जमिनीवर नको त्या अवस्थेत पडलेल्या पतीला बघून मी घाबरले व अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली,नंतर जे सत्य समजलं ते हादरवणारं

अनेकदा आयुष्यात असे काही घडते ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अशा परिस्थितीत ड्रग्जसारख्या जीवघेण्या गोष्टींशी कोणाचा सामना झाला तर मग अजूनच वाईट परिस्थिती ओढावते. पण म्हणतात ना की काही गोष्टी आपल्या हातात नसतात. माझ्यासोबत सुद्धा नेमके असेच घडले होते. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता, जेव्हा मला कळलं की माझा नवरा ड्रग्ज घेतो. त्याच्या या सवयीने माझ्या सर्व आशा धुळीस मिळवल्या होत्या. खरं तर, ही गोष्ट 2015 सालची आहे, जेव्हा मला माझा नवरा जमिनीवर नको त्या अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या एका दंडाला सुई अडकवलेली होती. त्याला या अवस्थेत पाहून मी घाबरले. माझे अश्रू थांबतच नव्हते.

क्षणभर मला वाटले की मी माझ्या नवऱ्याला कायमचे गमावले आहे. मी त्यांना वाचवण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स बोलवण्यासती धावले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितले की, माझ्या पतीने ड्रग्जचा ओव्हरडोज घेतला होता त्यामुळे तो बेशुद्ध झाला आहे आणि त्याला शुद्धीवर आणता येत नाहीये. माझा नवरा ड्रग्ज देखील घेतो हा माझ्यासाठी धक्का होता. सुरूवातीला तर मी हे मान्य करायलाच तयार नव्हते. पण शेवटी डॉक्टरांनी रिपोर्ट्स दाखवताच माझा धीर सुटला. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.) (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  लग्न नको स्वातंत्र्य हवंय... ४१ वर्षीय व्यक्तीने सांगितली लग्न न करण्याची भन्नाट कारणे, स्टोरी वाचून हडबडून जाल

तो एक यशस्वी व्यक्ती आहे

तो एक यशस्वी व्यक्ती आहे

माझे पती एक यशस्वी बिझनेसमॅन आणि मनमौजी व्यक्ती आहेत. गेली दोन वर्षे त्यांनी आपल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत हवं ते सगळं मिळवलं. यामुळे त्यांना सगळे जण नावाजतात सुद्धा! आमचं अरेंज्ड मॅरेज्ड झालं होतं. नवरा बायको म्हणून आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. काही काळ एकमेकांना दिल्यावर आता आम्ही फॅमिली वाढवण्याचा देखील विचार करत होतो. आमचा संसार अगदी सुखाने सुरू होता. पण अशा स्थितीत जेव्हा डॉक्टरांनी नव-याला रिहेबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवले तेव्हा मात्र माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला.

(वाचा :- लाखो हृदयांची क्रश Kiaraचं sidharth कडून पर्मनंट बुकिंग, ज्यातिषांकडून वैवाहिक जीवनाची उत्कंठावर्धक भविष्यवाणी)​

मला अजून आशा होती

मला अजून आशा होती

एवढे सगळे होऊन सुद्धा सारे काही परत नीट होईल अशी मला अशा होती. म्हणून मी माझ्या पतीची साथ सोडली नाही. मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना धीर द्यायची. ते एकटे नाही आहेत याची त्यांना सतत जाणीव करून द्यायची. त्यांच्यासोबत खेळायची, जुन्या आठवणी सांगायची. एक दिवस मात्र ते माझ्या समोर रडत रडत व्यक्त झाले. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. जे घडलं त्यासाठी त्यांनी माफी मागितली. त्यांनी कबूल केलं की अन्य बिझनेसमॅन सोबत राहून त्यांना हे व्यसन लागले होते. हे ऐकून माझ्या मनात अगदी धस्स झाले.

(वाचा :- Propose Day 2023 : प्रपोज हे गुडघ्यावर बसूनच का केलं जातं, कारण ऐकल्यावर डोकं अक्षरश: हलेल, विसराल इतर पद्धती)​

हेही वाचा :  लग्नाआधी बायकोविषयी काही माहीत नव्हतं, नंतर समोर आलं खरं भयाण रूप, आता मी अडकलोय

पुन्हा झटका आला

पुन्हा झटका आला

माझे पती हळूहळू बरे होत होते. त्यांना 1 महिन्यानंतर रिहेबिलिटेशन सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यांना प्रत्येक व्हिजिटला उपस्थित राहून औषधे घेण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. सर्व काही ठीक होते, परंतु दोन महिन्यांनंतर ते पुन्हा आजारी पडले. एके दिवशी मला ते बाथरूममध्ये कोसळलेले दिसले. त्यांना त्या अवस्थेत पाहून मी खूप निराश झाली. कारण स्वत:ची काळजी घेऊ न शकणाऱ्या माणसासोबत राहणं मला कठीण जात होतं.

(वाचा :- Rose Day: चुकूनही देऊ नका बायको व गर्लफ्रेंडला एकाच रंगाचं गुलाब, वाचा प्रत्येक रंगाचा अर्थ मग करा निवड नाहीतर)​

काळजी आणि प्रेम वाढले

काळजी आणि प्रेम वाढले

मी शक्य तितकी त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करायची. पण माझ्या प्रयत्नांना सुद्धा एक मर्यादा होती. अखेर मला कळून चुकले की माझ्या प्रयत्नांचा काहीच फायदा होत नाही आहे. त्यांना पुन्हा एकदा रिहेबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. ते लवकर बरे व्हावेत म्हणून मी वाट पाहू लागली. या अवस्थेत मला त्यांची अधिक काळजी वाटायची आणि माझे प्रेम अधिकच वाढले.

(वाचा :- लग्न नाही प्रेमावर विश्वास ठेवला अन् श्रद्धाच्या शरीराचे झाले 35 तुकडे, प्रेमात बुडालेल्यांनो जागे व्हा कारण..)​

इमोशनली आम्ही जवळ आलो

इमोशनली आम्ही जवळ आलो

ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी त्यांच्याशी इमोशनली अटॅच होण्यासाठी झटू लागली. ते आतून खूप तुटले होते आणि त्यांना माझ्याच आधाराची गरज होती. कोणीतरी व्यक्ती आपल्यासाठी जगते आहे ही जाणीव त्यांना करून देणे भाग होते. मी त्यांची खूप काळजी घेतली. त्यांना दररोज प्रेमाने मिठी मारण्यास सुरुवात केली. माझे पती पुन्हा बरे होऊ लागले आणि मी त्यांना अखेर घरी आणले. त्यांच्या तब्येतीतही आता बरीच सुधारणा झाली होती. आता ते माझ्यापासून काहीच लपवत नाहीत. मी सुद्धा बिझनेसमध्ये त्यांना मदत करायला सुरुवात केली. अखेर आम्ही त्या वाईट काळातून बाहेर आलो. आज माझे पती पुन्हा एकदा हसत खेळत आयुष्य जगत आहेत.

हेही वाचा :  Uddhav Thackeray : मोदी म्हणजे भारत नव्हे... उद्धव ठाकरे यांची भाजप पक्षावर जोरदार टीका

(वाचा :- आमिर खान, सामंथा, मानसी नाईक मोठमोठ्या कलाकारांचे लग्न ठरले फेल, यातून धडा घेऊन या 5 चुकांकडे करू नका दुर्लक्ष)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंगठी आणि गळ्यातल्या मंगळसुत्रामुळे ओळख पटली, डोंबवली स्फोटात त्याने आपली पत्नी गमावली

Dombivli MIDC Blast : 23 मे 2024 हा दिवस डोंबिवलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवाणरा ठरला. …

VIDEO : दत्तक मुलाला पाहून जोडप्याला अश्रू अनावर, हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ एकदा पाहाच

Trending Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे धक्कादायक …