कुकरमधून कधीच फसफसून येणार नाही पाणी बाहेर, फॉलो करा या टिप्स

जेवण बनविण्यासाठी सर्वात जास्त स्वयंपाकघरात वापर होत असेल तर तो म्हणजे प्रेशर कुकरचा. पण प्रेशर कुकर योग्य नसेल तर यात जेवण खराब व्हायला अथवा जळायला वेळ लागत नाही. पण बरेचदा कुकरमध्ये जेवण बनवताना भात अथवा पाणी फसफसून बाहेर येते. यामुळे कुकर खराब व्हायला वेळ लागत नाही.

तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर शेफ पंकज भदौरियाने काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. कुकर कसा स्वच्छ ठेवावा याबाबत अगदी सहज आणि सोप्या टिप्स शेअर केल्या असून तुम्हीही वापरू शकता. (फोटो सौजन्य – Freepik.com)

कुकरमधून पाणी का बाहेर येते?

कुकरमधून पाणी का बाहेर येते?
  • कुकरमधून पाणी बाहेर येण्याची अनेक कारणे आहेत, मात्र तुम्हाला काही महत्त्वाची कारणे समजून घेेण्याची आवश्यकता आहे.
  • क्षमतेपेक्षा अधिक पदार्थ आत ठेवल्यास पाणी बाहेर येते. लहान कुकरसाठी तुम्ही मोठा गॅस बर्नर वापरत असल्यास कुकरमधून पदार्थ बाहेर येतात
  • तुम्ही कुकरमधून फोर्सफुली प्रेशर बाहेर येण्याचा प्रयत्न केल्यासदेखील आतील पदार्थासह पाणी बाहेर येते
हेही वाचा :  नितीन देसाई यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? धक्कादायक माहिती समोर

नेहमी मोठ्या कुकरचा वापर करा कारण लहान कुकरमधून पाणी येण्याची अधिक समस्या असते

टिश्यूचा करा वापर

टिश्यूचा करा वापर

या समस्येतून सुटका मिळविण्यासाठी तुम्हाला एका टिश्यू पेपरची गरज आहे. टिश्यू पेपरचा वापर करून तुम्ही कुकरची शिटी काढा आणि या ठिकाणी असलेल्या होलमध्ये टिश्यू पेपर लावा. त्यानंतर त्यावर शिटी लावा आणि मग कुकरचा वापर करा. असे केल्याने पाणी बाहेर येत असल्यास टिश्यू पेपर शोषून घेईल आणि कुकर खराब होणार नाही. एकच टिश्यू न वापरता ७-८ टिश्यू पेपर्स वापरा.

(वाचा – दही आंबट झालंय तर फेकू नका, या पदार्थांमध्ये करा उपयोग आणि बनवा अधिक चविष्ट)

करा हे काम

करा हे काम

तुम्हाला जर वाटत असेल की, जेवण परफेक्ट तयार व्हावे आणि कुकरमधून बाहेरही येऊ नये तर तुम्ही कुकरच्या झाकणावर कणीक संपूर्ण बाजूला लाऊ शकता. ही अत्यंत जुनी पद्धत असली तरीही अत्यंत सोपी आणि उपयुक्त आहे. तुम्ही याचा वापर केल्यास झाकणातून हवा बाहेर येणार नाही आणि जेवणही फसफसून बाहेर येणार नाही.

(वाचा – घरात दही लावल्यावर पाणी सुटतंय का? घट्ट आणि गोड दही बनविण्याच्या सोप्या ट्रिक्स)

हेही वाचा :  कोरोनाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी, जगाची 10 टक्के लोकसंख्या Coronavirus च्या विळख्यात ?

कॉर्न फ्लोअर आणि मीठाने करा स्वच्छ

कॉर्न फ्लोअर आणि मीठाने करा स्वच्छ

हो हे खरं आहे तुम्ही कुकर स्वच्छ करण्यासाठी कॉर्न फ्लोअरचा वापर करू शकता. यामध्ये तुम्ही मीठ मिक्स करून वापरा. फसफसलेला भात असो अथवा जळलेला कुकर असो हे त्वरीत स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरते.

(वाचा – अण्णाच्या स्टॉलसारखा मऊ उपमा बनवायचा असेल तर वापरा सोप्या टिप्स, कधीच होणार नाही फडफडीत )

पंकज भदौरियाने दिलेल्या टिप्स

असा करा वापर

असा करा वापर
  • अर्धा कुकर पाणी भरा
  • त्यामध्ये ४ चमचे कॉर्न फ्लोअर मिक्स करा
  • त्यानंतर साधारण १०-१५ मिनिट्स हे गॅसवर ठेऊन उकळा
  • प्रेशर कुकर थंड झाल्यावर यात मीठ आणि डिश सोप मिक्स करून घासा. याचा वापर करून जळलेला आणि पदार्थ फसफसून खराब झालेला कुकर स्वच्छ होईल.

या टिप्स वापरून तुम्हीही कुकरची स्वच्छता ठेवा आणि नेहमी कुकरमधून वाफ जाणार नाही याची काळजी घ्या.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धक्कादायक! सतत डोळे चोळण्याच्या सवयीमुळे 21 वर्षीय तरुणाने दृष्टी गमावली; थेट रुग्णालयात..

Continuous Eye Rubbing Lost Vision:  डोळ्यात काही गेलं तर आपल्यापैकी अनेकजण डोळे चोळतात. अगदी सहज …

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …