पंतप्रधानांनी दगडूशेठ हलवाई गणपतीकडे काय मागितलं? पुजाऱ्यांनी दिली माहिती

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने (lokmanya tilak national award) सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यात (Pune News) या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी समस्त पुणेकरांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाचे पूजन करून केली जाते, त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी पायाभरणी आणि उद्घाटन करण्यापूर्वी महाराष्ट्रातील पुणे येथील दगडूशेठ गणपती मंदिरात प्रार्थना करुन केली आहे.

पुण्यात उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या (Dagdusheth Halwai Ganapati) ठिकाणी जवळपास 20 मिनिटे होते. याठिकाणी त्यांनी अभिषेक करत आरती केली. त्यानंतर पंतप्रधना नरेंद्र मोदी यांनी गणपतीचे दर्शन घेऊन साकडं घातलं आहे. सिंधूताई सकपाळ यांच्या कन्या ममता सकपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे औक्षण केले. यावेळी भारताने सोडलेलं चांद्रयान चंद्रावर 21 ऑगस्ट रोजी व्यवस्थितपणे उतरण्याचा असा संकल्प भारतीयांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

“देवतांप्रती त्यांची अपार श्रद्धा आहे. ट्रस्टच्या वतीने पंतप्रधानांना चांदीचा गणपती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती त्यांना दिली. यासाठी महिनाभर आधीपासून तयारी सुरु होती. पंतप्रधानांच्या संकल्पामध्ये भारत विश्वगुरु व्हावं आणि आपण सोडलेलं चांद्रयान 3 हे चंद्रावर सुरळीतपणे उतरावं अशी प्रार्थना करण्यात आली,” अशी माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली.

हेही वाचा :  पुणे : ‘मनसे’च्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..’; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Political Stand: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीशी काहीच घेणे देणे नाही. …

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …