल्या कसूरी मेथी अधिक काळ टिकते आणि व्यवस्थित स्टोअर केल्यास तुम्हाला त्याचा फायदाही मिळतो. घरच्या घरी ही कसूरी मेथी कशी तयार कराल जाणून घ्या. आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरण्यात येणाऱ्या या मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स, विटामिन्स आणि लोह असतात. मेथी दाण्यानेच नाही तर मेथी भाजी, मेथी तेल सर्वाचाच शरीराला फायदा होतो. जाणून घ्या रेसिपी (फोटो सौजन्य – Freepik.com)

मेथी व्यवस्थित धुवा

मेथी व्यवस्थित धुवा

सर्वात पहिले बाजारातून आणलेली मेथी ३-४ वेळा स्वच्छ पाण्याने धुवा. मेथीच्या पानातील माती निघून जात नाही तोपर्यंत व्यवस्थित धुऊन घ्या. माती पूर्ण निघून गेल्यानंतर चाळणीत पसरवून ठेवा आणि पाणी निथळू द्या.

हेही वाचा :  Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

उघड्या भांड्यात ठेवा

उघड्या भांड्यात ठेवा

मेथीची धुतलेली पाने तुम्ही झाकून ठेऊ नका तर त्यातील पाणी चाळणीतून निथळल्यावर एखाद्या उघड्या भांड्यात अथवा पातेलीत ठेवा. उरलेसुरलेले पाणीही सुकून जावे यासाठी थोडावेळ तशीच ठेवा. तुम्हाला हवं असल्यास, पंखा चालू करून त्याखाली सुकवूदेखील शकता. यामुळे पाने लवकर सुकतील.

(वाचा – दही आंबट झालंय तर फेकू नका, या पदार्थांमध्ये करा उपयोग आणि बनवा अधिक चविष्ट)

मेथी सुकवा

मेथी सुकवा

घराच्या बाल्कनीमध्ये कॉटनचा कपडा पसरवा आणि त्यावर मेथीची धुतलेली पाने वाळत घाला. दुपारी एकदा उन्हात ठेवा आणि रात्री हे मलमलच्या कापडात गुंडाळून तसंच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उन्हात ठेवा. जर ऊन येत नसेल तर साधारण ४-५ मिनिट्स मायक्रोवेव्हमध्ये ठेवा.

(वाचा – अण्णाच्या स्टॉलसारखा मऊ उपमा बनवायचा असेल तर वापरा सोप्या टिप्स, कधीच होणार नाही फडफडीत )

कसूरी मेथी कशी साठवाल?

कसूरी मेथी कशी साठवाल?

२-३ वेळा उन्हात सुकवल्यावर कसूरी मेथी तयार होते. पानाचा रंग पूर्ण बदलतो. मेथीची पाने हातात घेतल्यावर कुस्करली जात असतील तर कसूरी मेथी तयार झाल्याचे समजावे. ही मेथी आता साठवण्यास तयार आहे. जेव्हा मेथी पूर्ण सुकते तेव्हा एका एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही भरून ठेवा. याची चव आणि सुगंध बराच काळ टिकतो.

हेही वाचा :  Cake making : ग्लुटनफ्री, एगलेस पण बेसनाचे कप केक घरी नक्की बनवून पाहा

(वाचा – ​घरात दही लावल्यावर पाणी सुटतंय का? घट्ट आणि गोड दही बनविण्याच्या सोप्या ट्रिक्स)

कसूरी मेथीचा वापर कशात करावा?

कसूरी मेथीचा वापर कशात करावा?
  • अनेक पंजाबी भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये कसूरी मेथीचा वापर करता येतो. तर बटाट्याच्या भाजीतदेखील तुम्ही याचा वापर करू शकता. जिरे, कांदा, टॉमेटोची फोडणी घालून तुम्ही त्यात बटाट्याचे तुकडे मिक्स करा आणि त्यावर कसूरी मेथी मिक्स करा. याची चव अप्रतिम लागते
  • पराठ्यातदेखील तुम्ही कसूरी मेथी घातल्यास, स्वाद अधिक येतो. उरलेली बटाट्याची भाजी अथवा आमटी, बेसन पराठे करणार असाल तर त्यात कसूरी मेथी कुस्करून घाला. याचा स्वाद अधिक चांगला लागतो
  • कढीची चव यामुळे वाढते. ताकाची कढी केल्यास, मेथीच्या दाण्याऐवजी तुम्ही कसूरी मेथीचाही वापर करू शकता. याशिवाय भजीमध्येही याचा वापर करता येतो

कसूरी मेथी घरी बनवणे अत्यंत सोपे आहे. तुम्हालाही बाजारातून आणायची नसेल आणि घरात जेवणाचा स्वाद वाढवायचा असेल तर तुम्ही ही सोपी पद्धत नक्कीच ट्राय करून पाहा!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत …