ब्रा बदलण्याचे संकेत तुम्हाला मिळत आहेत का? तर दुर्लक्ष करू नका

इतर फॅशनप्रमाणे ब्रा बाबत बोलणं अथवा ती नक्की कधी बदलता यायला हवी आणि त्याची काय गरज आहे याबाबत माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण नवनवीन कपडे घेतोच. पण ब्रा कोणीच बघणार नाही अशा विचाराने अनेक महिला अनेक वर्ष एकच ब्रा वापरत असतात. जे तुमच्या स्तनांसाठी योग्य नाही. ब्रा सतत घातल्यावर खराब तर होतेच, त्याचे कप्स सैल होतात तर काही ब्रा च्या पट्ट्याही सैलसर होतात, काही ब्रा चा रंग उडतो पण तरीही अनेक महिला आळस आणि दुर्लक्ष करून तीच ब्रा वापरत राहातात. इतर गोष्टींप्रमाणे ब्रा वापरण्याचीही Expiry Date असते. या गोष्टींचे संकेतही मिळत असतात आणि असे संकेत मिळायला लागल्यावर तुम्ही ब्रा बदलायच हवी.

ब्रा चे स्ट्रॅप्स सैल झाल्यावर

अनेकदा आपण पाहतो की आपल्या मैत्रिणीही ब्रा ची खाली येणारी पट्टी दहा वेळा नीट करत असते. अशा पद्धतीने ब्रा च्या स्ट्रॅप्स खाली येत असतील तर वेळीच ब्रा बदलावी. कारण ब्रा ची पट्टी सैल झाल्यावर आपले लक्ष सतत त्याकडेच राहते. मुळात ब्रा ची पट्टी ही ब्रा चे कप्स आणि पाठ या दोघांनाही व्यवस्थित सपोर्ट देत असते. त्यामुळे सैलसर पट्टी झाल्यास, ब्रा त्वरीत बदलायला पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष करू नका. तसंच ब्रा चा आकार चुकीचा निवडला गेला तर ब्रा लवकर सैल होते. त्यामुळे योग्य आकाराची ब्रा निवडा आणि सैल झाल्या झाल्या लगेच बदला.

हेही वाचा :  मीठाचं क्रेविंग होणं सामान्य आहे का? Sushmita Sen ला होता हा विचित्र आजार, लक्षण ऐकून धक्काच बसेल

ब्रा चे हूक आणि मागील भाग सैलसर असल्यास

बऱ्याच ब्रा चे हूक हे मागच्या बाजूलाच असतात. तुम्ही ब्रा कशी वापरत आहात यावर हे अवलंबून असले तरीही एका ठराविक वेळेनंतर ब्रा चे हूक आणि मागचा भाग हा सैलसर होतोच. पण एक हूक सैल झाल्यावर दुसऱ्या हुकमध्ये ब्रा बसवली जाते. पण यामुळे ब्रा चा बँड अधिक खेचला जाऊन इलास्टिक सैल होते. ते आपल्या लक्षात येत नाही. आपण सवयीने अशीच ब्रा वापरत राहातो. त्यामुळे स्तनांना योग्य फिटिंग मिळत नाही अथवा स्तनांची उभारी जास्त दिसून येते. असे घडले असेल तर ब्रा बदलण्याची वेळ आली आहे हे समजा.

(वाचा – ‘ब्रा’ऐवजी ‘बूब टेप’चा वापर करण्याची फॅशन, वेस्टर्न वेअरसाठी उपयोगी)

ब्रा चा कपडा खराब होतोय हे कळल्यावर

कपड्यांची काळजी तुम्ही कशी घेता यावर तुमचे कपडे कसे टिकतात हे कळथे. इतर कपड्यांपेक्षा ब्रा चा कपडा अधिक लवकर खराब होतो. कपडे पिवळट होऊ लागले अथवा कपड्यांवर सुरकुत्या अधिक येऊ लागल्यावर ब्रा बदलण्याची वेळ आली आहे हे समजावे. कारण कपड्यातून निघणारे तंतू तुम्हाला त्रासदायक ठरतात. ब्रा चा कपडा खराब झाल्यावर त्याचे पॅडिंग खराब होणे, इलास्टिक सैल होणे या सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे तुम्ही वेळीच ही ब्रा बदलून टाकावी.

हेही वाचा :  Amol Kolhe: राष्ट्रवादी शिरुरमध्ये भाकरी फिरवणार? अजितदादांच्या गुगलीनंतर कोल्हे गॅसवर?

(वाचा – हेवी ब्रेस्टमुळे टेंन्शनमध्ये असता ? मग अशी निवडा तुमची ‘ब्रा’)

ब्रा च्या कप्स साईजमधील बदल

ब्रा चा सतत वापर केल्यामुळे कप्सच्या साईजमध्ये बदल होताना दिसतो. तर काही महिलांचे वजन वाढते वा कमी होते. असे अचानक वजन वाढले वा कमी झाले तर ब्रा घट्ट होते वा सैलसर होते. असा बदल तुम्हाला जाणवायला लागल्यावर कप्सच्या साईजमध्ये बदल झाला आहे तुम्ही लक्षात घ्या. घट्ट ब्रा मधून स्तनाची चरबी बाहेर दिसून कपड्यांमधून वेगळाच आकार दिसतो. त्यामुळे असे कप्स साईज बदलले आहेत हे लक्षात येताच तुम्ही लगेच ब्रा बदलावी.

(वाचा – पॅडेड ब्रा किंवा रात्री ब्रा घातल्यामुळे Breast Cancer चा धोका वाढतोय? डॉक्टरांनी दिलेलं उत्तर महत्वाचं)

ब्रा ची अंडरवायर खराब झाल्यास

Boobs चा आकार परफेक्ट दिसावा यासाठी अनेक मुली वा महिला अंडरवायर्ड ब्रा घालतात. पण या वायर्समुळे अनेकांना त्रास होतो. श्वास घेता येत नाही अथवा वायर्स स्तनांच्या खालच्या बाजूला टोचत राहतात. त्यामुळे अंडरवायर खराब झाली असेल अथवा सतत टोचू लागली असेल तर तुम्ही वेळीच ही बदलून टाकायला हवी. उगीच त्रास सहन करत तीच ब्रा घालू नका. यामुळे तुमच्या स्तनांचा खालचा भाग काळसर पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे सहसा त्रास होत असल्यास, त्वरीत ब्रा बदलून टाकावी.

हेही वाचा :  1200 भरा, महिन्याला 10,000 घ्या; महाराष्ट्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा स्कॅम; तब्बल 100 कोटींची लूट

ब्रा ही जितकी महत्त्वाची आहे हे समजण्याची गरज आहे, तितकंच त्याबाबत चर्चा होणेही गरजेचे आहे. ब्रा मुळे एखादा त्रास होत असेल अथवा ती कधी बदलायची त्याचा कसा वापर करायचा या माहितीसाठी तुम्ही नक्कीच आर्टिकल वाचायला हवे.

(फोटो क्रेडिटः Canva)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …