Diabetes Remedy : घरातील झाडांची ही पानं तोडून रोज उपाशी पोटी पाण्यात घालून प्या, कधीच वाढणार नाही Blood Sugar

मधुमेह हा एक गंभीर आणि कोणताही कायमस्वरूपी उपाय नसलेला आजार आहे. भारतात ब्लड शुगरमुळे होणारा हा आजार झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळेच भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जात आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, भारतात अंदाजे 18 वर्षे वयापेक्षा जास्त वय असणारे 77 मिलीयनपेक्षा जास्त लोकांना मधुमेहाची (टाइप 2) लागण झाली आहे आणि त्याच्याशी ते लढा देत आहेत तर सुमारे 25 मिलीयन लोक प्री-डायबिटीज (पुढील काळाज भविष्यात मधुमेह होण्याचा धोका आहे) आहेत.

दुर्दैवाने, मधुमेहावर कोणताही कायमस्वरूपी इलाज नाही आणि म्हणूनच तो नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. डायबिटीजच्या प्राणघातक स्वरूपामुळे शरीरातील अनेक अवयवांचे नुकसान होऊ शकते आणि मृत्यूही होऊ शकतो. मधुमेह प्रतिबंधक उपायांमध्ये निरोगी आहाराचा समावेश आहे म्हणजेच लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचे सेवन आणि नियमित व्यायाम केला तर मधुमेह आटोक्यात राहू शकतो. (फोटो साभार :- TOI, iStock)

करू शकता घरगुती उपाय

करू शकता घरगुती उपाय

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक घरगुती उपाय देखील आहेत, ज्यांचा औषधांसोबत वापर केल्यास फायदा होऊ शकतो. असाच एक उपाय म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या विविध प्रकारची झाडे आणि वनस्पतींची पाने होय. नॉएडातील ई-260 सेक्टर 27 मधील कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिकचे डायरेक्टर डॉक्टर कपिल त्यागी यांनी याच अनुषंगाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे आणि त्यांनी सभोवताली आढळणाऱ्या झाडपालांच्या योग्य वापराने रक्तातील साखर कशी कमी करता येते ते सांगितले आहे.
(वाचा :- 101 किलोच्या मुलाने Weight Loss साठी लढवली ही शक्कल, सिक्स पॅक्समध्ये बदलली शरीरातील सर्व चरबी, मौल्यवान टिप्स)

हेही वाचा :  Weight Loss Story : २५ वर्षातच जडला टाईप२ चा डायबिटिस, तब्बल २ महिन्यात घटवलं १० किलो वजन

कडीपत्ता

कडीपत्ता

कडीपत्त्याचा वापर सामान्यतः भारत आणि शेजारील देशांमध्ये आहारातच केला जातो. एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार, डायबिटीजच्या बाबतीत कडीपत्त्याचे सेवन रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कडीपत्त्यात फायबर आढळते आणि फायबर पचनाची गती संथ करण्यास साहाय्य करते आणि यामुळे चयापचय लवकर होत नाही, ज्यामुळे तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहते. कडीपत्ता इन्सुलिन वाढवण्याचेही काम करते बरं का!

(वाचा :- थंडीत सांध्याचा चिकटपणा सुकल्याने होते जीवघेणी गुडघेदुखी, या १५ भाज्या गुडघ्यातील ग्रीस वाढवून वेदना करतात दूर)

तुळशीची पाने

तुळशीची पाने

तुळशी ही वनस्पती आयुर्वेदातील सर्वात शक्तिशाली औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. या वनस्पतीला केवळ धार्मिक महत्त्व नाही तर अनेक गंभीर आजारांशी लढण्याची क्षमता सुद्धा तिच्यात आहे. डायबिटीज नियंत्रण ठेवायचा असेल तर तुळस पाण्यात उकळून प्यावी. तुळशीच्या पानांचा रस रक्तातील साखरेची वाढलेली पातळी कमी करण्यास खूप मदत करतो.

(वाचा :- बापरे, नसांमध्ये कॉलेस्ट्रॉल साचल्यास येतो हार्ट अटॅक,नसा व आतड्यातून कोलेस्ट्रॉल झटक्यात बाहेर फेकतात हे उपाय)

इन्सुलिन वनस्पतीची पाने

इन्सुलिन वनस्पतीची पाने

डायबिटीजच्या रुग्णांसाठी इन्सुलिन प्लांट (कॉस्टस इग्नियस) एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. एनसीबीआयच्या NCBI एका अभ्यासानुसार, या वनस्पतीच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. या वनस्पतीच्या पानांचे सेवन करणाऱ्या मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.

हेही वाचा :  Unusual Symptoms of Diabetes : सावधान, ‘ही’ 5 विचित्र लक्षणे दिसल्यास व्हा ताबडतोब सावध, असू शकते डायबिटीजची सुरूवात, दुर्लक्ष केल्यास होईल पश्चाताप!

(वाचा :- Remedies for Cough : घसा व छातीतील जमा कफ बाहेर फेकून कोरडा व ओला खोकला होईल कायमचा छुमंतर, फक्त करा हे 6 उपाय)

आंब्याची पाने

आंब्याची पाने

आंब्याच्या पानांमध्ये मॅंगिफेरिन हे एन्झाइम असते ज्यामध्ये अल्फा ग्लुकोसिडेस प्रतिबंधित करण्याची क्षमता असते, जे आतड्यांतील कार्बोहायड्रेट चयापचय कमी करण्यास मदत करते आणि रक्तातील साखर वाढण्यापासून रोखते. आंब्याच्या पानांमध्ये इन्सुलिन वाढवण्याची आणि ग्लुकोज नियंत्रित करण्याची क्षमता असते. आंब्याच्या पानांमध्ये पेक्टिन, व्हिटॅमिन सी आणि फायबर देखील असतात. आंब्याची पाने मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल या दोन्हींसाठी फायदेशीर आहेत.

(वाचा :- Lung Cancer Symptoms: फुफ्फुसांत दिसली ही लक्षणं तर समजून जा झालाय लंग कॅन्सर, फक्त 5 महिनेच जगण्याचे चान्सेस)

पेरूची पाने

पेरूची पाने

NCBI वर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, पेरूच्या पानांचा रस रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतो. एक संधोधन असे दर्शविते की पेरूच्या पानांचा रस अल्फा-ग्लुकोसिडेसची क्रिया रोखू शकतो, अल्फा-ग्लुकोसिडेस हे एक एन्झाइम आहे जे स्टार्च आणि अन्य कार्बोहायड्रेट्सना ग्लुकोजमध्ये परावर्तीत करते. पेरूची पाने गरम पाण्यात उकळून चहाप्रमाणे पिऊ शकता.
(वाचा :- सकाळी उठून ही कामे केल्याने रॉकेटच्या स्पीडने धावतो मेंदू, वयाच्या शंभरीपर्यंत स्मरणशक्तीला धक्काही लागत नाही)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  Flax Seeds For Diabetes : साखर कंट्रोल करण्यासाठी अळशी गुणकारी, इन्सुलिन घ्यावच लागणार नाही

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …