सतत खोकला आणि कफमुळे दमेकरी त्रस्त, हिवाळ्यात लहान मुलांमधील दम्यामध्ये वाढ

लहान मुलांमध्ये दम्याचे प्रमाण वाढले असून सर्दी खोकल्याचं व्हायरल इन्फेक्शन झालं की काहींना छातीत घरघर सुरू होते आणि धापदेखील लागते. त्या मुलांच्या श्वसननलिका किंवा श्वासवाहिन्या या आकाराने लहान असतात. वयाबरोबर श्वासनलिकांचा आकार वाढला की त्यांचा दम लागण्याचा त्रास कमी होतो. व्हायरल इन्फेक्शन सोडून इतरवेळी ही मुलं बरी असतात आणि त्यांना दम लागत नाही. या आजाराला बालदमा असं म्हणतात. हिवाळ्यातील लहान मुलांचा दमा वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ तुषार पारेख, कन्‍सल्‍टंट निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोग तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, पुणे यांनी सतत खोकला आणि कफमुळे दमेकरी त्रस्त असल्याने घरच्या घरी व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे.

मुलांना नक्की काय त्रास होतो?

श्‍वासनलिकेवर सूज आल्यामुळे अथवा श्‍वासनलिकेमध्ये एक चिकट पदार्थ जास्त प्रमाणात स्रवण झाल्यामुळे श्‍वासनलिकेचा मार्ग अरुंद होऊन श्वासोच्छ्वास प्रक्रियेत अडचणी येतात. मुलाकडून श्वास बाहेर टाकताना छातीतून सततचा शिट्टीसारखा येणारा आवाज येत असल्यास त्याला बाल दमा असण्याची शक्यता सर्वाधिक असते. दमा असल्याचे निदान करण्याकरिता तपासण्या करण्याची तशी गरज नसते; परंतु काही वेळा गरज पडल्यास पल्मनरी फंक्शन टेस्ट, एक्स- रे, अ‍ॅलर्जीकरिता तपासणी, रक्ताची तपासणी केली जाते.

हेही वाचा :  गुवाहाटीला गेलो म्हणून.... मंत्रीपदाबाबत उदय सामंत यांचा मोठा दावा

हिवाळ्यात घ्यावी विशेष काळजी

ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांनी हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. थंड हवेमुळे हिवाळ्यात दमा असलेल्या लोकांना श्‍वास घेण्यास त्रास होऊ शकतो. छातीत कफ साचण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो. श्‍वसननलिकेवाटे शरीरात आलेल्या हवेतील ऑक्सिजन पेशींपर्यंत पोचवण्याचे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडण्याचे काम फुप्फुसे करतात. मात्र दमा या आजारात श्‍वसनमार्गाला सूज आल्यामुळे ही वाहिनी आकुंचन पावते आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात फुप्फुसापर्यंत पोचण्यास आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडण्यास अडथळा येतो. श्वसनमार्गात कफ चिकटून राहिल्यामुळे श्वासोच्छवास करण्यास अडथळा निर्माण होतो. सतत खोकला येणे आणि कफ जमा होणे यामुळे रुग्ण आणि विशेषतः लहान मुले अधिक त्रस्त होतात. त्यातच हिवाळ्यात कोरडे वातावरण असल्यामुळे दमा नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वाढते आणि दम्याचा झटका येण्याच्या प्रमाणातही वाढ होते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात प्रदूषण पसरते आणि हे कण ऍलर्जीचे काम करतात. त्यामुळे हिवाळ्यात दम्याचा त्रास अधिक वाढतो.

(वाचा -Booster Dose घेणे सुरक्षित आहे की नाही? रिसर्चचा दावा, आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत सत्य समोर)

हेही वाचा :  Unseasonal Rain : राज्यभरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; वीज कोसळून दोघांचा मृत्यू

दम्याची लक्षणे

  • दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो
  • श्वास घेताना घशात घरघर आवाज येतो
  • छातीत जडपणा जाणवणे
  • खोकल्यावर स्निग्ध कफ
  • शारीरीक परिश्रम केल्यानंतर दम लागणे
  • परफ्यूम, सुगंधित तेल, पावडर इत्यादींची ऍलर्जी

(वाचा – नैराश्यामुळेच येत आहेत का आत्महत्येचे विचार, नैराश्य म्हणजे नेमकं काय? लक्षणे आणि उपाय)

दमेकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

  • हिवाळ्याच्या दिवसात घरच्या घरी व्यायाम करा. यामध्ये इनडोअर जिम, वर्कआउट कोर्स आणि चालणे, योगा यांचा समावेश होतो
  • बाहेर पडताना स्कार्फचा वापर करा. त्यामुळे श्वसन संक्रमण टाळणे शक्य होईल तसेच थंड वाऱ्यापासून संरक्षण होईल
  • आहारात अधिकतः द्रव पदार्थांचे सेवन करा. आहारात गरम सूप, फळांचा रस यांचा समावेश करा
  • घरात व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखा
  • वेळोवेळी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे घ्या. वैद्यकिय सल्ल्याने इनहेलर्सचा वापर करणे योग्य राहील
  • शरीर शक्य तितके उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आपल्या मुलांची योग्य ती काळजी घ्या. केवळ मुलांनीच नाही तर मोठ्या व्यक्तींनाही दम्याची समस्या असल्यास या सर्व टिप्स तुम्हाला उपयोगी ठरतील.

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratime.com

हेही वाचा :  Sleeping Tips : महिला पुरूषांपेक्षा जास्त का झोपतात? अभ्यासात मोठा खुलासा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …