स्वस्तात मिळणारा हिरवा मटार या पद्धतीने करा स्टोअर, वर्षभर टिकेल होणार नाही खराब

थंडीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हिरवा मटार फ्रेश आणि गोड मिळत. तसेच अनेक लोकं या सिझनमध्ये मटार स्टोअर देखील करून ठेवतात. ज्यामुळे तो पुढील वर्षभर वापरायला मिळतो. मात्र जर मटार योग्य पद्धतीने स्टोअर केला नाही तर तो खराब होतो, अक्षरशः तो स़ून जातो. तर काही मटारची चव देखील बिघडून जाते. अशावेळी मटार स्टोअर करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. ज्याच्या मदतीने तुम्ही मटार चांगल्यापद्धतीने स्टोर करू शकता. (फोटो सौजन्य – iStock)

​मटार साठवण्याअगोदर करा हे काम

मटार खराब होऊ नये किंवा वास येऊ नये असे वाटत असेल तर प्रथम मटार सुकवण्याचा प्रयत्न करा. कारण ओलाव्यामुळे मटार चिकट होतो आणि काही वेळाने मटार सडतात. म्हणूनच तुम्ही मटार सोलल्यानंतर धुवा किंवा धुवू नका. पण ते नंतर 2 ते 3 तास उन्हात ठेवा. मटार चांगले वाळल्यावरच रेफ्रिजरेटरमध्ये साठवण्यासाठी ठेवा.

​ग्लास कंटेनर ठरतो बेस्ट

चटणी किंवा सुंठाप्रमाणेच तुम्ही भाज्यांना देखील ग्लास कंटेनरमध्ये ठेवू शकता. हिरव्या मटारला स्टोअर करण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे तुम्ही थंडीत मिळणारा मटार ग्लास कंटेनरमध्ये ठेऊ शकता. मटार सोलून तुम्ही ग्लास कंटेनरमध्ये ठेऊन फ्रिजमध्ये ठेवू शकता.

हेही वाचा :  Cooking Tips: कश्याही करा पुऱ्या फुगतच नाहीत ? आता तक्रार नाही 'या' टिप्स वापरून तर पाहा

(वाचा – जळलेली, करपलेली कढई स्वच्छ करण्याच्या घरगुती टिप्स; अवघ्या काही मिनिटांत चकाकेल कढई)

​एअरटाइट कंटेनर किंवा पॉलिथीनमध्ये ठेवा

मटार स्टोअर करण्यासाठी सर्वाधिक उत्तम पद्धत म्हणजे एअरटाइट कंटेनर किंवा झिपर पॉलिथीन. असं केल्याने मटार ओल्याव्यापासून दूर राहतात. कंटेनरमध्ये भरून मटार फ्रिजमध्ये स्टोअर करू शकतात.

(वाचा – घरामध्ये पाल असेल तर होऊ शकतो गंभीर आजार, या घरगुती उपायांनी पळवून लावा पालीला))

या पद्धतीने करा साठवणूक

अशा वेगवेगळ्या पद्धतीने मटार स्टोअर करू शकतात. पण हे मटार स्टोअर केल्यानंतर भाजीकरता बाहेर काढल्यावर काही गोष्ट आवर्जून कराव्यात. अन्यथा या मटारची भाज थोडी कडक होऊ शकता.

  • मटार फ्रिजमध्ये ठेवल्यावर तो पाण्यात ठेवावा
  • हे पाणी थोड्यावेळाने गार होते
  • ते पाणी फेकून तुम्ही कोमट पाण्यात मटार ठेवू शकता
  • यामुळे मटारमधील सगळा गारवा निघून जातो
  • आणि ते सैलसर होतात ज्यामुळे भाजी उत्तम होते

(वाचा – अवघ्या 10 मिनिटांत चांदीचे दागिने करा स्वच्छ, 5 स्टेप्स महत्वाच्या))

​एक वर्षापर्यंत मटार साठवणे किती सुरक्षित आहे?

आपण एक वर्षापर्यंत मटार साठवू शकतो, परंतु चव ताजी ठेवणे थोडे कठीण आहे. त्यामुळे हिरवे मटार एका वर्षासाठी साठवून न ठेवणे चांगले असते. तुम्ही साठवून ठेवलेल्या मटारचा वापर पुढील चार ते पाच महिन्यात करून ते संपवून टाकावेत. कारण सतत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने वाटाणे कडक होऊ शकतात, ज्यामुळे पोटदुखी होऊ शकते.

हेही वाचा :  Kitchen Tips : स्वयंपाकाची करपलेली, खराब झालेली भांडी मिनिटांत स्वच्छ होतील; चमकवा नव्यासारखे

(वाचा – डाळी आणि गहूला लागलेल्या टोक्यांपासून हैराण झालात? अगदी सोपे आणि घरगुती 9 किचनमधील खास टिप्स)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …

राजेश खन्नांची ‘ती’ हिरोईन जिची सावत्र वडिलांनीच केली हत्या; आत्ता 13 वर्षांनी…

Laila Khan Murder Case: अभिनेत्री लैला खान प्रकरणा तब्बल 13 वर्षानंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. …