CET Exams 2023: मोठी बातमी! सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कधी होणार परीक्षा…

MHT CET 2023: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT CET 2023 परीक्षेच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या आहेत. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत त्यांनी या अधिकृत वेबसाइट mahacet.org वरून जाऊन वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तसेच MHT CET 2023 ची परीक्षा 9 मे 2023 पासून होणार आहे. 

अभियांत्रिकी, कृषी, बी, फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेत पीसीएम ग्रुपमधील परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान, तर पीसीबी ग्रुपसाठी 15 ते 20 मे दरम्यान होणार आहे. तर विधी अभ्यासक्रमात एलएलबीसाठी 1 एप्रिल, तर एलएलबी 2 आणि 3 मेला परीक्षा होणार आहे. 

पाहा परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक 

MHT CET विषय
PCM – परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान 
PCB- 15 ते 20 मे या कालावधीपर्यंत

 CET परीक्षा

MBA/MMS- परीक्षा 18 मार्च ते 19 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे.
MAH LLB 5 वर्षे- 1 एप्रिल 2023
MAH LLB 3 वर्षे – 2 मे आणि 3 मे 2023
B.A./B.Sc. B.Ed.(चार वर्षांचे एकात्मिक अभ्यासक्रम) – 2 एप्रिल 2023

हेही वाचा :  'शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा, माझे कोट्यवधी रुपये..'; BJP MLA कडून CM च्या राजीनाम्याची मागणी

वाचा: सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी 

दरम्यान अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसोबत, महाराष्ट्र राज्य सेल कायदा, कला, बीएड आणि इतर विविध अभ्यासक्रमांसाठी सीईटी आयोजित करते.

MHT CET 2023: परीक्षेसाठी अर्ज

राज्य सेलने MHT CET 2023 परीक्षेची तारीख जाहीर केल्यामुळे उमेदवारांना नोंदणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विविध सहभागी महाविद्यालयांमध्ये बीई आणि बीटेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा घेतली जाते आणि उमेदवारांना सीईटी परीक्षेत इयत्ता 11वी आणि 12वी अभ्यासक्रमातील प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक असतात. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …