लग्नासाठी काय घालायचं असा पडलाय प्रश्न, तर ट्रेंडिंग पेस्टल रंगाच्या कपड्यांची करा फॅशन

लग्न असो अथवा कोणताही समारंभ, आपण स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत असतो. मग ते कपडे असोत अथवा दागिन्यांची विविध फॅशन. सध्या ट्रेंडमध्ये नक्की काय चालू आहे याचा विचार करूनच आपण लग्नसमारंभात अथवा अन्य कार्यक्रमांना नटूनथटून, पेहराव करून जातो. लग्न म्हटलं की काही रंग डोक्यात अगदी फिक्स असतात. पण सध्या लग्नाच्या सीझनमध्ये वेगळं दिसण्यासाठी गडद रंगांची गरज भासत नाही. कारण सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे ते म्हणजे पेस्टल कलर. लेटेस्ट ट्रेंडमध्ये पेस्टल रंगाची साडी, लेहंगा अथवा शराराची तुम्ही स्टाईल करून अधिक आकर्षक आणि वेगळे नक्कीच दिसू शकता. यासाठी काही युनिक आणि ट्रेंडिंग डिझाईन्सचा वापर करा आणि आम्ही दिलेल्या टिप्सचादेखील.

पीच पेस्टल साडी

साडी हा असा पेहराव आहे की, कोणत्याही समारंभामध्ये उठावदारच दिसतो. पण त्यातही लग्नामध्ये साडी नेसण्याचा ट्रेंड हा कधीही जुना होत नाही. पेस्टल रंगांमध्ये पीच पेस्टल साडी ही लग्नामध्ये तुम्ही नेसली तर ती अधिक आकर्षक आणि लक्षवेधी ठरते. पेस्टल रंगाची सिक्विन साडी असो अथवा चिकनकारी साडी असो तुम्ही ही स्टाईल नक्की ट्राय करू शकता. बाजारामध्ये साधारणतः २००० ते ३००० च्या किमतीत ही साडी तुम्हाला आरामात मिळते. त्यावर त्याला साजेसे दागिने घालून तुम्ही तुमचा लुक पूर्ण करू शकता.

हेही वाचा :  MHADA Lottery 2023: खूशखबर! हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार...4640 सदनिकांसाठी करू शकतात अर्ज

MT Fashion Tip: आता या साडीसह नक्की काय घालावे असा प्रश्न जर तुम्हाला मनात येत असेल तर या साडीसह तुम्ही मोत्यांचे दागिने घालून परफेक्ट लुक मिळवा. तसंच या स्टाईलची आणि पेस्टल रंगांची साडी प्लस साईज बॉडी टाईफ असल्यास अत्यंत सुंदर दिसते. त्यामुळे लग्नामध्ये एकदा या रंगाच्या साडीची फॅशन नक्की करून पाहा.

(वाचा – सेनोरिटा म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केले स्लिट ड्रेसमधले ग्लॅमरस फोटो, चाहते म्हणतात ‘सईच्या पावलावर पाऊल ठेऊ नकोस’)

ग्रीन पेस्टल लेहंगा

लेहंगा ट्रेंडही सध्या खूपच मुलींना आवडत आहे. ज्या मुलींना साडी सांभाळता येत नाही, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरतो. ग्रीन पेस्टल अथवा याच रंगांशी मिळताजुळता पेस्टल रंग तुम्ही लग्नासाठी लेहंगा घेताना निवडू शकता. साधारणतः ३००० ते ५००० च्या दरम्यान किमतीमध्ये लग्नासाठी बाजारात पेस्टल रंगाचा लेहंगा तुम्हाला मिळू शकतो.

MT Fashion Tip: तुमचा खांदा ब्रॉड अर्थात थोडा मोठा असेल तर तुम्ही या लेहंग्यासह कुंदनचे दागिने घालू शकता. तसंच या पेहरावासह तुम्ही ग्लॉसी बेस मेकअप अथवा ओठांसाठी केवळ लिपग्लॉसचा वापर केल्यास, तुमचा लुक अधिक खास होतो. यावर भडक पद्धतीचा मेकअप न करता पेस्टल रंगांशी मिळताजुळता मेकअप करावा जेणेकरून तुमच्याकडे अधिक लोकांचे लक्ष जाईल.

(वाचा – कंबरेत कट असलेल्या ड्रेसमध्ये मराठमोळ्या सईचा ग्लॅमरस जलवा, तुम्हीपण म्हणाल हिच्या समोर मलायका पण पानीकम)

हेही वाचा :  महाराष्ट्राची शान असणाऱ्या पैठणीतील सायली संजीवच्या अदा!

पेस्टल पिंक शरारा

शरारा अथवा घरारादेखील सध्या ट्रेंडमध्ये आहे. ज्यांना साडी नेसायला आवडत नाही अथवा लेहंग्यामध्ये पाय अडकण्याची शक्यता वाटते त्यांनी या स्टाईलचा पर्याय निवडावा. साधारणतः १५ ते २५ वयोगटातील मुलींना ही स्टाईल शोभून दिसते. नेट फॅब्रिकने तयार करण्यात आलेला असा पेस्टल पिंक शरारा लग्नामध्ये नक्कीच आकर्षक दिसतो. तसंच पेस्टल पिंक रंग हा कोणत्याही स्किन टोनवर उठावदार दिसतो. २००० ते ३००० च्या किमतीत हा शरारा सेट तुम्ही विकत घेऊ शकता.

MT Fashion Tip: अशा पेस्टल पिंक शरारासह तुम्ही हेव्ही इअररिंग्ज मॅच करून घालावे. तुमच्याकडे जरकन स्टोनवर्कचे कानातले असतील तर अधिक सुंदर दिसतील. याशिवाय हलकीशी हेअरस्टाईल केल्यासदेखील तुमच्या लुकला परफेक्शन मिळते. यासाठी सहसा ओपन हेअर स्टाईलची तुम्ही निवड करा. असं केल्यामुळे तुमच्या सौंदर्याला एक वेगळाज साज मिळेल यात शंका नाही.

(वाचा – शिमरी साडीत प्रार्थना बेहरेचा हॉट अंदाज, या वेडिंग सिझनला हे ५ लूक ट्राय करुन पाहा,कोणाची नजर तुमच्यावरुन हटणार नाही)

पेस्टल रंगांची कशी कराल स्टाईल – टिप्स

  • प्रोफेशनल थीमसाठी तुम्ही पेस्टल रंगांसह लाल आणि निळ्या रंगाचे कॉम्बिनेशन ट्राय करा
  • तर गडद रंगासाठी अर्दी कलर थीम तुम्ही वापरू शकता, जिथे तुम्हाला अधिक कॉन्ट्रास्ट रंगसंगती करावी लागते. उदाहरणार्थ – प्लम आणि रेडीश ऑरेंज अशा रंगाचे कॉम्बिनेशन कपडे तुम्ही वापरू शकता
  • क्रिस्प आणि ड्रामेटिक कलर स्किमसाठी तुम्ही राखाडी टोन्ससह खाली ब्राईट कूलर ग्रीन शेड वापरा. कूलर ब्लू हा रंग अधिक आकर्षक दिसतो. तसंच पाण्याचा निळा रंगही पेस्टलमध्ये अधिक उठावदार दिसतो
  • नैसर्गिक ब्राऊन आणि लाईट हिरव्या रंगामध्येही तुम्ही साडी वा शरारा ट्राय करू शकता
  • आईस ब्लू या रंगासह राखाडी रंग हा अत्यंत रिफ्रेशिंग आणि डोळ्यांना सुखद वाटतो
  • तसंच बबलगम गुलाबी अर्थात बबलगम पिंक आणि टरकॉईज ह्यूज या रंगाचे कॉम्बिनेशन तुमचा मूड ताजातवाना ठेवायला अत्यंत उपयोगी ठरतो
हेही वाचा :  ‘जरा जरा बेहकता हैं…’ दियाकडे पाहून चाहत्यांच्या मनात पुन्हा गाण्याची रूंजी

तुम्हाला जर लेटेस्ट आऊटफिट, रंग आणि स्टाईल याविषयी जाण असेल तर तुम्ही त्या पद्धतीने आपली स्टाईल मॅच करून घ्या. पण लग्नासाठी तुम्ही सध्या ट्रेंडिंग असणारे असे रंग नक्की एकदा ट्राय करून पाहा

(फोटो क्रेडिट – Instagram)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासा

महिला आजकाल कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. मग ते राजकारण असो, खेळ असो किंवा डॉक्टर …