हे पदार्थ हाडांत भरतात युरिक अ‍ॅसिड, चुकूनही खाऊ नका

थंडीत सांधे आकडणे ही सामान्य समस्या आहे. पण जर तुम्हाला ही समस्या खूप जास्त होत असेल तर त्यामागे हाय युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) असू शकते. युरिक अ‍ॅसिड हा एक कचरा आहे ज्याचे शरीरात कोणतेही काम नसते. जेव्हा ते शरीरात जास्त प्रमाणात तयार होते, तेव्हा ते सांध्यामध्ये चमकदार क्रिस्टल्सच्या स्वरूपात साचून बसते. शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी खूप जास्त असेल तर काही गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

मायोक्लिनिकच्या मते, हाय यूरिक अ‍ॅसिडच्या लक्षणांमध्ये तीव्र सांधेदुखी, चालण्यास त्रास होणे, सांध्यांना सूज येणे किंवा सांधे लालसर होणे आणि किडनी स्टोन या समस्या निर्माण होणे यांचा समावेश होतो. अशावेळी तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. यासाठी आहारातून काही पदार्थ तुम्ही कमी केले पाहिजेत. जेणेकरून हाय युरिक अ‍ॅसिडची समस्या दूर होऊ शकते.

प्युरीनने वाढते युरिक अ‍ॅसिड

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, अनेक पदार्थांमध्ये प्युरीन असते आणि जेव्हा शरीर हे रसायन तोडते तेव्हा यूरिक अ‍ॅसिड रक्तप्रवाहात प्रवेश करते. यूरिक अ‍ॅसिड बहुतांशपणे रक्त आणि किडनीद्वारे लघवीत जाते आणि तिथून शरीराबाहेर पडते. पण जेव्हा त्याचे प्रमाण वाढू लागते तेव्हा ते शरीरातच क्रिस्टल्सच्या स्वरूपात साठून राहू लागते. हीच क्रिया शरीरासाठी हानिकारक ठरते आणि म्हणून वेळीच युरिक अ‍ॅसिडची वाढ रोखली पाहिजे. जेणेकरून पुढील शारिरीक समस्या टाळता येतील.

हेही वाचा :  या खास चटणीने करा युरिक अ‍ॅसिडची समस्या दूर

(वाचा :- Walking for Heart : रोज न चुकता इतकी पावलं चाला, हृदय होईल ‘Bulletproof’, पण सोबत ठेवावी लागेल ‘ही’ 1 वस्तू..!)

हाय प्युरिन असणाऱ्या पदार्थांपासून राहा दूर

जास्त यूरिक अ‍ॅसिडच्या समस्येला हायपरयुरिसेमिया म्हणतात. जे अन्नामध्ये जास्त प्रमाणात प्युरीन खाल्ल्याने होते. म्हणूनच प्रत्येकाने अशा खाण्यापिण्यापासून दूर राहावे, ज्यामध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते. चला तर आपण हाय प्युरीनयुक्त पदार्थ आणि पेयांबद्दल जाणून घेऊया. तुम्हाला जर त्याबद्दल माहिती असले तर तुम्ही वेळीच तुमच्या आहारातून हे पदार्थ वा त्यांची मात्रा कमी करून हेल्दी राहू शकता. यामुळे यूरिक अ‍ॅसिड वाढणार नाही आणि गंभीर समस्यांपासून तुमचा बचाव होऊ शकतो.

(वाचा :- Joint Pain: पुरूषहो, सर्व समस्या व गुडघेदुखीतून मिळेल 100 टक्के कायमची मुक्ती, फक्त भाजून खा या भाजीच्या बिया)

फूड आणि ड्रिंक

NCBI च्या रिपोर्टनुसार, सॅल्मन फिश किंवा इतर अनेक समुद्री खाद्यपदार्थांमध्ये प्युरीनचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे शरीरात यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त होऊ शकते. याशिवाय प्राण्यांचे यकृत, अल्कोहोल आणि गोड पेयांमध्येही अधिक प्युरीन आढळते. त्यामुळे जर तुम्हाला हेल्दी राहायचे असेल तर अशा फूड आणि ड्रिंक पासून दूर राहा.

हेही वाचा :  नवी मुंबई कात टाकणार! देशातील पहिलं शहर ठरणार जिथे...; शासनाकडे पाठवला प्रस्ताव

(वाचा :- Yoga for Healthy Lung: थंडीत फुफ्फुसांना असतो इनफेक्शनचा सर्वात जास्त धोका, ऑक्सिजन बंद होण्याआधी करा हे 1 काम)

हाय प्युरीन असणाऱ्या भाज्या

ब्रोकोली, पालक, शेंगा यांसारख्या भाज्यांमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढू शकते, असे आणखी एका अभ्यासात म्हटले आहे. परंतु, त्यांचे इतर पोषक घटक पाहता त्यांचे सेवन पूर्णपणे थांबवता येत नाही, म्हणून ते मर्यादित प्रमाणात खावे. तुम्ही जर आहारात अशा भाज्यांचा समावेश करत असाल तर अशा भाज्या कमी प्रमाणात खा जेणेकरून शरीरातील यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढणार नाही आणि तुम्ही सुरक्षित राहाल.

(वाचा :- Cholesterol Exercise : लिव्हर सडल्यामुळे बनतं Cholesterol, हा एक उपाय गाळून फेकतो शरीरातील घाण व विषारी पदार्थ)

प्युरीन असणारी फळे आणि ड्रायफ्रुट्स

भाज्यांप्रमाणेच काही फळे आणि ड्रायफ्रूट्समध्येही प्युरिन्स जास्त असतात. ज्यामध्ये केळी, मनुका, जर्दाळू, वाळलेले मनुका इत्यादींचा समावेश आहे. म्हणूनच हे पदार्थही मर्यादित प्रमाणात खावेत. जाणकार सुद्धा अनेकदा असे पदार्थ म्हणूनच न खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे शक्य असल्यास ही गोष्ट लक्षात घ्या आणि जे शरीरासाठी उपयुक्त आहे त्याचेच सेवन करा.

हेही वाचा :  ना औषध, ना पथ्यपाणी फक्त या 8 गोष्टी करा, युरीक अ‍ॅसिड रक्तातूनच खेचून वेगळे होईल

(वाचा :- हे 4 घरगुती पदार्थ खाऊन 98 किलोच्या मुलाने घटवलं तब्बल 33 किलो वजन, थट्टा उडवणारेही विचारतत Weight Loss Secret)

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …