मेंदूच्या नसा सुकवते ओमेगाची कमतरता, ब्रेन डेड होण्याआधी दिसतात ही 5 लक्षणं, खा हे 15 पदार्थ

Symptoms of Omega-3 Deficiency : निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि लोह यासारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड देखील आवश्यक आहेत. हे पोषक तत्व शरीरालाच नव्हे तर मनालाही तंदुरुस्त ठेवते. हे एक पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आहे, जे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी, शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि मेंदू आणि मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी कार्य करते. शरीरातील ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळे विचारशक्ती कमी होणे, मनःस्थिती बिघडणे, नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक समस्या, हृदयविकार, त्वचाविकार आणि केसांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड हे मेंदू आणि बाळाच्या शारीरिक विकासासाठीही महत्त्वाचे असतात. मानवी शरीरात ओमेगा-3 अ‍ॅसिड (Omega-3 Fatty Acids) तयार होत नाही, त्यामुळे अशा गोष्टींचे सेवन करणे आवश्यक आहे ज्यामध्ये हे पोषक घटक आढळतात. सॅल्मन आणि सार्डिन, फ्लेक्स सीड्स, चिया सीड्स, अक्रोड आणि सोयाबीन यांसारख्या माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आढळते. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  सप्लिमेंट्सचा शरीराच्या अवयवांवर होतो दुष्परिणाम? खरंच Supplements गरज आहे का

लक्ष केंद्रित करण्यास समस्या

लक्ष केंद्रित करण्यास समस्या

जर तुमचे लक्ष सहज विचलित होत असेल आणि तुम्हाला कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जात असेल, तर तुमच्या शरीरात ओमेगा-3 ची कमतरता असल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे, कारण मेंदूच्या कार्यासाठी हे पोषक तत्व अत्यंत महत्त्वाचे आहे.
(वाचा ;- Weight Loss स्वत: शोधून काढली ट्रिक अन् मेणासारखी वितळून पातळ झाली पोटावरची चरबी, घरच्या घरी केले 22 किलो कमी)

मूड स्विंग्स

मूड स्विंग्स

मेंदूचे कार्य सुधारण्यात ओमेगा-3 फॅटी ऍसिडचा मोठा वाटा असतो. जेव्हा शरीरात या पोषक तत्वाची कमतरता असते तेव्हा विचारशक्ती कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे यासह अनेक न्यूरोलॉजिकल विकार उद्भवू शकतात.
(वाचा :- High Uric Acid: औषधं व डॉक्टशिवाय युरिक अ‍ॅसिडचं पार पाणी पाणी करतात हे 3 उपाय, गुडघेदुखी व मुतखडा होईल छुमंतर)​

थकवा आणि झोप न येणे

थकवा आणि झोप न येणे

तुम्हाला नेहमी थकवा जाणवतो का? तुम्हाला रात्री झोप लागण्यात अडथळा येतो का? युनिव्हर्सिटी हेल्थ न्यूजच्या रिपोर्टनुसार, जर असे होत असेल तर शरीरात ओमेगा-3 ची कमतरता असणे हे त्याचे प्रमुख कारण असू शकते. यासाठी तुम्ही आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवे.

हेही वाचा :  कपाळ फोडून घेऊ का? सकाळपासून मरमर काम करतो अन्... अजित पवार शिक्षकांवर वैतागले

(वाचा :- बापरे, मुंबईवर H3N2 Virus ची सावली, सर्दी, खोकला, तापाला घेऊ नका हलक्यात, डॉक्टरांचे हे 6 उपायच वाचवू शकतात जीव)​

त्वचा, केस आणि नखांची समस्या

त्वचा, केस आणि नखांची समस्या

त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी ओमेगा-3 हे पोषक तत्व खूप महत्वाचे आहे. ओमेगा-3 फॅटी ऍसिडच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी पडते, त्वचेवर सुरकुत्या पडतात आणि केस देखील काम चपळ त्वचा आणि केस कमकुवत होऊ शकतात.
(वाचा :- Reduce Blood Sugar : इन्सुलिनने खचाखच भरली आहेत आंब्याची पानं, असा करा वापर, गोड खाऊनही होणारच नाही डायबिटीज)​

वारंवार लघुशंका होणे

वारंवार लघुशंका होणे

ओमेगा-3 च्या कमतरतेमुळे तुमच्या तोंडात कोरडेपणा येऊ शकतो किंवा तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता. याशिवाय, जर तुम्हाला वारंवार लघवी करण्याची तीव्र इच्छा होत असेल, तर हे लक्षण तुमच्या शरीरात ओमेगा-3 या पोषक तत्वांची कमतरता असल्याचे लक्षण आहे.

(वाचा :- Colorectal Cancer Signs : टॉयलेटमध्ये दिसली ही 6 भयंकर लक्षणं तर सावधान, आतडी अक्षरश: पिळवटून टाकतो हा कॅन्सर)​

रोज किती प्रमाणाची गरज आहे?

रोज किती प्रमाणाची गरज आहे?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, मुलांना 1 ग्रॅम ते 1.1 ग्रॅम, पुरुषांना 1.6 ग्रॅम आणि महिलांना 1.1 ग्रॅम, तर गर्भवती महिलांना दररोज 1.4 ग्रॅम ओमेगा -3 फॅटी ऍसिडची दरोरोज आवश्यकता असते.

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले फुलपाखरू शोधून दाखवा

(वाचा :- Rapper Badshah Weight Loss रॅपर-गायक बादशाहला या 4 समस्यांमुळे करावं लागलं वेटलॉस, या आजारात थांबतो थेट श्वासच)​

कोणत्या पदार्थात आढळते सर्वाधिक ओमेगा-3

-3

सीफूड जसे की सॅल्मन, मॅकेरल, ट्यूना, हेरिंग आणि सार्डिन यांसारखे फॅटी मासे, नट्स आणि बिया जसे की फ्लेक्ससीड, चिया बियाणे आणि अक्रोड, व्हेजिटेबल ऑईल जसे की फ्लेक्ससीड तेल, सोयाबीन तेल आणि कॅनोला तेल आणि फोर्टिफाइड पदार्थ जसे अंडी, दही, ज्यूस, दूध, सोया पेये यांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा-3 आढळते.
(वाचा :- H3N2 Virus चिंता वाढली, करोनानंतर एच3एन2 व्हायरसचं थैमान सुरू,झाला 1 मृत्यू, मरण्याआधी दिसली ही 3 भयंकर लक्षणं)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मी नार्को टेस्टला तयार आहे, पण मी क्लिअर निघालो तर… अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना ओपन चॅलेंज

Ajit Pawar vs Anjali Damania:  पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री …

पुणे अपघात प्रकरणात पोराला वाचवण्यासाठी बापाचे प्रताप, 2 तासांमध्ये डॉ. तावरेला 14 कॉल्स

Pune Porsche Accident : 19 मे 2024… पुण्याच्या कल्याणीनगर भागात पोर्श कार दोघांना चिरडते. या …