प्रिमॅच्युअर बाळांचा अंधत्व येण्यापासून बचाव, कसा घालावा प्रतिबंध

रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी (RoP) हे जगभरातील लहान मुलांना अंधत्व येण्याचे एक प्रमुख कारण आहे. वेळेआधी म्हणजे ३४ व्या आठवड्यात किंवा त्याच्याआधी जन्मलेल्या, जन्माच्या वेळी २००० ग्राम किंवा त्यापेक्षा कमी वजन असलेल्या बाळांच्या रेटिनाचे नुकसान झाल्यामुळे अंधत्व येण्याची शक्यता असते. भारतामध्ये एक हजारातील एका मुलाला या आजाराचा त्रास होतो पण तरीही याविषयीची जागरूकता खूपच कमी आहे. याबाबत आम्ही डॉ. हर्षवर्धन रेड्डी, व्हिट्रेओ – रेटिना सर्जन, एएसजी आय हॉस्पिटल्स, डोंबिवली यांच्याकडून माहिती घेतली.

का उद्भवते ही स्थिती ?

रेटिनाचा पूर्ण विकास होण्याआधी आणि रेटिनाला पुरेसा रक्तपुरवठा होण्यास सुरुवात होण्याच्या आधी जर बाळाचा जन्म झाला तर ही स्थिती उद्भवते. यामुळे वस्क्युलर एन्डोथेलियल ग्रोथ फॅक्टर्स रिलीज होतात आणि असामान्य रक्तवाहिन्या तयार होतात. रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटीवर उपचार केले गेले नाहीत तर ट्रॅक्शनल रेटिनल डिटॅचमेंटसारख्या अनेक वेगवेगळ्या गुंतागुंती होऊ शकतात. लहान बाळांमध्ये गंभीर दृष्टिदोष निर्माण होऊ शकतात, इतकेच नव्हे तर, अंधत्व देखील येऊ शकते.

योग्य तपासणी करून होतील उपचार

सुदैवाची बाब अशी की, ज्या बाळांना या समस्येचा धोका असतो त्यांची योग्य तपासणी करून आरओपीवर (RoP) उपचार केले जाऊ शकतात आणि अंधत्व येणे टाळता येऊ शकते. यासाठी या समस्येबाबत जागरूकता निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे, ज्यांना बाळ होणार आहे किंवा ज्यांची बाळे अगदी लहान आहेत त्यांनाच नव्हे तर, बाळांवर उपचार करणाऱ्या बालरोगतज्ज्ञांना देखील याविषयी माहिती असली पाहिजे कारण बाळांचे पुढचे संपूर्ण आयुष्य यावर अवलंबून असते.

हेही वाचा :  Video : बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं

(वाचा -गर्भारपणात येत असेल नैराश्य तर आहेत ५ लक्षणे, बाळावर काय होतो परिणाम घ्या जाणून)

डोळ्यांची करा नियमित तपासणी

वेळेआधी जन्मलेल्या बाळांमध्ये रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी तर नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्यांच्या डोळ्यांची नियमितपणे तपासणी करून घेतली गेली पाहिजे. बाळ जन्माला आल्यानंतर काही आठवडे तरी आरओपी (RoP) दिसून येत नाही त्यामुळे जन्मानंतर जवळपास २५ ते ३० दिवसांनी तपासणी केली पाहिजे. जर आरओपी (RoP) आपणहून जात नसेल आणि असामान्य रक्तवाहिन्यांची वाढ होत राहत असेल तर बाळाच्या डोळ्यांवर उपचार केले गेले पाहिजेत.

(वाचा – Makar Sankranti 2023: मुलांच्या जन्मानंतर पहिल्या तीन वर्षात पालक का घालतात ‘बोरन्हाण’)

आरओपीवर (RoP) उपचार

-rop-

आरओपीवर (RoP) उपचार करण्याचे तीन वेगवेगळे मार्ग आहेत लेजर ट्रीटमेंट – यामध्ये रेटिनाची ऑक्सिजनची मागणी कमी करण्यासाठी नेत्रतज्ज्ञ अवस्क्युलर रेटिनावर उपचार करतात आणि असामान्य रक्तवाहिन्या निर्माण होण्यास प्रतिबंध घालतात. दुसरीकडे, अँटी-व्हीईजीएफ इंजेक्शन्स रक्तवाहिन्यांचे वाढणे थांबवतात आणि त्यांची पीछेहाट करतात. आरओपी (RoP) असलेल्या बाळांची नियमितपणे तपासणी करणे खूप आवश्यक असते कारण यामुळे चकणेपणा, ग्लॉकोमाचा धोका वाढणे, निकटदृष्टिदोष आणि कायमचे अंधत्व अशा समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

हेही वाचा :  धावण्यापूर्वी काय खाणे ठरते योग्य, खायला हवे की नको जाणून घ्या

(वाचा – नॉर्मल वा सीझर डिलिव्हरीनंतर ओल्या बाळंतिणीने काय काळजी घ्यावी)

समस्येचा धोका नक्की कधी?

बाळाचे वय जसजसे वाढत जाते तसतशी रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटीमध्ये घट होऊ शकते. पण स्थिती सुधारते आहे याची खात्री करून घेण्यासाठी त्यांची नियमितपणे तपासणी करवून घेतली पाहिजे. दृष्टीचे कायमस्वरूपी नुकसान होऊ नये यासाठी काही केसेसमध्ये तातडीने उपचार करावे लागू शकतात. बाळ जितके जास्त वेळेआधी जन्मलेले असेल तितका या समस्येचा धोका जास्त असतो. बाळाला ऍनिमिया, श्वसनाचे त्रास किंवा व्हिटॅमिन ई कमी असणे असे इतर त्रास देखील असतील तर त्यांना रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी होण्याची शक्यता जास्त असते. ही समस्या टाळण्यासाठी आजाराचे गांभीर्य समजून घेणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे ही पहिली पायरी आहे.

रेटिनाची नियमितपणे तपासणी आवश्यक

पण या समस्येवर उपचार करणे शक्य आहे आणि तरीही भारतामध्ये या समस्येमुळे ५००० पेक्षा जास्त मुलांना दृष्टी गमवावी लागते. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनांमध्ये आमच्या असे निदर्शनास आले आहे की, गर्भावस्थेचा कालावधी पूर्ण होऊन जन्मलेल्या आणि जन्माच्या वेळी योग्य वजन असलेल्या बाळांमध्ये देखील आरओपीची (RoP) समस्या निर्माण होत आहे, त्यामुळे २००० ग्रामपर्यंत वजन असलेल्या किंवा ३४ आठवड्यांपर्यंत जन्मलेल्या बाळांसाठी नियमित तपासणी करवून घेणे आवश्यक आहे. या समस्येबाबत जागरूकता वाढली तर अंधत्वाला बळी पडणाऱ्या मुलांची संख्या कमी होणे सहज शक्य आहे. रेटिनाची नियमितपणे तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे कारण रेटिनाचा कोणताही आजार जर लवकरात लवकर लक्षात येत असेल तर तो अर्धा बरा झाला असे गृहीत धरायला हरकत नाही.

हेही वाचा :  लॅब टेस्टसाठी जाताय? मग या गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यकच आहे, करू नका वेंधळेपणा जीवावर बेतेल

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …