बॉस राहिल बाराही महिने खुश व देवी लक्ष्मीची होईल तुमच्यावर सदा कृपा, फक्त करा

लाईफमध्ये तुम्ही कोणतेही करिअर निवडले, तरी त्यात आव्हाने असणारच. ज्याला कामच्या ठिकाणी कठीण परिस्थिती हाताळता आली तो सर्व संकटांवर आणि अडथळ्यांवर मात करून सहज पुढे जाऊ शकतो. म्हणून, कठीण परिस्थितीत, व्यक्तीने आपले विचार योग्य पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घाबरून गेलात तर तुम्हीच त्यात अडकण्याची जास्त शक्यता असते. चांगल्या कंपनीत काम करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु अशा स्पर्धात्मक ठिकाणी काम करणे नेहमीच सोपे नसते.

ऑफिसमध्ये बॉसच्या हाताखाली काम करताना, कधी त्याच्याकडून शिवीगाळ सहन करणे, टार्गेट पूर्ण करून घेण्यासाठी दबाव सहन करणे, टीम सांभाळण्याचे दडपण असणे अशा गोष्टींना तोंड द्यावे लागते. अशावेळी फार कमी लोक शांत राहतात, पण काहींना राग कंट्रोल होत नाही आणि ते अपशब्द वापरता. पण यामुळे त्यांचीच ऑफिसमधील प्रतिमा खराब होते. चला तर मग, आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये दीर्घकाळ कोणत्याही तणावाशिवाय आरामात काम करू शकता.

जेव्हा कोणी तुमच्या कामाचे क्रेडिट घेईल

ऑफिस पॉलीटीक्स हे सगळीकडेच सर्रास पाहायला मिळते. सहसा तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय इतर सहकारी स्वतः मॅनेजरसमोर घेतात. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतलेली असते, अशा परिस्थितीत राग येणं साहजिक आहे. तुमच्या मेहनतीचे संपूर्ण श्रेय कोणी जाणूनबुजून घेत असेल, तर सावध राहणे आवश्यक आहे. तुम्ही असभ्य भाषा न वापरताही याचे उत्तर देऊ शकता. त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोला आणि त्याला सांगा की त्याने जे केलं ते त्रासदायक आणि चुकीचे आहे. मात्र तरी तो ऐकत नसेल तर अशावेळी शांत राहा आणि पुन्हा गाफील राहण्याची चूक करू नका.

हेही वाचा :  Kareena Kapoor ने पिंक साडीत केला कहर, ब्लाऊजची डिझाईन पाहून सर्वांनी श्वासच रोखला

(वाचा :- कोण म्हणतं लग्नाच्या गाठी स्वर्गात बनतात? मी तर एका अशा पुरूषाला भेटली जो स्वर्गात काय माझ्या नशिबातही नव्हता)

सुट्टी असतानाही काम करण्यास सांगितले जाते तेव्हा

कामाच्या ठिकाणी, काहीवेळा सिनियर अधिकारी त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना काही खास प्रोजेक्टसाठी थांबवतात. विशेषत: जेव्हा तुम्ही घरी जात असता वा काम संपवून निघत असता तेव्हा असे होते. अशा परिस्थितीत, राग येण्याऐवजी किंवा वाईट शब्द बोलण्याऐवजी, तुम्ही नम्रपणे सांगू शकता की तुमचे पर्सनल लाईफ सुद्धा आहे. शिवाय तुम्हाला ज्या कामासाठी जायचे आहे तिथे जाणे महत्त्वाचे आहे. बॉस आहे तो ओरडेल म्हणून शांत राहू नका. स्पष्ट त्याला सांगा. अनेकदा स्पष्ट सांगण्याने गोष्टी सोल्व्ह होतात.

(वाचा :- पुरूषहो, 40 वर्षांचे होण्याआधीच उरकून घ्या ही 5 कामे, नाहीतर बायकोचे गुलाम बनून राहण्यातच निघून जाईल आयुष्य..!)

जेव्हा नाही बोलायची वेळ येते

कधीकधी परिस्थिती अशी बनते की तुम्हाला नाही म्हणावं लागतं. पण अशावेळी कोणाला काय वाटेल याचा विचार करू नका. नाही म्हणणे सुद्धा महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्ट ho ho म्हणत जाल तर सगळी काम तुमच्यावरच पडतील. पण नाही म्हणताना सुद्धा तुम्हाला उद्धतपणे न बोलता नाही म्हणता आले पाहिजे. कारण अनेकदा तुम्ही उद्धटपणे नाही म्हणाल्याने तुमची इमेज क्गरब होऊ शते. माणसाने स्पष्टवक्त राहावे पण अगदी नम्रपणे त्यासाठीच!

हेही वाचा :  ४५ हजारांची साडीबरोबर खूप गिफ्ट देऊन सुद्धा हनिमूनच्या रात्री माझ्या बायकोने असं काही केलं की ऐकून सुन्न व्हाल

(वाचा :- माझी कहाणी : माझं व नव-याचं कोणतंही प्रायव्हेट आयुष्य उरलेलं नाही, याला कारणीभूत हे दोन व्यक्ती ठरलेत, काय करू)

तुमच्या चुकीमुळे टीमवर परिणाम होईल तेव्हा

प्रत्येकजण चुका करतो, परंतु जर चूक तुमच्याकडून प्रोफेशनल आयुष्यात झाली असेल, तर शेवटी ती सुधारण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. जर तुम्ही ही चूक लपवून ठेवली किंवा तुमच्या टीमला सांगितली नाही तर त्याचा तुमच्या टीमवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या चुकीबद्दल लवकरात लवकर माफी मागावी आणि स्पष्टीकरण द्यावे. वेळीच जर तुम्ही ही गोष्ट सांगितली तर त्यावर तोडगा काढून परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते.

(वाचा :- मी एका अशा पुरूषाच्या प्रेमात पडली आहे जे प्रेम जगाला व कुटुंबाला कधीच मान्य होणार नाही, मग मी चुकीची आहे का?)

मेहनत करत राहा

बरेच जण म्हणतात की मी खूप मेहनत घेऊन, खूप काम करूनही माझा बॉस माझं कौतुक करत नाही, मुळात तुम्ही बॉसने कौतुक करावं म्हणून काम करूच नका, कारण बॉस हे कधीच उघडपणे आपल्या कर्मचाऱ्याची प्रशंसा करत नाही कारण यामुळे कर्मचारी आपल्याला गृहीत धरतील अशी भीती त्यांना असते. ते सर्वांवर लक्ष ठेवून असतात, तुम्ही तुमचं काम स्वत:साठी करा आणि बघा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल.

हेही वाचा :  according to chanakya niti these mistakes can ruin your married life

(वाचा :- ट्विंकल खन्नाने तब्बल 2 वेळा तोडलं अक्षयसोबतचं लग्न, कारण ठरलं समस्त पुरूष जातीला लाजवेल असा एक भयंकर आरोप..!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंगठी आणि गळ्यातल्या मंगळसुत्रामुळे ओळख पटली, डोंबवली स्फोटात त्याने आपली पत्नी गमावली

Dombivli MIDC Blast : 23 मे 2024 हा दिवस डोंबिवलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवाणरा ठरला. …

VIDEO : दत्तक मुलाला पाहून जोडप्याला अश्रू अनावर, हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ एकदा पाहाच

Trending Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे धक्कादायक …