त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो ओवा, तुकतुकीच त्वचेसाठी होतो उपयोग

ओवा हा स्वयंपाकघरातील अविभाज्य भाग आहे. आपण वापरत असलेल्या मसाल्यांपैकी हा एक पदार्थ. विशेषतः पराठ्यांमध्ये याचा वापर अधिक करण्यात येतो. तर खोकला अथवा पोटाच्या विकारांसाठीही ओव्याचा उपयोग करून घेता येतो. पोटातील दुखणे ओव्यामुळे हमखास कमी होते याची सर्वांनाच कल्पना आहे. पण हाच ओवा आपल्या सौंदर्यातही भर घालतो. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटतंय का? आजीबाईच्या बटव्यातील हा ओवा आपण त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी वापरू शकतो. त्वचेला चमक आणण्यासाठी आपण ओव्याचा फायदा करून घेऊ शकतो आणि याशिवाय केसांनाही याचा उपयोग होतो. आता त्वचा अधिक तजेलदार करण्यासाठी कशी ओव्याची मदत घ्यायची जाणून घ्या.

ओव्याचा मास्क मुरूमांवर ठरतो जालीम उपाय

मासिक पाळीच्या दिवसात असो अथवा अन्य वेळीही अनेक मुली वा महिलांना चेहऱ्यावर मुरूमं येण्याचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी बाजारातील अनेक फेसवॉश वा घरगुती फेसमास्कही वापरण्यात येतात. Home Remedies For Skin चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ओव्याचा विचारही करावा. याचा वापर करून पिंपल्सपासून आपल्याला नक्कीच सुटका मिळवता येते.

  • एका भांड्यामध्ये घरात ओवा भाजून तयार केलेली ओव्याची पावडर घ्या
  • या पावडरमध्ये साधारण एक चमचा दही मिक्स करा आणि पेस्ट तयार करा
  • ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण १० मिनिट्स तसंच ठेवा
  • त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग तुमच्या चेहऱ्यावर करू शकता
हेही वाचा :  दाऊद इब्राहिमवर विषप्रयोगाचा दावा; पाकिस्तानात सोशल मीडिया डाऊन, इंटरनेट ठप्प?

ओव्याच्या मास्कचा सुरकुत्यांसाठी वापर

ओवा त्वचेला चमक देण्यासह त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्याचेही काम करतो. सततची धावपळ, वेळेवर जेवण न होणं, धूळ, प्रदूषण यामुळे कमी वयातच सुरकुत्या चेहऱ्यावर दिसू लागतात. पण ओव्याचा वापर करून या सुरकुत्या कमी करता येतात. कारण ओव्यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि सुरकुत्या कमी होतात.

  • एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्या
  • त्यात ओवा मिक्स करा
  • हे पाणी थंड झाल्यावर पाणी गाळून घ्या आणि ओवा खलबत्त्यात ठेचून घ्या
  • ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि गाळलेले ओव्याचे पाणी प्या. यामुळे पोट साफ राहण्यास मदत मिळते
  • चेहरा साधारण १० मिनिट्सने स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हे करून पाहू शकता

(वाचा – थंडीत शेवग्याची पाने केवळ बीपीसाठीच नाही तर चेहरा आणि केसांसाठी देखील फायदेशीर,असा करा ‘वंडर ग्रीन’ वापर)

त्वचा हवी असेल चमकदार तर प्या ओव्याचे पाणी

त्वचा धूळ आणि प्रदूषणामुळे खूपच खराब आणि निस्तेज होते. त्वचेचे आरोग्यही बिघडते. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी ओव्याचे पाणी फायदेशीर ठरते. त्वचेत खोलवर जाऊन ओव्याचे पाणी पोषण देते आणि यामुळे चेहरा हायड्रेट राहण्यासाठीही मदत मिळते. चेहरा मऊ, नितळ आणि चमकदार दिसण्यासाठी तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. तसंच ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे पोटाचे विकारही दूर राहतात

  • पाण्यात ओवा मिक्स करून उकळून घ्यावे
  • पाणी गाळून घ्यावे आणि गरम पाण्याचे सेवन करावे. मात्र अतिप्रमाणात याचा वापर करू नये
हेही वाचा :  जिममध्ये कितीही घाम गाळा, हे ५ पदार्थ हद्दपार कराल तर तर वजनाचा काटा सरकेल

(वाचा – चमकदार त्वचेसाठी बाबा रामदेवांनी सांगितले साधे सोपे घरगुती उपाय, १ आठवड्यात येईल रिझल्ट)

डेड स्किनसाठी ओव्याचा स्क्रब

डेड स्किन अर्थात मृत पेशी काढून टाकण्यासाठी स्क्रबचा वापर महिला हमखास करतात. या स्क्रबिंगमुळे ब्लॅकहेड्समधील घाण निघून जाणे, टॅनिंग कमी होणे असे फायदे मिळतात. यासाठी तुम्ही घरगुती पद्धतीने ओव्याचा स्क्रब तयार करून त्याचा वापर करून घ्या.

  • एका वाटीत एक चमचा ओवा पावडर घ्या आणि त्यात साखर आणि लिंबाचा रस मिक्स करून स्क्रब तयार करा
  • हा स्क्रब चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा
  • साधारण २ मिनिट्स मसाज करून झाल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि फरक पाहा
  • पंधरा दिवसातून एकदा तुम्ही याचा वापर करू शकता

(वाचा – केस खूप गळताहेत ? टक्कल पडण्याची भिती वाटते, काळ्याभोर केसांसाठी आवळ्याचा वापर करा, काही दिवसातच फरक जाणवेल)

सफेद केसांचा त्रास होईल दूर

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही समस्या अनेकांना त्रासदायक ठरते. पांढऱ्या केसांना दूर ठेवण्यासाठी ओव्याचा वापर करावा. ओव्यातील पोषक तत्वे केसांना मजबूती देण्यासाठी आणि केस काळे ठेवण्यासाठी मदत करतात. सफेद केसांनी हैराण असाल तर हा उपाय करू शकता.

  • रात्री एका ग्लासात पाणी घ्या आणि भाजलेला ओवा दोन चमचे मिक्स करा. रात्रभर हे तसंच ठेवा
  • दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि जेवण्यापूर्वी अथवा नाश्ता करण्यापूर्वी हे पाणी प्या
  • केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही कॅरम सीड ऑईलचाही उपयोग करू शकता. या तेलाने मसाज केल्यास केसांचा सफेदपणा कमी होतो
हेही वाचा :  अर्जुन कपूरची प्रेयसी मलायका व बहिण अंशुलात ग्लॅमरची जुगलबंदी, मलायकाला मागे सारत अंशुलानेच लावली इंटरनेटवर आग

हे अत्यंत सोपे आणि घरगुती उपाय असून पोटापुरता ओवा फायदेशीर नाही तर त्वचेसाठीही उत्तम ठरतो.

(विशेष सूचनाः चेहऱ्यावर कोणत्याही गोष्टीचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करून घ्या. तसंच तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही तुमच्या डर्मेटॉलिजिस्ट सल्ला घेऊनच वापर करावा)

(फोटो क्रेडिटः Freepik.com, Canva)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharastra Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान …

Maharastra Politics : ‘अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे…’, अंजली दमानिया यांची मागणी

Anjali Damania demanded narco test of Ajit Pawar : पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर आता …