फ्रिजमध्ये किती वेळ अन्न साठवणे ठरते योग्य? नाहीतर तुमच्या पोटात ‘विष’ जातंय हे समजा

आता आपली जीवनसरणी अशी झाली आहे की, कामामध्ये वेळेवर जेवण तर सोडाच पण गरम आणि ताजे अन्न खाण्यासाठीही वेळ मिळत नाही. काही जण तर रात्री जेवण बनवून फ्रिजमध्ये ठेवतात आणि सकाळी डब्यात घेऊन जातात. पण तज्ज्ञांच्या मते फ्रिजमध्ये स्टोअर केलेले अन्न खाणे योग्य नाही. जास्त काळ फ्रिजमध्ये जेवण राहिले तर फूड पॉईझनिंगचा धोका वाढतो. याशिवाय बॅक्टेरियामुळे खाण्याचा गंध, रंग आणि स्वादही बदलत नाही. पण अनेकांना हे सुरक्षित आहे की नाही याबाबत कल्पनाच नसते. सोशल मीडिया इन्फ्लुएन्स कृष्ण अशोक यांनी सांगितल्याप्रमाणे लोकांना वाटतं की फ्रिजमध्ये खाणे ठेवल्याने त्यातील पोषक तत्व संपते, मात्र ते शिजवतानाही बऱ्याचदा संपते. त्यामुळे काय योग्य आणि काय अयोग्य समजून घ्यावे. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​काय आहे तज्ज्ञांचे म्हणणे?​

​काय आहे तज्ज्ञांचे म्हणणे?​

पाण्यात मिक्स होणारे विटामिन्स सर्वात जास्त अस्थिर असून यातील पोषक तत्व हे लवकर नष्ट होतात. अन्न शिजतानाच पोषक तत्व अधिक प्रमाणात निघून जातात. रेफ्रिजरेशन दरम्यान तुम्ही जर शिजलेले अन्न एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवले तर हे अन्न एक – दोन दिवस ते जास्तीत जास्त आठवडा योग्य ठरते.

हेही वाचा :  Maharashtra Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ? मुंबई, ठाण्यासह कोकणात कोसळणार पाऊस!

​उकडलेले अन्न २ दिवसात संपवावे​

​उकडलेले अन्न २ दिवसात संपवावे​

मात्र उकडलेल्या अथवा शिजलेल्या भातात बॅक्टेरिया जन्म घेऊ शकतात असंही तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे हे १-२ दिवसात संपवावे. भारतीय पदार्थांमधील आंबट, खारट आणि मसाले हे फ्रिजमध्ये ठेवणे योग्य ठरते.

(वाचा – डायबिटीसपासून PCOD पर्यंत नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी ठरते बाजरीची भाकरी, जाणून घ्या फायदे)

​फ्रिजमध्ये अन्न किती वेळ ठेवणे सुरक्षित?​

​फ्रिजमध्ये अन्न किती वेळ ठेवणे सुरक्षित?​

अंडे, डेअर उत्पादने, मांस, मच्छी असे लवकर खराब होणारे पदार्थ हे नेहमी रेफ्रिजरेटमध्ये ठेवावेत. मात्र आठवड्याच्या आत या पदार्थांचे सेवन करणे ही तुमची जबाबदारी आहे. तर पोळी, फळं, भाजी हे पदार्थ १-२ दिवसापेक्षा फ्रिजमध्ये ठेवल्यास आणि त्यानंतर खाल्ल्यास, शरीरासाठी घातक ठरते. तज्ज्ञांनुसार फ्रिजमध्ये ठेवलेल्या पदार्थांत २-३ दिवसात बॅक्टेरिया जमू लागतात. त्यामुळे अधिक काळ ठेऊ नये.

(वाचा – बरगड्या दुखेपर्यंत खोकला येतोय का? करा हे घरगुती उपाय मिळेल त्वरीत आराम)

​फूड पॉईझनिंगचा धोका​

​फूड पॉईझनिंगचा धोका​

३-४ दिवसापेक्षा अधिक अन्न ठेऊन ते सेवन केल्यास, तुम्हाला फूड पॉईझनिंगचा धोकाही संभवतो. यामध्ये असलेल्या बॅक्टेरियामुळे पदार्थांची चव, स्वाद, गंध आणि रंग काहीच बदलत नाही आणि त्यामुळे हे सुरक्षित आहे की नाही याचा अंदाज कोणालाच येत नाही. पण याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसतो.

हेही वाचा :  युक्रेनवर का केला हल्ला? मुळचे भारतीय रशियाचे खासदार डॉ. अभय कुमार सिंह यांचा खुलासा

​कोणते अन्न किती काळ फ्रिजमध्ये राहते?​

​कोणते अन्न किती काळ फ्रिजमध्ये राहते?​
  • कोणतेही फळ कापल्यानंतर ६ ते ८ तासानंतर खाता कामा नये
  • फ्रिजमध्ये शिजवून ठेवलेल्या भाज्या या २४ तासांच्या आत खाव्या अन्यथा आरोग्यावर वाईट परिणाम होतो
  • जास्त झालेला भात तुम्ही फ्रिजमध्ये ठेवल्यास, २ दिवसांच्या आत संपवावा
  • मळलेली कणीक फ्रिजमध्ये २४ तासांपेक्षा अधिक ठेऊ नये. यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊन कणीक आंबट होते
  • तयार केलेली पोळी (चपाती) १२ ते १४ तासानंतर फ्रिजमध्ये ठेऊ नये. तोपर्यंत ही चपाती नक्कीच चांगली टिकून राहाते आणि खाताही येते

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …