Pregnancy Tips: प्रेग्नन्सीमध्ये भात खावा की खाऊ नये? सफेद की ब्राऊन कोणता भात ठरतो फायदेशीर

गर्धधारणा झाल्याची चाहुल लागल्यापासून प्रत्येक महिलेला आपल्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्यावी लागते. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच ही काळजी घ्यावी लागते. इतकंच नाही तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय खावे काय नको याचा एक डाएट प्लॅनच तयार करण्यात येतो. पण काही महिलांच्या बाबतीत या डाएटमध्ये भाताचा समावेश करण्यात येत नाही. त्यामुळे शरीराला योग्य पोषक तत्व मिळणं बंद होतं. पण गरोदरपणात भात खावा की खाऊ नये अथवा याचे काही दुष्परिणाम आहेत का? असे प्रश्न अनुत्तरित असतात. अशाच काही प्रश्नांची उत्तरे या लेखात डॉ. श्वेता पाटील यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. (फोटो सौजन्य – iStock)

​गरोदरपणात भात खावा की नाही?​

​गरोदरपणात भात खावा की नाही?​

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणा झाल्यानंतरही भात खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. पण भात योग्य प्रमाणात तुम्ही खावा असंही सांगण्यात येते. केवळ भात खाणे चुकीचे ठरते. कारण जास्त भात खाल्ल्याने या काळात अधिक वजन वाढू शकते आणि त्याचा दुष्परिणाम बाळावर होऊ शकतो.

हेही वाचा :  गरोदरपणादरम्यान ग्लुकोजची पातळी तपासणे ठरते महत्त्वाचे, अन्यथा जन्मतःच बाळ मृत होण्याची शक्यता

​रोजच्या जेवणात प्रमाणात करा भाताचा समावेश​

​रोजच्या जेवणात प्रमाणात करा भाताचा समावेश​

रोजच्या जेवणात थोड्या भाताचा समावेश नक्की करून घ्या. कारण यामधून शरीराला मॅग्नेशियमसारखे पोषक तत्व मिळते, जे बाळाच्या चांगल्या संज्ञानात्मक विकासासाठी मदत करते आणि गरोदर महिलेच्या आरोग्यालाही लाभ मिळतो.

(वाचा – Preconception Check-Up म्हणजे काय, गरोदरपणाआधी केल्यास होतो फायदा)

​कोणता भात खावा?​

​कोणता भात खावा?​

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार सफेद नेहमीचा भात अथवा ब्राऊन राईस हे दोन्ही गरोदर महिलेच्या आरोग्यासाठी चांगले ठरतात. कारण भातामध्ये नैसर्गिक स्वरूपात कॅल्शियम, फायबर, रायबोफ्लेविन, थियामिन आणि विटामिन डी युक्त खनिजे अधिक असतात. जे प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. तर यामधील आढळणारे कार्बोहायड्रेट हे योग्य ऊर्जा शरीराला मिळवून देते.

(वाचा – गरोदरपणादरम्यान पोटावर येणारी काळी रेषा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या Linea Nigra विषयी)

​ब्राऊन राईस खाल्ल्याचा फायदा​

​ब्राऊन राईस खाल्ल्याचा फायदा​

गरोदरपणात योग्य प्रमाणात ब्राऊन राईस खाल्ल्यास पचनक्रियेत सुधारणा होते आणि गर्भधारणामुळे होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सहज सुटका होते. कारण या ब्राऊन राईसमध्ये फायबर अधिक प्रमाणात असते जे गरोदर महिलांना फायदेशीर ठरते. तसंच यामध्ये कमी प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स असून याचे सेवन केल्यास, इन्शुलिनचे प्रमाण नियंत्रित राखण्यास मदत मिळते.

हेही वाचा :  वयाच्या ४० शीनंतर IVF शिवाय आई होणं शक्य आहे? नॅचरल कन्सिव होण्याची शक्यती किती

(वाचा – सोनम कपूरने दाखवली ६ महिन्याच्या वायुची पहिली झलक, नव्या आईने काय आहार सुरू करावा)

Eating Rice During Pregnancy (5)

eating-rice-during-pregnancy-5

​गरोदरपणात भात खाण्याचे फायदे​

​गरोदरपणात भात खाण्याचे फायदे​

योग्य प्रमाणात जर तुम्ही गरोदरपणात भात खाणार असाल तर त्याचे नक्की गरोदर महिलांच्या शरीरावर आणि बाळावरही योग्य परिणाम होतो. याचे फायदे घ्या जाणून.

  • भातात असणारे विटामिन डी, कॅल्शियम, फायबर हे पोटातील वाढणाऱ्या गर्भाचा चांगला विकास करतात. तर विटामिन डी मुळे गरोदर महिलेची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते
  • बाळाची हाडे पोटातच मजूबत होण्यास मदत मिळते
  • भातात कोलेस्ट्रॉल नसल्यामुळे आहार संतुलित होण्यास मदत मिळते भातात कमी प्रमाणात सोडियम असल्याने गर्भवती महिलेचा रक्तदाब नियंत्रणात राहाते

योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भवती महिला भाताचा आपल्या आहारात समावेश नक्कीच करून घेऊ शकतात. स्वतःच्या मनाने कोणताही निर्णय गर्भवती महिलांनी घेऊ नये.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …