बायकोशी झालेलं भांडण न संपवता तुम्हीही झोपता? मग आहात भयंकर वाटेवर, या 5 लोकांचे अनुभव ऐकून फुटेल दरदरून घाम

प्रत्येक विवाहित जोडपे एकमेकांशी भांडतात आणि वाद घालतात यात काही शंकाच नाही. ही एक सामान्य गोष्ट आहे. कारण जिथे खूप प्रेम असते तिथे तर छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावणे होतेच. भांडणांशिवाय असलेले प्रेम वा संसार काय कामाचा? इतकेच नाही तर रिलेशनशिप एक्सपर्टसुद्धा जोडप्यांमधील किरकोळ भांडणांना चुकीचे मानत नाहीत. होय, पण ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे की ही भांडणे वेळीच मिटली पाहिजेत, जर एका दिवसाचे भांडण आठवडा झाले वा कित्येक दिवस झाले तरी मिटत नसेल तर ही एक मोठी समस्या आहे.

जर असे होत असेल तर प्रत्येक जोडप्याने आपल्या नात्याबाबत गंभीरतेने विचार करण्याची वेळ आली आहे हे समजून जावं. इतकंच नाही तर दिवसभर भांडण करूनही जर जोडपं रागावून झोपायला गेले तर समजा प्रकरण हाताबाहेर गेले आहे. पण इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा हा आहे की खरंच असं होतं का? खरं तर, काही लोकांचं म्हणणं आहे की पती-पत्नीने रागाच्या भरात झोपणे अजिबात चुकीचे नाही. तुम्ही दोघे एक जोडपे म्हणून स्वतंत्रपणे झोपू शकता. यामुळे तुमचे नाते केवळ मजबूतच होत नाही तर तुम्हाला तुमच्या नात्यात काय उणीव आहे याचीही एकमेकांपासून लांब राहिल्याने जाणीव होते. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  समान नागरी कायद्याला ठाकरे गटाचा पाठिंबा? संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "हिंदू, मुस्लीम...."

मी एकटी राहू इच्छिते

मी एकटी राहू इच्छिते

32 वर्षीय नंदिनी सांगते की, माझ्या पतीसोबत माझे मोठे भांडण झाले असेल, तर वाद संपल्यानंतर मी थोडा वेळ शांत राहते. कारण या काळात मला एकटे राहायला आवडते. मला शांत होण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. पण काहीवेळा माझ्या जोडीदाराला हे समजत नाही, त्यानंतर भांडण वाढत जाते. त्याचे म्हणणे असते की मी लगेच नीट व्हावे आणि भांड संपवावे. पण मला काही गोष्टींचा विचार करायला वेळ लागतो आणि तो वेळ त्याने द्यावे असे माझे मत आहे.

(वाचा :- सतत एक विचित्र प्रश्न विचारून सासरच्यांनी केलाय अक्षरश: जीव नकोसा, अट पूर्ण न केल्यामुळे लावतायत घाणेरडे आरोप)

रागात झोपी जाणे फायद्याचे आहे

रागात झोपी जाणे फायद्याचे आहे

29 वर्षीय पियुष म्हणतो की काही जोडपी भांडण झाल्यावर एकमेकांचा खूप राग धरतात, आणि ही अगदी खरी गोष्ट आहे. कारण काही काळ एकमेकांपासून दूर गेल्यावरच प्रेम कळते आणि वाढते. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी जितका जास्त वेळ बोलणार नाही तितकाच तो तुम्हाला हवाहवासा वाटेल. इतकेच नाही तर कधी कधी रागावून झोपणे हा सर्वात जास्त भांडण करणाऱ्यांसाठी खूप चांगला धडा आहे. त्यामुळे या गोष्टीमुळे जास्त काही गोष्टी बिघडतातच असे नाही तर अनेकदा प्रेम देखील वाढते.

हेही वाचा :  Amruta Fadanvis Video : उपमुख्यमंत्र्यांचीच पत्नी करते सरकारी प्रॉपर्टीचा गैरवापर, अमृता फडणवीस ट्रोल

(वाचा :- वेटलॉस या एक शब्दामुळे आमचं नातं आहे कोर्टाच्या पायरीवर उभं, नव-याने बाबांदेखत काढलं बेडरूममधून बाहेर, मग नंतर)

तुम्ही स्वत: नात्यात दुरावा निर्माण करताय

तुम्ही स्वत: नात्यात दुरावा निर्माण करताय

43 वर्षीय सारिका म्हणते की, रागाने झोपलेले जोडपे हे दर्शवतात की त्यांच्यात संवादाचा अभाव आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी याबद्दल वेळीच संवाद साधून गोष्टी सुरळीत केल्या नाहीत तर यामुळे तुमच्यातले अंतर वाढू शकते. विनाकारण गोष्टी ताणून ठेवण्यापेक्षा प्रकरण ताबडतोब निकाली काढणे चांगले. त्यामुळे अजिबात राग धरून नका कारण यामुळे तुमच्याच नात्याला धोका निर्माण होतो आणि तुम्हीच तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेता.

(वाचा :- लग्नाआधी बायकोविषयी काही माहीत नव्हतं, नंतर समोर आलं खरं भयाण रूप, आता मी अडकलोय)

रागाने झोपी जा

रागाने झोपी जा

35 वर्षीय ओझसचे म्हणणे आहे की, जर तुम्ही अशा प्रकारची व्यक्ती असाल जी भांडण झाल्यावर खूप भावूक होत असेल तर सर्वकाही सोडून रागाने झोपी जाणे चांगले. दुसर्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही दोघे शांत असाल आणि भांडण बोलून सोडवण्यास तयार असाल तेव्हा तुमच्या जोडीदाराशी या समस्येबद्दल बोला. नक्कीच याचा सकारात्मक परिणाम होईल आणि कोणत्याही नव्या वादाशिवाय आणि मानसिक त्रासाशिवाय तुमचे भांडण संपेल.

हेही वाचा :  सिरियल्स बघून माझ्या सासूचं फिरलंय डोकं, अशी कारस्थानं करते ज्याची तुम्ही कल्पनाही करणार नाही

(वाचा :- माझी कहाणी : मी एका मुलीच्या प्रेमात ठार वेडा झालोय, पण तिचं सत्य समजल्यापासून मला मोठा धक्काच बसलाय, काय करू?)

नात्यात रस नाही

नात्यात रस नाही

38 वर्षीय आनंदिता म्हणते की, माझ्या जोडीदाराने समस्या सोडवल्याशिवाय झोपण्याचा प्रयत्न केला तर मला खूप राग येतो. आपण दोघे एकमेकांवर किती रागावलो आहोत हे महत्त्वाचे नाही. झोपण्यापूर्वी समस्या सोडवणे खूप महत्वाचे आहे. माझा विश्वास आहे की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जर भांडण संपले नाही वा एकमेकांवरचा राग गेला नाही तर याचा अर्थ असा की नात्यात रस उरलेला नाही आणि ही गोष्ट खूप वाईट आहे.

(वाचा :- गडगंज श्रीमंत अंबानी घराण्याची सून होण्यासाठी श्लोका व राधिकाने दिल्या या परीक्षा, मगच मिळाली कुटुंबात एंट्री)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …