शरीराचा एक एक अवयव निकामी करते Vitamin K ची कमी, ताबडतोब खायला घ्या हे 6 पदार्थ

शरीराला अनेक जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे (Minerals) आवश्यक असतात. अशा परिस्थितीत शरीरात यापैकी कोणत्याही प्रकारच्या व्हिटॅमिन किंवा मिनरल्सची कमतरता निर्माण झाली तर आपल्याला विविध आजार होऊ लागतात. त्याचप्रमाणे शरीरात व्हिटॅमिन ‘K’ च्या कमतरतेमुळे अनेक आजारांचा धोका असतो. व्हिटॅमिन K च्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या आणि आजार उद्भवू लागतात. या शिवाय जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन क पुरेशा प्रमाणात असेल, तर ते कॅन्सरपासून तुमचे संरक्षण करते, हाडांच्या विकासात मदत करते, तसेच इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते.

एसआरव्ही ममता हॉस्पिटल, डोंबिवली येथील डाएटिशियन नेहा चौधरी यांच्या मते, व्हिटॅमिन K मध्ये दोन घटक असतात. एक म्हणजे व्हिटॅमिन K1 जे तुम्हाला भाज्यांमधून मिळते. आणि व्हिटॅमिन K2, जे मांस आणि अंडी या पदार्थांपासून मिळते. आज आपण या लेखातून जाणून घेऊया त्यांनी दिलेली खास माहिती जी तुम्हाला हेल्दी ठेवण्यास नक्की मदत करेल.

व्हिटॅमिन क च्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या

  1. हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण होऊ लागतात
  2. हाडे कमकुवत होतात
  3. ऑस्टिओपोरोसिससारखे रोग होऊ शकतात
  4. रक्ताच्या धमन्या कठोर होतात
  5. डोळ्यांच्या समस्या देखील उद्भवतात
  6. दातांच्या समस्याही निर्माण होतात. ब्रश करताना किंवा इंजेक्शन घेताना रक्तस्त्राव होतो
  7. नाकातून वारंवार रक्त येणे हे देखील व्हिटॅमिन क च्या कमतरतेच्या लक्षणांपैकी एक असू शकते
  8. व्हिटॅमिन क मुळे दात मुळापासून मजबूत देखील होतात आणि ते तुटण्यापासून किंवा कुजण्यापासून रोखतात
  9. लघवीतून रक्त येणे हे व्हिटॅमिन क च्या कमतरतेचे लक्षण आहे
हेही वाचा :  'झिलमिल' गाण्यातून घडणार 'मुसाफिरा'ची सफर

(वाचा :- स्टडीमध्ये खुलासा; घोरणा-या लोकांना आहे Cancer चा सर्वात जास्त धोका, या 5 घरगुती उपायांनी वेळीच कमी करा जोखिम)

लहान मुलांना व्हिटॅमिन क चा सर्वाधिक धोका

गर्भधारणेदरम्यान आणि डिलिव्हरी नंतरही डॉक्टर अनेकदा बाळाची तपासणी करतात. यासोबतच त्यांना व्हिटॅमिन क चे इंजेक्शनही दिले जाते. परंतु जर बाळामध्ये व्हिटॅमिन क ची कमतरता असेल तर त्यांच्यामध्ये रक्तस्रावी रोग विकसित होऊ शकतो. ज्याला वैद्यकीय भाषेत HDN असेही म्हणतात. म्हणूनच लहान मुलांना योग्य प्रमाणात व्हिटॅमिन क मिळणे गरजेचे असते. यासाठीच मुलांच्या आहाराकडे लक्ष असणे महत्वाचे आहे.

(वाचा :- मॅच दरम्यान स्टार फुटबॉलरचं हृदय पडलं अचानक बंद, या भयंकर आजाराचं दिसत नाही एकही लक्षण, 6 गोष्टींपासून रहा दूर)

व्हिटॅमिन K गरजेचे का आहे?

-k-

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, जखम भरणे आणि रक्त पातळ करणाऱ्या औषधांच्या हानिकारक प्रभावांना निष्प्रभ करण्यात व्हिटॅमिन क महत्त्वाची भूमिका बजावते. याव्यतिरिक्त, नवजात मुलांमध्ये रक्तस्त्रावाचे विकार टाळण्यासाठी व्हिटॅमिन क देखील उपयुक्त आहे. हाडांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी व्हिटॅमिन क देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन ड सोबतच व्हिटॅमिन क निरोगी हाडे आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे हाडांची घनता वाढवते आणि वृद्ध महिलांमध्ये फ्रॅक्चरची शक्यता कमी होते. हे ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांच्या झीज होण्यामध्ये देखील यशस्वीरित्या मदत करते. एका संशोधनानुसार, हे व्हिटॅमिन धमनीच्या भिंतींमधील खनिजीकरण रोखते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य देखील सुधारते.

हेही वाचा :  "पवारांबरोबरच्या बैठकीत BJP आणि NCP चं सरकार स्थापन करण्याचं ठरलं, पण..."; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा गौप्यस्फोट

(वाचा :- कॅन्सर, पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता, मुळव्याधाने तडपवून मारतो सकाळ-सायंकाळ घेतला जाणारा हा पदार्थ, आजच बंद करा)

व्हिटॅमिन K मिळवण्यासाठी काय खावे?

-k-

जर तुम्हाला व्हिटॅमिन क च्या कमतरतेची लक्षणे दिसली तर तुम्ही ही कमतरता आहाराद्वारे सहज पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात फक्त कच्चे चीज, कोबी, काजू, किवी, डाळिंब आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे लागेल. तसेच, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध किंवा सप्लिमेंट घेऊ शकता. स्वत:च्या मनाप्रमाणे कोणताही पदार्थ खुं नका किंवा कोणा व्यक्तीने दिलेला सल्ला एकून सुद्धा चुकीचा आहार घेऊ नका. अशावेळी केवळ डॉक्टरांचाच सल्ला ऐका.

(वाचा :- वेटलॉस, पोट साफ न होणं, डायबिटीज, बॉडी डिटॉक्स, डायजेशनच्या समस्या होतील दूर, खा हा 1 पदार्थ)

हाडे मजबूत ठेवण्यासाठी काय करावे?

नियमित व्यायामामुळे स्नायू तयार होतात, ज्यामुळे हाडे तुटण्यास अडथळा होतो. तसेच, जर तुम्हाला वृद्धापकाळात कमकुवत हाडांच्या समस्येचा सामना करायचा नसेल, तर आतापासून सिगारेट आणि अल्कोहोलचे सेवन बंद करा किंवा अगदी कमी प्रमाणात करा. याशिवाय साखरेच्या ड्रिंक्सपासून दूर राहा. तुम्ही जेवढे लक्ष स्वत:च्या आरोग्याकडे द्याल तेवढा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही जेवढे दुर्लक्ष कराल तेवढे तुमचे आरोग्य कमी होत जाईल. म्हणूनच सकस आहार घ्या आणि हेल्दी आयुष्य जगा.

हेही वाचा :  डायबिटिजमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणे धोकादायक, इन्सुलिन बिघडवतात या सवयी

(वाचा :- Sleeping Tips: रात्री 10 नंतर अजिबात करू नका ही 5 कामे, विळख्यात ओढतील हार्ट अटॅक व स्ट्रोकसारखे गंभीर आजार)

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …