जेलरमधील तमन्नाचा किलर लूक पाहिलात? शेअर केला फोटो

Tamannaah Bhatia: प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही बाहुबली-2 (Baahubali 2) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटामधील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. बाहुबली-2 मुळे तमन्नाला विशेष लोकप्रियता मिळाली. तमन्नाने दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आता ती लवकरच जेलर (Jailer) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

तमन्नाने जेलर या चित्रपटातील तिच्या किलर लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तसेच तमन्नाने या चित्रपटामधील इतर कलाकारांच्या लूकचे देखील फोटो शेअर केले आहेत. तमन्नाने हे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘शेवटी मी हे तुम्हा सर्वांसोबत शेअर करु शकले. थलायवा रजनिकांत आणि नेल्सन दिलीपकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या जेलर या चित्रपटाचा एक भाग होऊन मला खूप आनंद होत आहे.’ तमन्नाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

जेलरमध्ये अॅक्शनचा तडका

जेलर या चित्रपटात तमन्नासोबतच प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल, शिवराज कुमार, सुनील हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तमन्नाने या कलाकारांचा देखील लूक शेअर केला आहे. जेलर हा रजनिकांत यांचा 169 वा चित्रपट आहे. ‘जेलर’ सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

हेही वाचा :  नवाजुद्दीनच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

तमन्नाची पोस्ट


तमन्ना ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तमन्ना ही अभिनेता विजय वर्माला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. तमन्ना आणि विजय हे एका कार्यक्रमात एकत्र स्पॉट झाले. अजूनपर्यंत या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. विजय वर्मा याने गली बॉय आणि डार्लिंग्स या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  

तमन्नाचे चित्रपट

काही दिवसांपूर्वी तमन्नाचा बबली बाऊंसर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तसेच तिचा प्लॅन ए, प्लॅन बी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटात तमन्नासोबत रितेश देशमुख हा देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Amitabh Bachchan Video: बिग बींनी घेतली फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो अन् मेस्सीची भेट; व्हिडीओ शेअर करत म्हणाले…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …