पोटात वेदना, किडनी स्टोन किंवा मुतखडा यासोबत ही 6 लक्षणे किडनीतील रक्ताच्या गाठीचे संकेत

रीनल वेन थ्रोम्बोसिस (Renal Vein Thrombosis) म्हणजे एक प्रकारची रक्ताची गाठ असते जी ही किडनीच्या त्या नसांमध्ये बनते ज्या रक्त बाहेर काढण्याचे काम करतात. तुमच्या किडनीमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्यास शरीरातून विषारी पदार्थ आणि घाण बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो, शरीर स्वच्छ करण्याचे काम नीट होत नाही. यामुळे ब्लड प्रेशर (Blood Pressure) आणि किडन फेल्युअरचा (Kidney Failuer) धोका अनेक पटींनी वाढतो.

याशिवाय अनेक प्रकरणांमध्ये ही स्थिती जीवघेणी झाल्याचे सुद्धा दिसून आले आहे. त्यामुळे भलेही तुम्ही याबद्दल पहिल्यांदा जाणून घेत असाल पण ही एक गंभीर गोष्ट आहे हे लक्षात ठेवा. किडनी स्टोन झाल्यावर जी सर्व लक्षणे दिसतात तिच सर्व लक्षणे ब्लड क्लॉटिंगच्या स्थितीत सुद्धा दिसून येतात. अशावेळी स्वत: कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

रीनल वेन थ्रोम्बोसिसची लक्षणे

Webmd च्या अनुसार, किडनी मध्ये रक्ताची गाठ जमा होणे अत्यंत घातक स्थिती आहे. म्हनुण्याच्याशी निगडीत संभाव्य लक्षणांवर लक्ष देणे खूप जस्त महत्त्वाचे आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नक्की याची लक्षणे काय आहेत? चला तर जाणून घेऊया. साईड पोट, पाय किंवा जांघ यांमध्ये वेदना होणे, लघुशंका करताना रक्त येणे, ताप येणे, उलटी वा मळमळ होणे, पायांमध्ये सूज निर्माण होणे, श्वास घेण्यास समस्या होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

हेही वाचा :  Ajit Pawar: "आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत, कोणी...", Alka Lamba यांच्या ट्विटला अजितदादांचं खणखणीत प्रत्युत्तर!

(वाचा :- जिम जॉईन करण्याआधी Health Checkup केल्यामुळे टळू शकतो का वर्कआऊटमधील Heart Attack चा धोका? वाचा डॉक्टरांचे मत)

का बनते किडनीत रक्ताची गाठ

बॉडी मध्ये रक्ताची गाठ अनेकदा अचानकच बनते. याचे कोणतेही स्पष्ट असे कारण नाही. पण ho अशी काही कारणे जाणकार सांगतात जी कदाचित हा आजार निर्माण करण्यास योगदान देऊ शकतात. यात डिहाइड्रेशन, गर्भ निरोधक वा एस्ट्रोजन थेरेपी, ट्यूमर, पोट वा पाठीला जखम होणे, किडनीच्या आजाराची फॅमिली हिस्ट्री, नेफ्रोटिक सिंड्रोम आणि ब्लड क्लोटिंग डिसऑर्डर अशा कारणांचा समावेश आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे.

(वाचा :- 8 वर्षांचा मुलगा झाला लठ्ठपणाचा शिकार, ही एक सोपी ट्रिक वापरून फक्त 9 महिन्यात आईने केलं तब्बल 10 किलो वेटलॉस)

कसे होते निदान

आता तुम्ही या रीनल वेन थ्रोम्बोसिस बद्दल माहिती घेतली. याची लक्षणे जाणून घेतली. हा आजार होतो कसा हे तुम्हाला समजले. कारणे समजली. पण आता हा आजार आपल्याला झालाय हे ओळखतात कसे हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. चला त्याचे सुद्धा उत्तर जाणून घेऊया. एनसीबीआईमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, कंप्यूटेड टोमोग्राफी (CT) एंजियोग्राफी ही टेस्ट रीनल वेन थ्रोम्बोसिसच्या निदानासाठी अत्यंत योग्य टेस्ट आहे. याशिवाय यूरिन टेस्ट- यूरीनालिसिस, अल्ट्रासाउंड, एमआरआयने सुद्धा हा आजाराचे निदान करता येते.

हेही वाचा :  तुमच्या नकळत कोण वापरतंय Wi-Fi, असे करा माहित, लगेच करा ब्लॉक

(वाचा :- Lung Cleansing Food: फुफ्फुसांना चिकटलेली घाण व विषारी कण होतील नष्ट, मजबूत-स्वच्छ फुफ्फुसासाठी खा हा 1 पदार्थ)

यावर उपाय काय?

रीनल वेन थ्रोम्बोसिसवर उपाय नक्की काय ते यावर अवलंबून आहे की क्लोटिंग नेमकी किती मोठी आहे. शिवाय ही क्लोटिंग दोन्ही किडनी मध्ये झालेली आहे का हे सुद्धा तपासून पाहणे खूप जास्त गरजेचे आहे. लहानशी गाठ निर्माण झाली असेल तर डॉक्टर तुम्हाला आराम करण्याचा सल्ला देऊ शकतात. शिवाय काही पथ्य पाळून आणि औषधे सेवन करून ह्या समस्येपासून सुटका मिळवता येते. मात्र जर गाठ खूप मोठी असेल तर मेडिसिन सह डायलीसीसच्या सर्जरीची देखील आवश्यकता असते.

(वाचा :- Cancer व Cholesterol हे भयंकर आजार मुळापासून संपवतात या 5 भाज्या, अमेरिकन डॉक्टरांनी सांगितले जबरदस्त फायदे)

रक्ताची गाठ होऊच नये म्हणून काय करावे?

ह्या मेडिकल कंडीशन पासून बचाव करण्याचा काही ठोस असा उपाय नाही किंवा तुम्ही एखादी गोष्ट केल्यावर ही कंडीशन होणार नाही असा दावा देखील करता येत नाही. पण हो यापासून जर तुम्हाला खरंच स्वत:चा बचाव करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराला सतत हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर होण्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तुम्ही ब्लड थिनर औषधांचा देखील वापर करू शकता.

हेही वाचा :  OYO चे मालक रितेशच्या बायकोला लाल साडीत बघून रोखल्या नजरा,अब्जाधिश असून जिंकले साधेपणाने मन

(वाचा :- Weight Loss: कानाकोप-यात जाऊन जाळेल पोट, कंबर, मांड्यांची जिद्दी चरबी, झपाट्याने होते वेटलॉस, खा हा एक पदार्थ)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा ‘तो’ मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा ‘लेटर बॉम्ब’मुळे खळबळ

maharashtra news : भगवान पवार नावाच्या आरोग्य अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच निलंबित अधिका-यानं …

इथं जाणारा कधीच परत येत नाही, भारतातील रहस्यमयी बेट; इथले लोकं जगाला का घाबरतात? 145 वर्ष जुनं रहस्य

North Sentinel Island Andaman Islands Tribe : अंदमान निकोबारमधील नॉर्थ सेंटीनल बेट हे संपूर्ण जगासाठी …