प्रेमाला आसुसलेल्या राखी सावंतच्या नात्याचा खेळखंडोबा, कसे जपावे नाते सोप्या टिप्स

व्हॅलेंटाईन डे हा जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र राखी सावंतने आपल्या नात्याचा नेहमीच खेळखंडोबा केला असल्याचे आता बोलले जात आहे. प्रेमात असताना स्वतःला आणि जगाला विसरताना इतर गोष्टींचेही भान राखणे गरजेचे आहे हे राखी सावंतच्या नात्यानंतर नक्कीच प्रत्येकाला कळायला हवे. आधी अभिषेक, रितेश आणि आता आदिल या सर्वच नात्यांमध्ये राखी कुठेतरी हरवली आणि नंतर जगासमोर हसं करून घेतल्यासारखं झालंय. आपलं नातं जपताना नक्की कोणत्या गोष्टी लपवायला हव्यात हे नात्यात महत्त्वाचं आहे. (फोटो सौजन्य – @rakhisawant2511 Instagram, Freepik.com)

​कधी आणावे जगासमोर नाते ​

​कधी आणावे जगासमोर नाते ​

आपण जोपर्यंत आपल्या जोडीदाराच्या बाबतीत १०० टक्के खात्रीने सांगू शकत नाही तोपर्यंत कोणाचीही ओळख करून देऊ नये. साधारण १ ते २ वर्ष डेट केल्यानंतर तुम्हाला जेव्हा सर्व बाजूने या व्यक्तीसह आपण राहू शकतो याची खात्री पटेल तेव्हाच हे नाते जगासमोर आणावे.

हेही वाचा :  आता ३ वर्षांपूर्वीच कळणार हृदयविकाराचा धोका; शास्त्रज्ञांनी शोधून काढले नवे तंत्रज्ञान

​मैत्रीच्या नात्याने राहावे

​मैत्रीच्या नात्याने राहावे

तुम्ही दोघं एकत्र असताना खासगी आयुष्य तसंच ठेवावं त्याचा बाजार मांडायची गरज नाही. नातं हे दोघांचं असतं आणि ते जगाला दाखविण्याची गरज नाही. जोपर्यंत खासगी आयुष्य तुम्ही जपून ठेवता तोपर्यंत त्याचे महत्त्व अधिक राहाते. तसंच जगासमोर मैत्रीचे नाते तुम्ही निभावत राहू शकता. त्यासाठी एकमेकांचे प्रेम दाखविण्याची काहीच गरज नाही.

(वाचा – पहिल्याच भेटीत झाले लिपलॉक, लग्नासाठी करिअरही सोडलं पण झाला घटस्फोट, अमृता-सैफची अधुरी कहाणी)

​प्रायव्हेट व्हिडिओ चॅट अथवा क्षण जपावे​

​प्रायव्हेट व्हिडिओ चॅट अथवा क्षण जपावे​

आपल्या जोडीदाराच्या भावनांना धक्का बसेल असे काहीही करू नये. एकत्र घालवत असलेले क्षण जपण्यासाठी काढलेले व्हिडिओ, चॅट, फोटो हे जपून ठेवावे. नाते बिघडल्यानंतरही समोरच्या व्यक्तीची बदनामी करण्याच्या दृष्टीने याचा वापर करू नये. यामुळे तुमच्याकडे जगाचा बघण्याचा दृष्टीकोन अधिक बिघडतो.

(वाचा – धर्म आणि वयाची बंधनं झुगारून केले होते मराठमोळ्या उर्मिलाने लग्न, करतेय सुखाचा संसार)

राखी आणि आदिलचे खासगी क्षण

​कितीही कडवटपणा असला तरीही तमाशा करू नये​

​कितीही कडवटपणा असला तरीही तमाशा करू नये​

नात्यात कितीही कडवटपणा असला तरीही तमाशा न करता अथवा त्या गोष्टीचा गवगवा न करता तुम्ही त्याला योग्यरित्या सामोरे जावे. नातं हा अत्यंत नाजूक विषय असतो आणि तो चव्हाट्यावर आणण्यापेक्षा जितक्या भावनिक पद्धतीने हाताळता येईल ते अधिक महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :  Romance Viral Video : लोकं थबकली, वाहतूक खोळंबली; भर चौकात कपलचा रोमान्स पाहून सगळे थक्कं

(वाचा – लग्न आथियाचे मात्र चर्चा सुनील-मानाच्या लव्ह स्टोरीची, ९ वर्षे वाट पाहून मांडला संसार)

​व्हिक्टिम कार्ड खेळू नये​

​व्हिक्टिम कार्ड खेळू नये​

मुलगा असो वा मुलगी दोघांनीही नात्यातून बाहेर पडताना कोणतेही व्हिक्टिम कार्ड खेळण्याची गरज नाही. मुळात नात्यात असताना प्रेमाने आंधळे झालेल्या व्यक्तींना काहीच कळत नाही. पण हातातून समोरची व्यक्ती निसटून जात आहे हे कळल्यानंतर मात्रा सैरभैर झाल्याने चुकीची पावलं उचलली जातात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे व्हिक्टिम कार्ड यावेळी खेळू नये.

नात्यांना जपताना नात्याचा खेळखंडोबा होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. राखी सावंतची जी अवस्था आहे तशी वेळ आयुष्यात यायला नको असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident Case : पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident Case : पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. पुण्यातील …

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …