प्रियकर-प्रेयसीलाच मानताय नवरा-बायको? हे 5 संकेत सांगतात तुमचा बाबू-शोना करणार नाही तुमच्याशी लग्न

सर्वाधिक यातना तेव्हा होतात जेव्हा आपण प्रेमासाठी 100 टक्के प्रयत्न करत असतो पण आपला जोडीदार तरी आपल्याला हवं तसं प्रेम देत नाही. कोणाच्याही आयुष्यातील हा सगळ्यात वाईट काळ असतो कारण अशावेळी आपण सगळं करूनही मूर्ख ठरलो ही भावना मनात निर्माण होते. प्रेम ठरवून होत नाही, ते कधीही, कोणावरही आणि कोणत्याही वयात होऊ शकते. म्हणूनच म्हणतात ना की, लोक प्रेमात आंधळे होतात. परंतु प्रेमाच्या नात्यात एक वेळ अशी येते, जेव्हा आपल्याला सर्व काही जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची आवश्यकता असते.

आम्ही त्या वेळेबद्दल बोलत आहोत जेव्हा तुम्ही लग्नासाठी तयार असता, पण तुमचा जोडीदार मात्र काहीही इंटरेस्ट दाखवत नाही. खास करून मुलांमध्ये ही गोष्ट दिसून येते. आज आम्ही तुम्हाला या लेखातून त्या लक्षणांबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमचा प्रियकर तुमच्यावर कितीही प्रेम करत असला तरी लग्न मात्र करणार नाही. (फोटो सौजन्य :- iStock)

लग्नाचा विषय टाळणे

लग्नाचा विषय टाळणे

रिलेशनशिप मध्ये खूप वर्षे राहिल्यावर काही काळानंतर कपल्स लग्नच विचार करू लागतात. खास करून मुलींसाठी लवकर लग्न करणे हे महत्त्वाचे असते. सांगायचा मुद्दा असा की ज्यांना एकत्र आयुष्य घालवायचे आहे ते लोक यावर गांभीर्याने चर्चा करतात. पण जर तुमचा पार्टनर ही गोष्ट विनोदाने घेत असेल, तुम्ही हा विषय काढला की लक्ष देत नसेल, वा दुर्लक्ष करत असेल किंवा हळूच विषय टाळत असेल तर समजून हा की तुमच्याशी लग्न करण्याचा त्याचा कोणताही प्लान नाही.
(वाचा :- नव-याने या एका गोष्टीवर 3 वर्षात तब्बल एक करोड रूपये उधळले,त्यामागील किळसवाणं सत्य मी सासू-सास-यांपासून लपवलंय)​

हेही वाचा :  '...तर मराठी माणसाला पंतप्रधान करा', भाजपाला संतापलेल्या मनसेचं चॅलेंज; 'सलीम-जावेद'वरुन जुंपली

कुटुंबाला दूर ठेवणे

कुटुंबाला दूर ठेवणे

बॉयफ्रेंडच्या घरच्यांसोबत लग्नाची चर्चा अचानक होऊ शकत नाही. यासाठी प्रथम तुम्हाला त्यांच्याबद्दल जाणून घेणे आवश्यक असते. यासाठी तुम्ही त्यांना भेटणे, त्यांच्या सोबत काही वेळ घालवणे आवश्यक असते. ते लोकं सुद्धा तुम्हाला पारखून घेतात. तुम्ही ज्या घरात जाणार आहत त्या घरातील लोकांची मते तुम्हाला कळतात. यासाठीच अनेकदा मुली घरच्यांना भेटायचं आहे म्हणून आपल्या बॉयफ्रेंडच्या मागे लागतात. पण जर तुमच्या बॉयफ्रेंडने तुमच्याशी अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहूनही तुमची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली नसेल, तर लग्नाच्या बाबतीत त्याच्यावर कस्त विश्वास ठेवू नका.
(वाचा :- कपिल शर्मासारखा प्रसिद्ध कॉमेडियन का वळलाय या मार्गाला,जगाला हसवणारा व्यक्तीच का आणतोय बायकोच्या डोळ्यांत पाणी)​

भावनिक कमी शारीरक आकर्षण जास्त

भावनिक कमी शारीरक आकर्षण जास्त

प्रेमात भावनिक जवळीक जास्त असते. पण जेव्हा तुम्ही आकर्षणामुळे एकत्र असता तेव्हा जास्त शारीरिक जवळीक निर्माण होते. अशा परिस्थितीत जर तुमच्या आणि तुमच्या बॉयफ्रेंड मध्ये कमी बोलणे होत असेल किंवा तुम्ही दोघे भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडले गेले नसाल तर असे नाते लग्नापर्यंत जाण्याची शक्यता अजिबात नसते.

(वाचा :- 4 वर्ष प्रेमात आहे, सेटल आहे पण 35 पर्यंत लग्न करायचं नाही पण प्रेयसीची विचित्र अट ऐकून पायाखालची जमीन सरकलीये)​

हेही वाचा :  'इंडिया'ला निरोप देत 'या' पत्रकाराने उचललं हमासविरोधात शस्त्र, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

मित्रांसोबत असताना तुम्हाला विसरणे

मित्रांसोबत असताना तुम्हाला विसरणे

जर तुमचा प्रियकर त्याच्या मित्रांसोबत असताना तुमची आठवणही काढत नंही किंवा तुमच्या मेसेज व फोनला प्रतिसाद देत नाही,तुम्हाला मिस करत नाही. तर तो सिरीयस नाही हेच यातून दिसून येते. कधीतरी तो असे करत असले तर ठीक आहे पण प्रत्येक वेळी मित्रांसोबत असताना जर तो तुम्हाला इग्नोर करत असेल तर समजून जा की हा मुलगा लग्नाच्या बाबतीत विश्वास ठेवण्यालायक नाही.
(वाचा :- अस्से लग्न अवघडच बाई! लग्न करून फसलो असे वाटणा-या प्रत्येकास माहितच हव्या या गोष्टी,घटस्फोटाची वेळच येणार नाही)​

नात्याच्या भविष्याकडे लक्ष न देणे

नात्याच्या भविष्याकडे लक्ष न देणे

लग्न टाळणाऱ्या बॉयफ्रेंड्सना फ्युचर प्लानिंग मध्ये काडीचा इंटरेस्ट नसतो आणि असा काही विषय काढला की ते एकत्र टाळाटाळ करतात किंवा चिडचिड करतात. जर तुमचा बॉयफ्रेंड असा विषयात रस घेत नसेल तर त्याला या नात्याच्या भविष्याचे काहीच देणेघेणे नाही हेच दिसून येते.
(वाचा :- त्या मुलीच्या भूतकाळाची काळी बाजू माहीत असूनही मी तिला प्रपोज करण्याचं धाडस केलं, पण पुढे जे झालं ते धक्कादायक)​

लग्न न करण्यासाठी कारणे देणे

लग्न न करण्यासाठी कारणे देणे

‘तुला माझ्या घरात जुळवून घेता येणार नाही’ असे कारण जर तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला लग्न न करण्यासाठी देत असेल तर बॉस, तुम्ही स्वतःसाठी दुसरा जोडीदार शोधा. कारण असे म्हणणारे बॉयफ्रेंड केवळ टाईमपास करण्यासाठीच प्रेम करतात. अशा लोकांवर अजून विश्वास ठेवून तुम्ही आपल्या भविष्याची राखरांगोळी करू नका. त्यापेक्षा योग्य व्यक्तीची निवड करा आणि सुखाने संसाराला सुरुवात करा. जेणेकरून तुम्हला एक चागले भविष्य मिळेल.
(वाचा :- त्या मुलीच्या भूतकाळाची काळी बाजू माहीत असूनही मी तिला प्रपोज करण्याचं धाडस केलं, पण पुढे जे झालं ते धक्कादायक)​

हेही वाचा :  'स्टेजवर शरद पवारांच्या मागून का गेलात?' अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …