सिझेरियन डिलिव्हरीनंतर शरीरावर होतात हे वाईट परिणाम, सी-सेक्शनमुळे होणारा दुष्परिणाम

बाळाचा जन्म झाल्यानंतर हल्ली पहिला प्रश्न विचारण्यात येतो की, नॉर्मल डिलिव्हरी की सीझर? पण हल्ली बाळांचा जन्म हा अधिकतम सिझेरियन डिलिव्हरी अर्थात सी-सेक्शनद्वारे करण्यात आल्याचे ऐकू येते. काही बाबतीत बाळांचा जन्म सिझेरियन डिलिव्हरीने होणे चांगले ठरते. मात्र याचे दुष्परिणामही आहेत. जे सिझेरियन डिलिव्हरीनंतर प्रत्येक आईला कमी जास्त प्रमाणात भोगावेच लागतात. काही महिलांना डिलिव्हरीच्या वेळी जीव जाण्याचा धोका संभवत असेल तर सिझेरियन डिलिव्हरी वरदान ठरते. पण याचा आरोग्यावर काही प्रमाणात विपरीत परिणाम होतो. अनेक शोध आणि अभ्याासानंतर सिद्ध झाले आहे की, सिझेरियन डिलिव्हरीनंतर महिलांच्या आरोग्यावर अधिक काळ याचा परिणाम राहातो. याबाबत आम्ही जाणून घेतले ब्राम्हण सभा हॉस्पिटलमधील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. श्वेता पाटील यांच्याकडून. (फोटो क्रेडिट – Freepik.com)

नॉर्मल डिलिव्हरीच्या तुलनेत रिकव्हरीला लागतो वेळ

नॉर्मल डिलिव्हरीमध्ये महिला लवकर काम करू लागतात अथवा त्यांचा थकवा लवकर निघून जातो. मात्र सी सेक्शन डिलिव्हरीला साधारणतः दोन महिने तरी किमान लागतात. सी सेक्शनमध्ये तुमच्या मांसपेशी कापून बाळाला बाहेर काढण्यात येते. त्यामुळे यात अधिक धोका असतो. ही मोठी सर्जरी असून यामध्ये नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा रक्त अधिक प्रमाणात जाते. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह आणि इतर गोष्टी रिकव्हर होण्यासाठी अधिक काळ जावा लागतो.

हेही वाचा :  Normal Delivery Stitches : नॉर्मल डिलीवरीमध्ये का घालतात टाके आणि या सगळ्यातून बरं व्हायला लागतात किती दिवस?

शरीरात अधिक थकवा

नॉर्मल डिलिव्हरीच्या तुलनेत सिझेरियन डिलिव्हरी होणाऱ्या महिलांमध्ये थकवा अधिक प्रमाणात असतो. याचा दुष्परिणाम पुढचे अनेक वर्ष राहातो. सी सेक्शनमध्ये शरीरातून रक्त अधिक प्रमाणात निघाल्यामुळे अनेक महिलांना सतत शरीरात थकवा जाणवतो. तर काही महिलांना आयुष्यभर याचा सामना करावा लागतो.

प्लेसेंटा प्रिव्हिया आणि प्लेसेंटा एक्रिटाची समस्या

सिझेरियन डिलिव्हरीमुळे अनेक महिलांमध्ये प्लेसेंटा प्रिव्हिया आणि प्लेसेंटा एक्रेटाची समस्या वाढू लागली आहे. प्लेसेंटा एक्रेटा म्हणजे गर्भनाळ गर्भाशयात अथवा युरिनरी ब्लॅडरमध्ये घुसणे. यामुळे गर्भाशय फाटण्याचा धोका निर्माण होतो. पहिल्या गरोदरपणानंतर ही समस्या निर्माण झाली तर दुसऱ्या गरोदरपणाच्या वेळी आई आणि बाळ दोघांनाही धोका निर्माण होतो.

गर्भाशयाचा आजार एंडोमेट्रियोसिसच्या संक्रमणाचा धोका

सिझेरियन डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये एंडोमेट्रियोसिसचा धोका वाढतो. हा गर्भाशयाशी संबंधित आजार असून महिलांच्या शरीरातील नसा या गर्भाशयाच्या बाहेर विकसित होऊ लागतात. ज्याला एंडोमेट्रियोसिस इम्प्लांट असे म्हटले जाते. हे व्हजायना, सर्विक्स आणि ब्लॅडरवरदेखील दिसतात. त्यामुळे सिझेरियन डिलिव्हरीनंतर अधिक काळजी घ्यावी लागते.

शरीरातील बदलांमुळे आजारांना निमंत्रण

सिझेरियन डिलिव्हरीनंतर नॉर्मल डिलिव्हरीच्या तुलनेत शरीरात अधिक बदल होतात. त्यामुळे पुढे गंभीर आजारांनाही सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिलिव्हरीनंतर निर्माण होणारा लठ्ठपणा, हार्नियाची समस्या, चिडचिडेपणा वाढणं, नैराश्य येणे, थ्रोम्बोसिस यासारख्या समस्या अधिक प्रमाणात दिसून येतात. सर्जरीमुळे पायांमध्ये सतत दुखणे वाढू शकते. तसंच वयाच्या आधीच सांधेदुखीचा त्रासही निर्माण होतो.

हेही वाचा :  Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सत्तूचे ड्रिंक ठरेल वरदान, डायबिटीस रूग्णांसाठीही फायदेशीर

सिझेरियन डिलिव्हरी अथवा सी सेक्शन हे गर्भाशयावर सर्जिकल कट देऊन बाळाला जन्म देण्याची प्रक्रिया आहे. पण यामध्ये अधिक समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते. नॉर्मल डिलिव्हरीच्या तुलनेत महिलांना यामध्ये या समस्यांना अधिक सामोरे जावे लागते.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

एक फोन आणि…. पुण्यातील ‘त्या’ अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोर

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : (Pune Porsche Accident) पुण्यातील कल्याणी नगर अपघाताला आता काही …

Pune Porsche Accident सरकारलाच गुन्हेगार करण्याची ठाकरे गटाची मागणी! म्हणाले, ‘राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’..’

Pune Porsche Accident Case Uddhav Thackeray Group Demad: “पुण्यातील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरण दाबून टाकण्यासाठी सत्ताधारी …