महावितरणमध्ये विविध पदांची भरती, चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी

Mahavitaran Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत उमेदवारांना नागपूर येथे नोकरीची संधी मिळणार आहे. महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये वीजतंत्रीची 13 पदे, तारतंत्रीची 13 पदे, कोपाची 8 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.apprenticeshipindia.gov.inवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 

नोंदणी केल्यानंतर त्याची प्रत आणि नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे नागपूर महावितरणच्या दिलेल्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

Railway Job: मध्य रेल्वेमध्ये बंपर भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

यावेळी तुमच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.  येताना कागदपत्रांची झेरोक्ससोबत घेऊन येणे आवश्यक आहे. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास नोकरी नाकारण्याचा अधिकार संस्थेकडे राहिल याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

हेही वाचा :  मुसळधार पावसामुळं हाहाकार; रायगडमध्ये दरड कोसळली, पिंपरीत रस्ता खचला, भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला...

उमेदवारांनी अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. महावितरणच्या विविध पदांसाठी  अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाही. तसेच उमेदवारांना महावितरणच्या नियमानुसार पगार दिला जाईल, याची नोंद घ्या.

दूरसंचार विभागात विविध पदांची भरती, मुंबईत मिळेल भरघोस पगाराची नोकरी

उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.  9 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून पाठवू शकतात. त्यांनी आपले अर्ज कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या. सं.व.स विभाग, नांदगाव रोड हिंगणघाट या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अधिकृत वेबसाइट www.mahadiscom.in वर यासंदर्भातील सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …