Couvade Syndrome: जेव्हा पुरूष गरोदर होतात, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे

गर्भधारणा ही सर्वात मोठी आणि खास अशी गोष्ट आहे. ज्याचा अनुभव प्रत्येक महिलेने तर घ्यायलाच हवा. पण जेव्हा हा गोड अनुभव पुरूषांना अनुभवता येतो. तेव्हा त्याचा आनंद वेगळाच असतो. महिलांप्रमाणेच पुरूष देखील प्रेग्नंट असल्याचा अनुभव घेऊ शकतात. अशी लक्षणे जाणवणाऱ्या पुरूषांमध्ये Couvade Syndrome असल्याचं आढळलं आहे. आपल्या महिला पार्टनरच्या प्रेग्नेन्सीचा परिणाम या पुरूषांच्या आयुष्यावर देखील होतो.

गर्भवती जोडीदारात जी लक्षणे आढळत आहेत तीच लक्षणे हे पुरूष अनुभवत असतात. याला “सहानुभूती गर्भावस्था” (Sympathetic pregnancy) असे म्हणतात. मेडिकल भाषेत याला अद्याप कोणताही डिसऑर्डर म्हणून मानलेलं नाही. पण ही भावना आहे जी अनेक पुरूषांमध्ये आढळून येते. (फोटो सौजन्य – iStock)

​अभ्यासात मोठा खुलासा

लंडनच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या अभ्यासानुसार, Couvade Syndrome असलेल्या पुरुषांमध्ये पोटदुखी, पोट फुगणे , पाठदुखी, आळस, मॉर्निंग सिकनेस, दात दुखी, जास्त भूक लागणे यासारखे प्रेग्नेंसीमध्ये लक्षणे दिसून येतात. यासोबतच डिप्रेशन, मूड स्विंग्स, सकाळी लवकर जाग येणे, तणाव आणि स्मरणशक्ती कमी करणे सारखी लक्षणे दिसून येतात.

हेही वाचा :  ... अन् बड्या कंपनीचा CEO कपडे काढून मीटिंगला बसला; Photo Viral

​कोणत्या पुरूषांमध्ये जाणवते ही समस्या

गर्भधारणे दरम्यान जे पुरूष आपल्या पार्टनरच्या आणि बाळाच्या अगदी जवळ असतात त्यांना या दोघांबद्दल सहानुभूती असते, त्यांच्यामध्ये Couvade Syndromeची लक्षणे आढळतात. यासोबतच जे पुरूष आपल्या बाळाचा गरजेपेक्षा जास्त विचार करतात. त्यांच्या शरीरातही असे बदल जाणवतात. हा सिंड्रोम प्रेग्नंसीच्या पॅटर्नमध्ये जाणवतो. पहिल्या तिमाहीमध्ये हा बदल जाणवू लागतो. दुसऱ्या तिमाहीमध्ये हा सहज निघून जातो. मात्र शेवटच्या तिमाहीमध्ये ही लक्षणे पुन्हा दिसू लागतात. अगदी मुलं जन्माला आल्यानंतरही काही पुरूषांमध्ये ही लक्षणे दिसू लागतात.

(वाचा – अनंत अंबानीचा राधिका मर्चंटसोबत झाला रोका, १८ महिन्यांत या डाएट प्लानच्या मदतीने १०८ किलो वजन केलं कमी)

​कुठल्या पुरूषांमध्ये दिसतात ही लक्षणे

हा सिंड्रोम विकसित देशांमधील पुरूषांमध्ये आढळतो. अनेक अभ्यासानुसार, अमेरिका, स्वीडन, थायलँड, ब्रिटेन आणि अगदी भारतातील पुरूषांमध्येही हा सिंड्रोम सर्वाधिक प्रमाणात दिसत आहे. भावनात्मक गुंतागुंत यासोबत हार्मोनल बदल हे देखील याचे मुख्य कारण आहे.

(वाचा – अरूंधतीच्या गालावर खळी नाही ही तर जखम, मधुराणीकडून मोठा खुलासा, ‘या’ आजाराचे नाव काय?))

​पुरूषांच्या मनावर होतो परिणाम

मनोविश्लेषणात्मक सिद्धांतानुसार, महिलांच्या प्रजनन क्षमतेमुळे काही पुरूषांमध्ये एक प्रकारची जळजळ जाणवते. ज्यामुळे त्यांना या सिंड्रोमची लागण झाल्याचे कळते. येणाऱ्या बाळाच्या सर्वाधिक चिंतेमुळे किंवा गर्भधारणेदरम्यान जोडीदाराशी मतभेद झाल्यामुळे पुरूषांमध्ये मानसिक बदल होतात. याचा परिणाम या सिंड्रोमच्या रुपात जाणवतात.

हेही वाचा :  टोमॅटोच्या झाडाला लागले बटाटे! बारामतीत शेतीचा अफलातून प्रयोग

(वाचा – शहाजीबापू वयाच्या साठीतही करताहेत डाएट, वर्कआऊट; ९ किलोने वजन घटवलं))

बाळाला प्रतिद्वंद्वीम्हणून पाहतात

काही पुरूष आपल्याच बाळाला प्रतिद्वंद्वी म्हणून पाहतात. कारण या दिवसात पार्टनरचं संपूर्ण लक्ष हे बाळाकडे असतं. अशावेळी Couvade Syndrome हे सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते. यामुळे पुरूषाला आपल्या पार्टनर आणि येणाऱ्या बाळाबाबत अतिशय सुरक्षित वाटते.

पुरूषांमध्येही दिसतात गरोदरपणाची लक्षणे

​नेमकं काय होतं?

हेल्थ एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, पुरूष थेट प्रेग्नंसीचा अनुभव घेऊ शकत नाहीत. मात्र त्यांच्यात ही सहायक भूमिका जाणवते. अशावेळी त्यांना काही गोष्टी जाणवतात पण त्याचा वास्तवाशी काहीच संबंध नसते. अशावेळी अनेक पुरूष नकळतंच Couvade Syndrome ची लक्षणे अनुभवतात. कारण यामुळे आपल्या पार्टनरच लक्ष सहज वेधलं जाऊ शकतं.

​हार्मोन्समध्ये बदल

Couvade Syndrome चा हार्मोनसोबत संबंध आहे. यावर अजूनही संशोधन सुरू आहे. २००० ते २००१ मध्ये छापून आलेल्या अभ्यासानुसार, पुरूषांमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये प्रोलॅक्टिन आणि एस्ट्रोजन हार्मोनचा स्तर वाढल्याच आढळलं. तेथेच टेस्टोस्टेरोन आणि तणाव हार्मोन कोर्टिसोलमध्ये कमतरता जाणवते. या हार्मोनल बदलामुळे होणाऱ्या बाबांमध्ये गरोदरपणाची लक्षणे आढळतात.

हेही वाचा :  मटार खाल्ल्यामुळे रक्तात जमा होईल Uric Acid, आरोग्याची लागेल वाट, कमी करण्यासाठी असं खा दही

(वाचा – How to Reduce High Cholesterol: नसांमध्ये भरलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे या ५ जीवघेण्या आजारांचा धोका, करा अचूक उपाय)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंगठी आणि गळ्यातल्या मंगळसुत्रामुळे ओळख पटली, डोंबवली स्फोटात त्याने आपली पत्नी गमावली

Dombivli MIDC Blast : 23 मे 2024 हा दिवस डोंबिवलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवाणरा ठरला. …

VIDEO : दत्तक मुलाला पाहून जोडप्याला अश्रू अनावर, हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ एकदा पाहाच

Trending Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे धक्कादायक …