Pariksha Pe Charcha : PM मोदी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद, मुलांना गुरुमंत्र देताना पालकांना दिला ‘हा’ सल्ला

Pariksha Pe Charcha With Narendra Modi : विद्यार्थ्यांनी वेळेचं व्यवस्थापन करा, यश नक्की मिळेल असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी देशभरातल्या विद्यार्थ्यांना दिला. पंतप्रधानांनी आज एकाच वेळी तब्बल 38 लाख विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला. पालकांनी सामाजिक अपेक्षांचा दबाव विद्यार्थ्यांवर टाकू नये असा सल्ला त्यांनी पालकवर्गाला दिलाय. पालकांच्या अपेक्षा चूक नाहीत. अगदी राजकारण्यांवरही अपेक्षांचं ओझ असतं असा टोला त्यांनी मारला. (Pariksha Pe Charcha News in Marathi)

पंतप्रधान मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम झाला. (Pariksha Pe Charcha ) नवी दिल्ली येथून सर्व शाळांमधील इयत्ता 6 वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद  साधला. यावेळी त्यांनी एकाचवेळी 38 लाख विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला. त्यावेळी हा सल्ला दिला. पंतप्रधांनाच्या देशव्यापी शाळेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातून तर  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातून सहभागी झाले.  ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 23 मधून ऑनलाईन सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी स्वत: पहिली ते सातवीपर्यंत या शाळेत शिक्षण घेतल आहे.

हेही वाचा :  कर्नाटक जिंकण्यासाठी मोदींचा मेगाप्लान! फक्त सहा दिवसांत पार पडणार तब्बल 15 सभा आणि रोड शो

सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी हे धोकादायक

परीक्षेचा ताण टाळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना गुरुमंत्र दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘परीक्षा पे चर्चा’ ही माझीही परीक्षा आहे आणि देशातील करोडो विद्यार्थी माझी परीक्षा देत आहेत. मला ही परीक्षा देताना आनंद होतो. प्रत्येकाच्या कुटुंबांला आपल्या मुलांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, परंतु केवळ सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी असेल तर ते धोकादायक ठरते.

‘आमच्यावर राजकारणातही दबाव असतो’ 

 तुमच्याप्रमाणे आम्हालाही आमच्या राजकीय जीवनात अशा दबावाचा सामना करावा लागतो. निवडणुकीत कितीही चांगले निकाल लागले तरी नेहमीच चांगले परिणाम अपेक्षित असतात. काळजी करु नका, फक्त आरामशीर आणि आनंदी राहून तुम्ही तुमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. पण या दबावाला आपण बळी पडू नये का? त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या उपक्रमाकडे लक्ष दिले तर तुम्हीही अशा संकटातून बाहेर पडाल, अशी आशा मोदी यांनी व्यक्ती केली.

स्वतःमध्ये पाहा आणि आत्मपरीक्षण करा. तुम्ही तुमची क्षमता, तुमच्या आकांक्षा, तुमचे ध्येय तुम्हीच ओळखले पाहिजे आणि मग त्यांना तुमच्याकडून इतर लोकांच्या अपेक्षांनुसार अधोरेखित करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन शिकणे महत्त्वाचे आहे. केवळ परीक्षेसाठीच नाही तर जीवनातही वेळेच्या व्यवस्थापनाचे भान ठेवायला हवे. वेळेवर कामे होत नसल्याने कामे रखडतात. काम करून कधीच थकत नाही, काम करून समाधान मिळते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

हेही वाचा :  संसदेचं विशेष अधिवेशन: 5 दिवस, 5 प्रश्न, 5 शक्यता... मोदी सरकार आता कोणता धक्का देणार?

याची काळजी वाटते !

कष्टकरी मुलांना काळजी वाटते की, मी मेहनत करतो आणि काही लोक चोरी करून त्यांची कामे करुन घेतात. हा जो मूल्यांमध्ये बदल आलाय तो समाजासाठी घातक आहे. आता  जगणेही बदलले आहे, जग बदलले आहे. आज प्रत्येक पावलावर कसोटी लागते. अनुकरणाने जीवन घडवता येत नाही, असे मोदी म्हणाले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …