प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग का होते? या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास, गर्भपाताचा होऊ शकतो त्रास

बाळ कन्सिव्ह झाल्यापासून प्रेग्नन्सीचा प्रत्येक दिवस प्रत्येक महिलेसाठी वेगळा आणि नाजूक असतो. या दरम्यान महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्या बदलांकडे आणि लक्षणांकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. अशावेळी लहानात लहान चूकही आई आणि बाळासाठी त्रासदायक ठरू शकते. यापैकीच एक म्हणजे प्रेग्नन्सीदरम्यान होणारे ब्लिडिंग.

गरोदरपणात रक्तस्राव होत असेल तर ही गोष्ट किती नॉर्मल अथवा कॉमन आहे अथवा याचा नक्की काय परिणाम होऊ शकतो याबाबत बंगलोरमधील बनेरघट्टा रोडवरील फोर्टिज हॉस्पिटलच्या गायनॉकॉलिस्ट विभागाच्या वरीष्ठ सल्लागार डॉ. गायत्री डी. कामथ यांच्याकडून आम्ही जाणून घेतले. (फोटो सौजन्य – iStock)

प्रेग्नन्सीदरम्यान ब्लिडिंग होते म्हणजे काय?

प्रेग्नन्सीदरम्यान ब्लिडिंग होते म्हणजे काय?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, गरोदरपणात रक्तस्राव होत असेल तर याची लक्षणे तुम्ही ओळखावी आणि याकडे दुर्लक्ष करू नये. गर्भवती महिलांना कोणत्याही महिन्यात हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्वरीत आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. योनीमार्गातून रक्तस्राव होऊ लागतो आणि हे आई आणि बाळासाठी योग्य नाही. त्यामुळे कोणत्याही महिन्यात हा त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे.

हेही वाचा :  लॅब टेस्टसाठी जाताय? मग या गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यकच आहे, करू नका वेंधळेपणा जीवावर बेतेल

प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग होण्याचे कारण

प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग होण्याचे कारण

डॉक्टर गायत्री यांनी सांगितले की, पहिल्या तीन महिन्यात महिलांमध्ये Implantation अथवा Miscarriage च्या धोक्यामुळे ब्लिडिंग होऊ शकते. गर्भपाताचा धोका असल्यास बेडरेस्ट घेऊन हा धोका टाळला जाऊ शकतो.

गर्भात शिशुची अवस्था पाहण्यासाठी अल्ट्रासाऊंडचा आधार घेऊन पाहतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत मात्र ब्लिडिंग होणे ही सामान्य गोष्ट नाही. त्यामुळे लगेच डॉक्टरांना भेटावे. डिलिव्हरीच्या तारखेजवळ ब्लिडिंग झाल्यास मात्र बाळ बाहेर येण्याचे संकेत असू शकतात.

(वाचा – एडिमामुळे प्रेग्नन्सीमध्ये स्तन आणि हातांवर येऊ शकते सूज, एडिमा म्हणजे नेमके काय)

पहिल्या ३ महिन्यात ब्लिडिंग होणे

पहिल्या ३ महिन्यात ब्लिडिंग होणे

Bleeding During 1st Trimester: Mayo Clinic अनुसार एक्टोपिक प्रेग्नन्सी (ज्यामध्ये अंडे गर्भाशयाच्या बाहेर वाढते), इम्लांटेशन ब्लिडिंग (गर्भधारणा झाल्यावर १० ते १४ दिवसानंतर होते, जेव्हा अंडाणु गर्भाशयात प्रत्यारोपित होते), गर्भपात (२० व्या आठवड्याच्या आधीच गर्भावस्था संपणे), मोलर प्रेग्नन्सी (ही एक दुर्लभ घटना असून यात बाळाऐवजी असामान्य पेशी विकसित होतात) आणि गर्भाशय नाळेची समस्या अर्थात सूज येणे अथवा नाळेची वृद्धी झाल्याने पहिल्या तीन महिन्यात ब्लिडिंग होऊ शकते.

(वाचा – ​गरोदरपणादरम्यान ग्लुकोजची पातळी तपासणे ठरते महत्त्वाचे, अन्यथा जन्मतःच बाळ मृत होण्याची शक्यता)

हेही वाचा :  बद्धकोष्ठचा त्रास रोज छळतोय? हे फळ देईल आराम

दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील ब्लिडिंग

दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील ब्लिडिंग

Bleeding During 2nd and 3rd Trimester: दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाही दरम्यान योनीतून रक्तस्रावाचे कारण म्हणजे इंपिटंट गर्भाशय ग्रीवा (वेळेआधीच गर्भाशय उघडणे, ज्यामुळे वेळेआधी बाळाचा जन्म होऊ शकतो), गर्भपात अथवा पोटातच गर्भाचा मृत्यू, प्लेसेंटल अबॉर्शन – जेव्हा बाळाला पोषक तत्व आणि ऑक्सिजन पूर्णतः मिळत नाही अशी अवस्था, प्लेसेंटा प्रिव्हिया (प्लेसेंटा गर्भाशय ग्रीव्हा कव्हर रकते आणि त्यामुळे गर्भावस्थेत गंभीर स्वरूपात रक्तस्राव होतो), वेळेआधी प्रसूती – यामध्ये हलका रक्तस्राव होतो.

या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्रेग्नेन्सीदरम्यान होणाऱ्या ब्लिडिंगकडे महिलांनी लक्ष ठेवावे आणि अजिबात धोका पत्करू नये.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …