रॉयल फॅमिली ‘या’ पद्धतीने करते मुलांचं संगोपन, पॅरेंटिंग टिप्सचा तुम्हालाही होईल फायदा

ब्रिटीश राजघराण्यांचे लोक अतिशय लॅविश आयुष्य जगत असतात. परंतु त्यांना काही नियम आणि शिष्टाचार देखील पाळावे लागतात. मात्र जेव्हा पॅरेंटिंगचा मुद्दा येतो तेव्हा ही बाब मात्र सगळीकडे सारखीच असते. रॉयल कुटुंबातील व्यक्तींना देखील सामान्य लोकांसारखे प्रश्न पडतात किंवा ते तसे वागतात. त्यांनाही लहान मुलांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. गरोदरपणाची लक्षणे सहन करावी लागतात. काम आणि कुटुंबाचा समतोल साधण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र तरीही रॉयल कुटुंबातील पालक शांत राहून आपली प्रत्येक जबाबदारी पार पाडतात हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे आज आपण या लेखातून खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

​मुलांना मुलंच राहू द्या

राजेशाही मुलांना मोठे होताना पाहणे हा एक आनंद आहे. प्रिन्स लुईस देखील सार्वजनिक ठिकाणी आपले ट्रँट्रम्स दाखवतो. कितीही सेलिब्रिटी असले किंवा राजघराण्याचे सदस्य असले तरीही ते लहान मुलं आहे हे यामधून दिसून येते. महत्वाचं म्हणजे रॉयल दाम्पत्य त्यांच्या मुलांना मजा करण्यापासून रोखत नाहीत.

हेही वाचा :  कमळाला पानगळती, शिवसेनेत इनकमिंग वाढले; चार आले आणखीही येणार

(वाचा – वर्किंग मदरला मुलांसोबतचं नातं घट्ट करायचं असेल तर सद्गुरूंच्या या टिप्स करा फॉलो)

(फोटो सौजन्य – The Prince and Princess of Wales इंस्टाग्राम)

​आनंद साजरा करणं गरजेचे

गेल्या काही वर्षांत रॉयल पॅरेंटिंगमध्ये खूप बदल झालेत. आता रॉयल कुटुंबातील मुलांवर कमी बंधने आणि नियम असतात. मुलांना सामान्य आणि कायम आनंदी ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. राजेशाही जोडप्याला त्यांच्या मुलांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांची मजा कमी करायची नाही. यासोबतच मुलांना आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या, राजेशाही शिष्टाचार आणि कर्तव्यांचीही जाणीव करून द्यायची आहे.

(वाचा – 8 वर्षाच्या मुलाला पालकांनी जबरदस्तीने रात्रभर पाहायला लावला टीव्ही, टीव्हीचं वेड म्हणून दिली ही शिक्षा)

(फोटो सौजन्य – The Prince and Princess of Wales इंस्टाग्राम)

​स्क्रिन टाइमही असतो

अनेकदा पालक तक्रार करतात की त्यांचे मूल जास्त टीव्ही पाहतात. पण जर टीव्ही किंवा मोबाइलच्या वेळा मर्यादित ठेवल्या तर काहीच नुकसान होत नाही. रॉयल कपलही तेच करतात. केट मिडलटन स्क्रीम टाइमबाबत प्रिन्स विलियमपेक्षा अधिक कठोर आहे. ती मुलांना कला, हस्तकला, चित्रकला यामध्ये व्यस्त ठेवण्याचा विचार करते.

हेही वाचा :  Shivsena Poem Viral: 'चोरली कोणी शिवसेना...'; म्हणत तरुण शाहिरानं राज्यकर्त्यांना विचारला जाब

(वाचा – Normal Delivery Stitches: नॉर्मल डिलीवरीमध्ये का घालतात टाके आणि या सगळ्यातून बरं व्हायला लागतात किती दिवस?))

​मुलांचे प्रश्न सोडवतात

प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन मुलांशी मोकळेपणाने गप्पा मारतात. मुलांना मनातील सर्व गोष्टी बोलण्याची संधी देतात. ते आपल्या मुलांवर ओरडत नाहीत किंवा रागावत नाहीत तर त्यांच्याशी संवाद साधतात. ज्यामध्ये ते त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात.

(वाचा – अजिंक्य रहाणेने शेअर केलं मुलाचं नाव आणि पहिली झलक, प्रभू रामाच्या अर्थाचे ठेवले नाव))

(फोटो सौजन्य – The Prince and Princess of Wales इंस्टाग्राम)

​प्रेमाने समजवतात

रॉयल कुटुंबातील पालक आपल्या मुलांना प्रेमाने समजवतात. अशावेळी त्यांचे हाताचे जेश्चर आणि कोड शब्द खूप मदत करतात. 2017 मध्ये पिप्पा मिडलटनच्या लग्नादरम्यान, प्रिन्स जॉर्ज थोड्या वेगळ्या पद्धतीने वागताना दिसला होता. तेव्हा केटने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला व्यवस्थित वागण्यास सांगितले. तुम्ही देखील या टिप्स आपल्या मुलांसोबत वापरू शकतात.

(इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

(फोटो सौजन्य – The Prince and Princess of Wales इंस्टाग्राम)

हेही वाचा :  शरीराचा एक एक अवयव निकामी करते Vitamin K ची कमी, ताबडतोब खायला घ्या हे 6 पदार्थ

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …