राज ठाकरेंनी शेअर केली भावून पोस्ट; म्हणाले, ‘दीदींचं गाणं पुन्हा कानावर पडलं आणि…’

Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज (6 फेब्रुवारी) पहिली पुण्यतिथी आहे. लता दीदींना त्यांचे चाहते तसेच अनेक सेलिब्रिटी आदरांजली वाहत आहेत. लता दीदींच्या गाण्यांना प्रत्येक पिढीतील लोकांची पसंती मिळते. आज (6 फेब्रुवारी)  मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक ट्वीट शेअर करुन लता दीदींना अभिवादन केलं आहे. 

राज ठाकरे यांचे ट्वीट

राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, ‘दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींचं गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्यांना सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील.’

राज ठाकरे यांच्यासोबतच अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. संगीत दिग्दर्शक आणि निशाल ददलानीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन लता दीदींना आदरांजली वाहिली आहे. 

नितीन गडकरी यांनी देखील ट्विटरवर ट्वीट शेअर करुन लता दीदींच्या स्मृतीस अभिवादन केलं. 

लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त कलाकार सुदर्शन पटनायक यांनी 6 फूट उंच वाळूचे शिल्प तयार केले आहे.  ‘मेरी आवाज ही पहचान है’ असं लिहिलेलं दिसत आहे. या वाळू शिल्पाचे फोटो ANI च्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

हेही वाचा :  The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स' सिनेमा पाहिल्यानंतर जम्मूवासियांचे डोळे पानावले

Lata Mangeshkar: ‘पिया तोसे नैना लागे रे’ ते ‘लग जा गले’; लता मंगेशकर यांची प्रसिद्ध गाणी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …