Amitabh Bachchan : आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय : अमिताभ बच्चन

Amitabh Bachchan In Kolkata International Film Festival : कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Kolkata International Film Festival) गुरुवारी देशभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या यादीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नावाचाही समावेश आहे. महोत्सवादरम्यान त्यांनी सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य केलं. 

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वाच्या उद्धाटनादरम्यान अमिताभ बच्चन म्हणाले,”आजही सिनेमाचा विचार करताना सर्वात आधी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मला खात्री आहे इथे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हे मान्य करेल”. 

अमिताभ पुढे म्हणाले,”एखाद्या सिनेमाची निवड करण्याबद्दल सध्या खूप विचार केला जात आहे. चांगल्या दर्जाच्या सिनेमांची निर्मिती होत आहे. पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या सिनेमांची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच हे सिनेमे प्रेक्षकांना सिनेमागृह ते ओटीटी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पाहता येत आहेत. आपण प्रेक्षकांना गृहित धरू शकत नाही. त्यामुळे त्यांना काय पाहायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे”. 


कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावत अमिताभ बच्चन, शाहरुख खान (Shah Rukh Khan), जया बच्चन (Jaya Bachchan), राणी मुखर्जीसह (Rani Mukerji) अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. दरम्यान शाहरुख खानने त्याच्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाच्या वादावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,”काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. खरंतर सिनेमा हे समाज बदलण्याचं माध्यम आहे. 

हेही वाचा :  पुष्पाची क्रेझ, यह टायर तो फायर निकला... डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केला वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ

संबंधित बातम्या

KIIF : विविध जाती-धर्माच्या लोकांना उत्तम पद्धतीनं समजून घेण्यासाठी ‘सिनेमा’ हेच योग्य माध्यम; ‘पठाण’च्या वादात शाहरुख खानचं वक्तव्य



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …