लवकरच 3 Days Week Working? 3 दिवस काम 4 दिवस सुट्टीबद्दल बिल गेट्स म्हणाले, ‘असं झाल्यास..’

3 Day Workweek: अमेरिकेतील अनेक कंपन्या सध्या 4 डेज अ विक म्हणजेच आठवड्यातून 4 दिवसच काम करण्याच्या धोरणासंदर्भात विचार करत आहेत. एकीकडे इन्फोसेसचे अध्यक्ष नारायण मुर्ती यांनी काही आठवड्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये आठवड्यातून 70 तास काम करण्यासंदर्भातील मत व्यक्त केलेलं असतानाच अमेरिकेत मात्र उलट मतप्रवाह दिसत आहे. अशातच आता मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी एक पाऊल पुढे जात कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये 4 दिवसही काम करु नये असं विधान केलं आहे. 

एआयचा दिला संदर्भ

बिल गेट्स यांनी एआय म्हणजेच आर्टिफिशीएल इंटेलिजन्सचा वापर समाजावर कसा परिणाम करेल याबद्दल भाष्य केलं आहे. एआयच्या वापरामुळे मानवाला फार वेळ ऑफिसमध्ये कामं करावी लागणार नाहीत, असं बिल गेट्स म्हणाले. ट्रेव्हर नोव्हाने 21 नोव्हेंबर रोजी त्याच्य ‘व्हॉट्स नाऊ?’ या पॉडकास्टमध्ये बिल गेट्स यांची मुलाखत घेतली होती. याच वेळी बिल गेट्स यांनी हे विधान केल्याचं वृत्त 22 नोव्हेंबर रोजी ‘बिझनेस इनसायडर’ने दिली होती. 

हेही वाचा :  पुणेः मोबाईलच्या स्फोटात दहा वर्षांचा मुलगा जखमी, डोळ्याला गंभीर इजा

3 दिवस काम

“हळूहळू आपल्याला असा समाज मिळेल जिथे आपण आठवड्यातून केवळ 3 दिवस काम करत असू. माझ्या माते असं झाल्यास काही हरकत नाही,” असं गेट्स यांनी म्हटलं. एआयच्या मदतीने मशिन्सच ‘अन्न पदार्थ आणि इतर गोष्टी’ तयार करतील असंही गेट्स म्हणाले. मायक्रोसॉफ्टने आरोग्य विषयक डेटा आणि आर्टिफिशीएल इंटेलिजन्स टूल्सचा वापर सुरु केल्यापासून फारच सकारात्मक बदल दिसून आला आहे. या व्यवस्थापनासंदर्भातील बदलांमुळे आता रुग्णांसाठी डॉक्टरांना अधिक वेळ देता येतोय.

सतत बदलत रहावं लागणार

“एआयचा परिणाम औद्योगिक क्रांती इतका होईल, असं मला वाटतं नाही. मात्र कंप्युटर आल्यानंतर जसा परिणाम झाला तसा परिणाम होऊ शकतो. एमएस वर्ल्डसारख्या अॅप्लिकेशनमुळे ऑफिसमधून संपूर्ण लेखी काम संपलं असं झालं नाही. तर केवळ त्याची पद्धत बदलली. कर्मचारी आणि कंपन्यांना सतत बदलत राहावं लागणार आहे. असं यापूर्वीही त्यांनी केलं आहे,” अशी प्रतिक्रिया बिल गेट्स यांनी नोंदवली. 

लवचिकता सर्वात मोठा घटक

कोरोना कालावधीनंतर कामामधील लवचिकता हा सर्वात मोठा घटक राहणार आहे. खास करुन 4 दिवसांचा आठवडा असलेल्या कर्मचाऱ्यांना अधिक लवचिकता ठेवावी लागेल. बँकरेटने ऑगस्ट महिन्यात केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये 81 टक्के कर्मचाऱ्यांनी चार दिवसांचा आठवडा असावा असं मत नोंदवलं आहे. 4 दिवसांचा आठवडा असेल तर 89 टक्के लोक अधिक वेळ काम करण्यास, प्रत्यक्ष अधिक वेळ ऑफिसमध्ये उपस्थित राहण्यास किंवा अगदी कमी पगार घेण्यासही तयार असल्याचं सर्वेक्षणात दिसून आलं.

हेही वाचा :  "तुमचा अहंकार...," जेव्हा विमानात शेजारी बसलेल्या करिना कपूरवर नारायण मूर्ती झाले नाराज; जुना VIDEO व्हायरल

एवढ्या कमी दिवसांसाठी पगार देण्यास कंपन्यांचा नकार

कंपन्यांना चार दिवसांचा आठवडा कसा करता येईल याचा ताळमेळ साधावा लागणार आहे. ज्या दिवशी काम होणार नाही त्या दिवसांसाठी कर्मचाऱ्यांना पगार देण्याची कंपन्यांची इच्छा नाही, असं कॉर्न फेरी या कन्सल्टन्सीने म्हटलं आहे. कर्मचारी कपात किंवा पगार कमी करुन वाचलेला पैसा जे लोक काम करत आहेत त्यांना अधिक सुविधा देण्यासाठी वापरु शकतात. कंपन्या भविष्यात हा वाचवलेला निधी एआयमध्येही अधिक सक्षम कारभारासाठी वापरु शकतात.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …