Rose Day: चुकूनही देऊ नका बायको व गर्लफ्रेंडला एकाच रंगाचं गुलाब, वाचा प्रत्येक रंगाचा अर्थ मग करा निवड नाहीतर

नवीन वर्ष सुरू झाले आणि फेब्रुवारी महिना जवळ येऊ लागला की वेध लागतात Valentine Day 2023 चे! अर्थात समस्त प्रेमी युगुलांचा प्रेम व्यक्त करण्याचा हा खास आठवडा! दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस व्हेलेंटाईन डे म्हणून जगभरात साजरा केला जातो. जगभरातील जोडपी विविध पद्धतीने व्हेलेंटाईन चा आठवडा साजरा करतात. आपल्या भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणावर Valentine week 2023 साजरा केला जातो. ज्यामध्ये 7 तारखेपासूनच विविध डे अर्थात दिवस असतात जसे की यंदा 7 फेब्रुवारी रोजी पहिला दिवस आहे Rose Day 2023 म्हणजेच गुलाबाचा देऊन प्रेम व्यक्त करण्याचा दिवस!

प्रेयसी वा प्रियकरच नाही तर नवरा आणि बायको सुद्धा या दिवशी आपल्या जोडीदाराला गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. तुम्हा वाचकांपैकी देखील बरेच जण हा दिवस साजरा करणार असालच, पण मंडळी आपल्या जोडीदाराला गुलाब देण्याआधी तुम्हाला गुलाबाचे रंगानुसार वेगवेगळे अर्थ माहित असणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही ज्या रंगाचा गुलाब देता त्यानुसार त्या व्यक्तीबद्दलच्या तुमच्या मनात असलेल्या भावना प्रतीत होत असतात. रंग चुकला तर त्याचा अर्थही चुकू शकतो आणि तुमच्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहचू शकत नाहीत. (फोटो सौजन्य :- iStock, freepik.com)

लाल गुलाब

लाल गुलाब

जर तुम्हाला तुमच्या जोडीदारापर्यंत वा तुम्हाला जी व्यक्ती आवडते तिच्यापर्यंत तुमचे प्रेम पोहोचवायचे असेलं तर तुम्ही रोझ डे च्या दिवशी त्या व्यक्तीला लाल रंगाचा गुलाब द्यायला हवा. लाल रंगाचा गुलाब हा प्रेमाचे प्रतिक म्हणूनच ओळखला जातो आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला लाल रंगाचा गुलाब देता तेव्हा त्यातून तुमचे त्या व्यक्तीवर असणारे नितांत प्रेमच दिसून येते.

हेही वाचा :  Crime News : व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी नको ते करु बसला; सेलिब्रेशन आता जेलमध्ये

(वाचा :- लग्न नाही प्रेमावर विश्वास ठेवला अन् श्रद्धाच्या शरीराचे झाले 35 तुकडे, प्रेमात बुडालेल्यांनो जागे व्हा कारण..​

पिवळा गुलाब

पिवळा गुलाब

अनेक जण रोझ डे च्या दिवशी पिवळ्या रंगाचे गुलाब देखील देतात. याचा अर्थ काय? तर मंडळी हे गुलाब म्हणजे मैत्रीचे गुलाब आहे. हे गुलाब देण्यामागे खास असा अर्थ दडला असतो की तुम्हाला त्या व्यक्तीशी मैत्री करायची आहे.. ज्या व्यक्तीशी मैत्री करण्याची तुमची इच्छा आहे त्या व्यक्तीला पिवळ्या रंगाचे गुलाब देऊन माझ्याशी मैत्री करू शकता का का अशी विचारणा करु शकता. जर समोरच्या व्यक्तीने तुमचे गुलाब स्वीकारले तर त्या व्यक्तीला तुमची मैत्री मान्य आहे असा त्याचा अर्थ असतो.

(वाचा :- आमिर खान, सामंथा, मानसी नाईक मोठमोठ्या कलाकारांचे लग्न ठरले फेल, यातून धडा घेऊन या 5 चुकांकडे करू नका दुर्लक्ष)​

केशरी गुलाब

केशरी गुलाब

बाजारात उपलब्ध असेल्या केशी गुलाबाला देखील व्हेलेंटाईन विक मध्ये रोझ डे च्या दिवशी खूप मागणी असते आणि एका खास अर्थासाठी हा गुलाब दिला जातो. एखाद्या व्यक्तीबाबत असलेली महत्त्वकांक्षा तुम्ही केशरी रंगाच्या फुलातून व्यक्त करू शकता. हे गुलाब सहसा प्रेमासाठी नाही तर आदराच्या भावनेने दिले जाते. म्हणजे तुम्हाला आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही केशरी रंगाचे फुल देऊ शकता. तुम्हाला त्यांच्याकडून ज्या गोष्टी शिकायला मिळत आहेय त्याबद्दलची तुमची कृतज्ञता तुम्ही यातून व्यक्त करू शकता.

हेही वाचा :  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग? प्रकृती गंभीर

(वाचा :- फेसबुकवर मैत्री अन् त्याने केलं थेट प्रपोजच, मी नाही म्हटलं..पण पुढे जे घडलं ते स्वप्नातही विचार न करण्यासारखं)​

गुलाबी गुलाब

गुलाबी गुलाब

प्रेम आणि मैत्री यामधील सीम दर्शवणारे गुलाब म्हणजे गुलाबी रंगाचे गुलाब होय. म्हणजे आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असते पण आपण प्रेमाच्या दुनियेत तिच्यासिबत जायला तयार आहोत का याबद्दल अजून खात्रीशीर नसतो तेव्हा ह्या रंगाचे गुलाब दिले जाते. एखाद्या व्यक्तीबाबत तुमच्या मनात प्रेमाची भावना नसेल पण त्या व्यक्तीबाबत अजून जाणून घेण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याला गुलाबी रंगाचे फुल देऊ शकता. साधारणपणे तरुणींना गुलाबी रंग हा खूप जास्त आवडतो. शिवाय पहिल्यांदा डेटवर जाताना एखाद्याला गुलाबी रंगाचे फुल देणं चांगले लक्षण मानले जातं. लगेचच पहिल्या भेटीत लाल रंगाचे गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करण्यापेक्षा स्टेट बाय स्टेप प्रेमापर्यंत पोहोचणे कधीही चांगलेच नाही का?

(वाचा :- या 5 प्रकारच्या मुलांवर अक्षरश: वेड्यासारखं प्रेम करते बायको,नवरा म्हणेल तिच त्यांच्यासाठी पूर्व व पश्चिम दिशा)​

पांढरा गुलाब

पांढरा गुलाब

तुम्हाला तर माहित आहेच की पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. तुमचे एखाद्या व्यक्तीशी भांडण, वाद किंवा कोणताही गैरसमज झाला असेल आणि तुम्हाला हे प्रकरण संपवायचे असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे गुलाब देऊन विषय संपवू शकता. तुम्हाला तुमच्या नात्यातील वाद संपवायचा असल्यास पांढऱ्या रंगाचे गुलाब देऊन तुम्ही पुन्हा एकदा पॅच अप करु शकता. कारण पांढरा रंग हा क्षमा भावनेचे प्रतीक आहे.

हेही वाचा :  त्वचेशी संबंधित 'या' समस्यांचे कारण कोरोना असू शकतो, वाचा डॉक्टरांचे मत

(वाचा :- नणंदेवर प्रेम जडलं म्हणून जगाला दाखवण्यापुरतं केलं नव-याशी लग्न, पण पुढे जे झालं ते अक्षरश: हादरवून सोडणारं..!)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …