Soaking Nut: भिजवून खा हे 5 पदार्थ एनर्जी वाढेल, थकवा व मेंदूचे रोग नष्ट होऊन चित्त्याच्या वेगाने धावेल बुद्धी

खाण्याच्या बाबतीत तुम्ही ‘सुपरफूड्स’ हा शब्द ऐकला किंवा वाचला असेल. हा नक्की काय प्रकार आहे आणि त्याचा नक्की फायदा काय हे तुम्हाला माहिती आहे का? ही संज्ञा अशा अन्नपदार्थांसाठी वापरली जाते जे भरपूर पोषक तत्वांनी भरलेले असतात आणि कॅलरीजने कमी असतात किंवा व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. सुपरफूडच्या यादीत समाविष्ट असलेल्या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीरातील पौष्टिकतेची कमतरता टाळता येते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

जर तुम्ही विचार करत असाल की सुपरफूडच्या यादीतील सर्वोत्तम खाद्यपदार्थ कोणते तर मंडळी ते आहेत ड्राय फ्रूट्स आणि नट्स! फॅट टू स्लिमच्या संचालिका आणि न्यूट्रिशनिस्ट व डायटीशियन शिखा अग्रवाल शर्मा यांच्या मते, ड्रायफ्रुट्स किंवा नट्स खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यात शंका नाही, पण भिजवून खाल्ल्यास त्यांची क्षमता दुप्पट होते. चला जाणून घेऊया की भिजवल्यानंतर कोणत्या गोष्टी खाल्ल्याने तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. (फोटो सौजन्य :- iStock)

भिजवलेले बदाम

भिजवलेले बदाम

बदाम हे व्हिटॅमिन ई आणि बी6 चा उत्तम स्रोत आहे. हे मेंदूच्या पेशींमध्ये प्रथिने शोषण्यास मदत करते. बदाम हे ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिडचे भांडार आहेत, जे मेंदूला चालना देतात. 5-7 बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी सोलल्यानंतर खा. बघा तुम्हाला खूप जास्त फरक दिसून येईल.

हेही वाचा :  बिबट्याचा मर्सिडीज प्रवास... १२ तासांचा थरारक अनुभव कॅमेऱ्यात कैद

(वाचा :- शौचाच्या जागी गाठ व ब्लीडिंग होते? मुळव्याध आहे की कोलोरेक्टल कॅन्सरची सुरूवात, असा ओळखा दोन्ही लक्षणांतला फरक)​

भिजवलेले मनुके

भिजवलेले मनुके

काळ्या मनुकांमध्ये भरपूर फायबर असते आणि जर तुम्ही सकाळी हे मनुके सेवन केले तर आतड्याची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध टाळण्यास मदत होते. भिजवलेले मनुके पॉलिफेनॉल आणि फायटोन्यूट्रिएंट्स सारख्या अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असतात.

(वाचा :- डायबिटीज व कॅन्सरचा धोका 100% वाढवतात हे 5 पदार्थ, हेल्दी समजून खाण्याची अजिबात करू नका चूक – डॉक्टरांचा सल्ला)​

भिजवलेले अक्रोड

भिजवलेले अक्रोड

झोपण्यापूर्वी अर्धा कप पाण्यात दोन मोठे अक्रोड भिजवून सकाळी सकाळी सेवन करा. अक्रोड तुमची मेंदूची शक्ती, स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतो. मुलांचे आकलन तीक्ष्ण करण्यासाठी आणि त्यांची वैयक्तिक कौशल्ये सुधारण्यासाठी, त्यांना नक्कीच अक्रोड खायला द्या.

(वाचा :- Diabetes Symptoms : हे 6 अवयव ओरडून सांगतात तुम्हाला झालाय डायबिटीज, लक्ष न दिल्यास Blood Sugar चा होईल स्फोट)​

भिजवलेले अंजीर

भिजवलेले अंजीर

जर तुम्ही अपचन, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध यांसारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर अंजीर तुमच्यासाठी रामबाण आहे. अंजीर आतडे स्वच्छ करण्याचा एक चांगला मार्ग आहे. त्यात विरघळणारे आणि अघुलनशील अशा दोन्ही प्रकारचे फायबर असतात. यामुळे तुमची पचनक्रिया निरोगी राहते.

हेही वाचा :  विषारी किड्याला हात लावताच हार्टअटॅक, प्रसिद्ध अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक

(वाचा :- लघवीत जळजळ झाल्यास समजून जा तुम्ही केली आहे ही मोठी चूक, किडनी, पोट, आतड्यांत जमा झालाय विषारी पदार्थांचा साठा)​

भिजवलेला पिस्ता

भिजवलेला पिस्ता

पिस्ते भिजवल्याने ते मऊ होतात आणि त्यांचे पौष्टिक मूल्य वाढते. सकाळी पिस्ता आणि अक्रोड सारख्या नट्सचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. पिस्ता फायबरने देखील समृद्ध असतात आणि आपल्या पाचन आरोग्यासाठी देखील उत्तम फायदे देतात.
(वाचा :- शास्त्रज्ञांचा अजब दावा – अंड्याचा हा एक भाग आहे अत्यंत विषारी, या 5 प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नयेत Eggs)
डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

Ravindra Waikar :  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी …