Interesting Fact: पाणी का आहे शरीरासाठी आवश्यक, हायड्रेटेड राहण्याची ७ सोपी कारणे

माणसाच्या शरीरात साधारणतः ७० टक्के भाग हा पाण्याचा असतो असं आपल्याला लहापणापासूनच शिकवलं जातं. आरोग्यतज्ज्ञही निरोगी राहण्यासाठी दिवसातून ८-१० ग्लास पाणी प्यावे असा सल्ला देतात. पाणी पिण्याने केवळ तहानच भाग नाही तर आरोग्य निरोगी राहण्यासह त्वचाही चांगली राहण्यास मदत मिळते. शरीराच्या सर्व अंगांना आपली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाण्याची गरज भासते. पाणी हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग असून पोषक तत्व आणि ऑक्सिजन पुरविण्याचे काम करते. पाणी कमी प्यायल्यावर डिहायड्रेशनची समस्या होते आणि यामुळेच अनेक गंभीर आजारांनाही सामोरे जावे लागते. या लेखातून शरीरासाठी पाणी का आवश्यक आहे आणि हायड्रेटेड नक्की का राहावे याची ७ सोपी कारणे सांगत आहोत.
(फोटो क्रेडिटः Pexels)

एनर्जी वाढविण्याचे काम पाणी करते

डिहायड्रेशन रक्तप्रवाह आणि मेंदूला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या गोष्टीला प्रभावित करते. पाणी कमी प्यायल्याने तुमच्या संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवठा पंप करायला अत्यंत कठीण होते. त्यामुळे तुम्हाला थकायला झाल्यासारखे आणि आळशीपणा आल्यासारखे वाटते. त्यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात पाणी प्यावे. यामळे थकवा कमी होतो आणि एनर्जी कायम राहाते. तसंच पाणी प्यायल्याने मेटाबॉलिजम जलद होते आणि तुमच्या शरीरातील स्फूर्ती टिकून राहाते अर्थात दिवसभर एनर्जी टिकून राहाते.

हेही वाचा :  लवकरच 3 Days Week Working? 3 दिवस काम 4 दिवस सुट्टीबद्दल बिल गेट्स म्हणाले, 'असं झाल्यास..'

​मेंदू अधिक गतीने चालतो ​

पाणी प्यायल्याने आपला मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत राहोत. यामुळे मेंदूतील ऊर्जा आणि क्षमताही वाढण्यास मदत मिळते. आपल्या मेंदूचा ७५ ते ८५ टक्के भाग हा पाण्याचा असतो असे तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे आवश्यक प्रमाणात पाणी पिऊन तुम्ही मेंदूला तरतरी आणू शकता. यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत मिळते.

पचनशक्ती चांगली राहाते

खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचविण्यासाठी शरीराला पाण्याची गरज भासते. पाणी कमी झाल्यास, पोटात गॅस, बद्धकोष्ठता, सूज येणे अशा समस्यांना सतत सामोरे जावे लागते. पाणी पिऊन हायड्रेटेड राहिल्यामुळे पोटातील पचनक्रिया योग्य होते आणि पचनसंबंधित त्रासातून सुटका होते.

​डोकेदुखी आणि मायग्रेनपासून सुटका​

अनेक जणांना डोकेदुखी आणि मायग्रेनचाही त्रास असतो. डिहायड्रेशन हे त्याचे कारण असू शकते. ज्या व्यक्तींना सतत डोकेदुखीचा अथवा मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी नियमित पाण्याचे सेवन करायला हवे. लक्षात ठेऊन दिवसभर पाणी पित राहावे.

​बद्धकोष्ठतेपासून सुटका ​

अनेक जणांना अन्नपचन नीट न झाल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते आणि अशावेळी शौचाला खूपच त्रास होतो. बद्धकोष्ठता झाल्यास, डॉक्टर जास्त पाणी आणि पातळ पदार्थांचे सेवन करायला सांगतात. पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि त्यामुळे बद्धकोष्ठेतपासून सुटका मिळते.

हेही वाचा :  मनोज साने Dating App वरही सक्रीय; सापडले 'ते' चॅट! इतर महिलांशीही होते संबंध?

​किडनी स्टोनच्या समस्येतून सुटका​

पाणी पिऊन किडनी स्टोनची समस्याही सुटते. यामध्ये होणारा त्रास हा असह्य असतो. पण जितके पाणी अधिक पिता येईल तितके प्यावे आणि त्यामुळे लघ्वीवाटे मुतखडा निघून जाण्यास मदत मिळते. किडनीच्या योग्य कार्यरत राहण्यासाठी पाणी नियमित योग्य प्रमाणात पिण्याची आवश्यकता आहे.

​वजन कमी करण्यास फायदेशीर​

पाणी पिऊन तुम्ही सहज वजन कमी करू शकता. पाणी पिण्याने मेटाबॉलिजम वाढतो आणि त्यामुळे जास्त कॅलरी कमी करता येते. याशिवाय पाण्याने पोट भरलेले राहते आणि भूक कमी लागते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो.

निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिऊन हायड्रेटेड राहणेही गरजेचे आहे. हायड्रेटेड राहून तुम्ही अनेक गंभीर समस्या आणि आजारांपासून दूर राहू शकता हे नक्की!

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

Ravindra Waikar :  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी …