मलायका ते जान्हवी सर्व अभिनेत्रींवर नवीन वर्षात चढेल या कपड्यांची जादू

2022 मध्ये बी-टाउनच्या सौंदर्यवतींचे जे कोणते लूक सर्वात जास्त ट्रेंडिंग होते, ते पुन्हा एकदा येणाऱ्या 2023 मध्ये फॉलो होणार आहेत. या वर्षी काही अनोख्या स्टाइल्स पाहायला मिळाल्या ज्या सगळ्यांना आवडल्या. लोक या नवीन ट्रेंडला अगदी मनसोक्तपणे फॉलो करत आहेत. आता 2023 हे वर्ष अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही 2022 च्या ट्रेंड्स वर नजर मारलीच पाहिजे.

कारण हे लुक्स पुन्हा एकदा व्हायरल होणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला या लुक्सबाबत माहिती असायलाच हवी. तुम्ही यातलाच एखादा लुक न्यू इयर पार्टीसाठी (New Year 2023) कॅरी करून सगळ्यांना थक्क करू शकता आणि मस्त अटेन्शन मिळवू शकता. या शिवाय न्यू इयरला कोणता लुक कॅरी करावा हे तुमचे कन्फ्युजन देखील दूर होईलच की, चला तर मग नजर टाकूया 2022 च्या बेस्ट लुक्सवर! (फोटोज साभार – इंस्टाग्राम, योगेन शाह)

सिक्विन आउटफिट्सची चर्चा

या वर्षी सिक्विन आउटफिट्सची बरीच चर्चा झाली. साड्या, सूट, लेहेंग्यांपासून ते लहान कपड्यांपर्यंत अनेक आउटफिट्स सिक्विनने सजलेले दिसले आणि प्रत्येक पार्टीमध्ये या कपड्यांनी सर्वांच्या नजरा खेचून घेतल्या.

हेही वाचा :  मलायकाच्या प्रेग्नन्सीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर भडकला अर्जुन

(वाचा :- अनिल कपूरच्या बर्थ डेला बॅकलेस जान्हवी व शनायास बघून फुटला लोकांना घाम, बर्थडे काकाचा पण भाव खाल्ला या ललनांनी)

लो-राइज स्कर्ट आणि शॉर्ट्स

हाय-राइज नंतर यंदाच्या वर्षी 2022 मध्ये लो-राइजचा ट्रेंड खूप जास्त फॉर्ममध्ये होता. शिवाय हा ट्रेंड आता येणाऱ्या वर्षात सुद्धा खूप जास्त धुमाकूळ घालेले असे अनेक फॅशन व स्टाईल जाणकार सांगत आहेत. अनन्या पांडेपासून ते न्यासा देवगणपर्यंत सर्व डिव्हाज ही फॅशन फॉलो करताना दिसल्या. नवीन वर्षासाठी तुम्ही एखादा हटके लुक पाहत असाल तर कदाचित हाच तुमच्यासाठी परफेक्ट लुक आहे.

(वाचा :- मिनी स्कर्ट व को-आर्ड सेट घालून घरी गेली मलायका अरोरा, मलायकापेक्षा मरून साडीतील आईनेच जिंकलं नेटक-यांचं काळीज)

कट-आउट डिटेल ड्रेस

बॅकलेस ड्रेसेसनंतर, या वर्षी कट-आउट डिटेल असणारे आउटफिट्स लुक्स मोठ्या प्रमाणावर दिसले. जान्हवी कपूरपासून मलायका अरोरापर्यंत अनेक अप्सरा हा ट्रेंड फॉलो करताना दिसल्या. येत्या वर्षभरातही सेलिब्रिटी या फॅशनवर नक्कीच अजून एक्सपरिमेंट्स करतील यात शंकाच नाही कारण हा त्यांचा ऑल टाईम फेव्हरेट लुक आहे. पार्टी असो वा इव्हेंट अनेक बॉलीवूड अप्सरा अशाच प्रकारचे आउटफिट परिधान करणे पसंत करतात. जर तुम्हाला सुद्धा न्यू इयर पार्टीसाठी सगळ्यांचा कलेजा खल्लास करावा असा लुक हवा असेल तर हा लुक नक्की ट्राय करा.

हेही वाचा :  अंगभर कपडे घालूनही मलायकावर भडकले चाहते, म्हणाले “अगं लाज बाळग…”

(वाचा :- ताडासारख्या उंच सोनाक्षी सिन्हाने घातला गुडघ्यापेक्षा छोटासा स्कर्ट,किलर फिगर व नखरेल अदांनी केलं इंटरनेट डाऊन)

कार्गो पँट्स

अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा कार्गो पँटचा ट्रेंड सुरू झाला आहे. 2022 मध्ये अनेक सेलेब्सनी हा प्रयोग करून पाहिला. त्यामुळे काहीजण भविष्यात या लुकसह अजून नक्कीच काहीतरी नवीन करताना दिसतील. नवीन वर्षासाठी कार्गो पँट आणि क्रॉप टॉपचे कॉम्बिनेशनही तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. कारण हे एक युनिक कॉम्बिनेशन म्हणून ओळखले जाते जे गर्दीतही तुम्हाला अटेन्शन मिळवून देईल.

(वाचा :- इम्रान खानच्या एक्स वाईफने केले तिसऱ्यांदा लग्न, फोटो पाहून इम्रान खानही म्हणाले असतील ‘चूक तर झाली नाही ना.?”)

मिनी बॅग

नोरा फतेहीपासून दिशा पाटनी पर्यंत या वर्षी अनेक सेलिब्रिटी स्टायलिश मिनी बॅग कॅरी करताना दिसल्या. हा ट्रेंड जुना असला तरी 2022 मध्ये त्याची वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली. आणि येणाऱ्या वर्षात सुद्धा हा ट्रेंड अगदी सुसाट असेल यात शंका नाही. तुमची नवीन वर्षाची एखादी पार्टी असेल तर त्यात तुम्ही जो लुक कॅरी कराल तो मिनी बॅगशी मॅच करण्याचा प्रयत्न करा. मग बघा नक्कीच तुमचा लुक हा हटके होती की नाही!

हेही वाचा :  Nitin Gadkari : ''काम व्यवस्थित करत नसलेल्या...'' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणाचे टोचले कान?

(वाचा :- इंडियन क्रिकेटर शुभमन गिलच्या बहिणीला पाहिलं? मिनी, शॉर्टस, टाइट फिटिंगमधील फोटो बघून मलायका-नोराला विसरून जाल)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘तानाजी सावंत यांचा तातडीने राजीनामा घ्या, त्यांनी…’, रविंद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आलिशान कारनं (Pune Porsche Accident) चिरडून दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार …

‘6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..’, रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, ‘आपण अजून..’

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान …