चॉकलेट फेस पॅक लावण्याचे 5 फायदे
- चॉकलेट फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात.
- चेहऱ्यावर असणाऱ्या मृत त्वचेच्या काढण्यासाठी चॉकलेट आणि दह्याचा फेस पॅकचा तुम्ही वापर करु शकता.
- हा फेस पॅक बनवण्यासाठी चॉकलेट वितळवून त्यात एक चमचा दही मिसळा आणि चेहऱ्याला लावा.
त्वचेवर ओलावा टिकून राहतो
Chocolate Day 2023: कोरड्या त्वचेसाठी चॉकलेट आणि मधाचा फेस पॅक खूपच फायदेशीर असतो. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावर लावल्याने त्वचा ओलसर राहते. हा फेसपॅक बनवण्यासाठी चॉकलेट वितळवून त्यात एक चमचा मध मिसळून चेहऱ्याला लावा.
(वाचा :- लग्नातील एका क्षुल्लक चुकीमुळे मसाबा गुप्ताचा झाला घात, झाला घातक परिणाम)
त्वचा चमकते
चॉकलेट, दूध आणि ब्राऊन शुगरचा फेस पॅक चमकदार त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. हा फेस पॅक लावल्याने त्वचेची घाण साफ होते.
(वाचा :- ‘प्रेमाचा गुलकंद’ चिरतरुण राहण्यासाठी असा करा gulkand चा वापर)
त्वचा मऊ मुलायम राहते
Chocolate Day: त्वचा मुलायम बनवण्यासाठी चॉकलेट आणि बेसनचा फेस पॅक खूप फायदेशीर मानला जातो. हा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचे बेसन वितळलेले चॉकलेट आणि कच्चे दूध मिसळून चेहऱ्याला लावावे.
(वाचा :- केस गळणे थांबवण्यासाठी करा 4 योगाप्रकार, बाबा रामदेव यांनी दिल्या सोप्या टिप्स )
पिंपल्सची समस्या चार हात लांब राहते
पिंपल्सची तक्रार दूर करण्यासाठी चॉकलेट आणि मुलतानी मातीचा फेस पॅक खूप फायदेशीर ठरतो. हा फेसपॅक बनवण्यासाठी मुलतानी मातीचा एक चमचा वितळलेले चॉकलेट आणि लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावावा.