विवस्त्र झोपून मिळवा चिरतरुण सौंदर्य, सांगतेय जगातील सर्वात Hot महिला

मुंबई : काही व्यक्ती या त्यांच्या रुपानंच सर्वांचं लक्ष वेधतात. त्यांचं व्यक्तीमत्त्वं आणि एकंदरच त्यांचं वावरणं इतलं लक्ष वेधणारं असतं की, ठरवूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य होत नाही. सध्या अशाच एका व्यक्तीच्या नावाची चर्चा होत आहे. ही चर्चा आहे, त्या व्यक्तीच्या रुपामुळं आणि वयामुळं. 

ऑस्ट्रेलिया (Australia) येथील एका महिलेबाबत सध्या दावा करण्यात येत आहे की, त्या जगातील सर्वात मादक ‘आजी’ आहेत. (World’s Hottest Grandmother) 

आता आम्ही आजी का म्हणतोय याबद्दल तुम्हाला लवकरच कळेल…

हल्लीच त्यांनी सोशल मीडियावर टॉपलेस फोटो शेअर केला, जिथं त्या आपल्या या चिरतरुण सौंदर्याचं गुपित सांगताना दिसल्या. 

माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार या महिलेचं नाव गिना स्टेवर्ट असं आहे. त्यांचं वय 51 वर्षे असं सांगण्यात येत आहे. 

त्यांना चार मुलं आणि एक नातूही आहे. मुख्य बाब अशी, की ऑस्ट्रेलियातील सर्वात आकर्षक 10 महिलांमध्येही त्यांच्या नावाचा समावेश आहे. 

तुम्हालाही असंच चिरतरूण राहायचंय? 
गिना स्टेवर्ट यांनी इन्स्टाग्रामवर स्वत:चा टॉपलेस फोटो शेअर करत चिरतरुण राहण्यासाठी एक मार्गही सांगितला. 

सर्व कपडे काढून विवस्त्र झोपलं असता दीर्घकाळ तरुण आणि निरोगी राहता येतं, असं त्यांनी सांगितलं. इतकंच नव्हे, तर असं केल्यास गाढ झोपही लागते, ज्याचा परिणाम आरोग्यावर होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा :  बांगलादेशी क्रिकेटरच्या बायकोसमोर क्लीन बोल्ड होतायत बॉलीवूडच्याही अभिनेत्री

गिना यांनी सांगितल्यानुसार विवस्त्र झोपल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया अधिक योग्य पद्धतीने चालते. ज्याचा फायदा मांसपेशींना होतो. शिवाय शरीरात ग्रोथ हार्मोन आणि मेलाटोनिनही बाहेर येतं. 

ग्रोथ हार्मोम नखं आणि चांगल्या त्वचेसाठी कधीही फायद्याचे असतात. शिवाय मानसिक थकवाही कमी होतो. 

तुम्हीही या गोष्टी लक्षात ठेवा, असं सांगत आपल्या तारुण्याचं हेच गुपित असल्याचंही त्यांनी सांगितलं. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच’ ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. …

दिल्लीचे ‘कटपुतली’ म्हणणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले ‘यांना नाक खाजवायला…’

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात होत असून त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकमेकांवर …