Shivsena Poem Viral: ‘चोरली कोणी शिवसेना…’; म्हणत तरुण शाहिरानं राज्यकर्त्यांना विचारला जाब

Maharashtra Political News Viral Video : ‘संविधानाच्या कलमामधला हा आयोग लावतोय चुना’, असं म्हणत राज्यात अनेक वर्षांपासून दबदबा असणाऱ्या (Shivsena) शिवसेनेवरून सुरु असणाऱ्या राजकारणावर एका तरुण शाहिरानं शब्दांमार्फत प्रहार केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल दिला आणि यानंतर ठाकरेंनी वाढवलेली, जोपासलेली शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांना पाठींबा असणाऱ्या आमदारांच्या बाजूनं गेली. पक्षाचं नाव आणि चिन्हं सर्वकाही आता शिंदे गटाकडे असल्यामुळं ठाकरे गटाकडून याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

‘रावणालाही शिवधनुष्य पेललं नाही…’, असं म्हणत खुद्द (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी समर्थकांना संबोधित करत त्यांचा संताप शमवण्याचा प्रयत्न केला. राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं असतानाच इथे आता सर्वसामान्यसुद्धा व्यक्त होऊ लागले आहेत. अनेकांनीच ठाकरेंना सहानुभूती देत त्यांची बाजू उचलून धरण्याचाही प्रयत्न केला आहे. असाच प्रभावी प्रयत्न करत मुळच्या कोकणातील असणाऱ्या आणि नोकरीसाठी मुंबईत (Mumbai) राहणाऱ्या युवा कवी/ लेखक विकास लांबोरे यांनी एक (Video) व्हिडीओ शेअर केला. 

 

स्वत:च्या शब्दांत त्यांनी ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंपुढे उदभवलेल्या परिस्थितीला वाचा फोडली आहे. सर्वोच्च न्यायालयाला विनंती करत आमच्याही वेदना ऐका अशी साद त्यांनी आपल्या काव्यातून घातली आहे. 

हेही वाचा :  देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांनंतरचे खरे हिंदुहृदयसम्राट : नितेश राणे

‘सत्ताधाऱ्यांनो बाळगा लाज, जाणा लोकवेदना
चार चौघात केलाय गुन्हा, सांगा चोरली कोणी शिवसेना?’,

गीतातील या ओळी वाचून शिवसेनेची अशी अवस्था करणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या विकास लांबोरे यांच्या या गीताची अनेकांनी दखल घेतली असून, सध्या त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारे विकास लांबोरे आहेत तरी कोण? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळं विकास लांबोरे यांचं नाव चर्चेत आलं. नोकरीसाठी मुंबईत असणारे लांबोरे मुळचे कोकणच्या रत्नागिरी येथील लांजाचे रहिवासी. ‘भोंबडातला डोंगळा’ हा त्यांचा गाजलेला काव्यसंग्रह. करतो इदवास भगत बुवा, पावनं जाऊ नका जेवल्याशिवाय या गीतांनी त्यांना विशेष लोकप्रियता दिली. सध्या हाच चेहरा ‘चोरली कुणी शिवसेना’ या गीतामुळं घराघरात पोहोचला आहे. 

‘चोरली कुणी शिवसेना’ हे संपूर्ण गीत एकदा पाहाच… 
सुप्रीम कोर्टा तुम्हा विनवणी, ऐकाव्या वेदना
संविधानाच्या कलमामधला हा आयोग लावतोय चुना;
चार चौघात केलाय गुन्हा… सांगा चोरली कोणी शिवसेना?

मराठी मुलखाचा अभिमान, शिवसेना अन् धनुष्यबाण
सत्तेचा हा माज कशाला, विचारी जनता जनार्दन
सत्ताधाऱ्यांनो बाळगा लाज, जाणा लोकवेदना
चार चौघात केलाय गुन्हा, सांगा चोरली कोणी शिवसेना?

हेही वाचा :  Twitter चं रुपडं पालटसं; PM Modi यांच्यामागोमाग तुमच्याही अकाउंटमध्ये झाले असतील 'हे' बदल

याची डोळा, याची देही, फोफावली ही हुकूमशाही
म्हणे जगात सर्वात मोठी, भारतात या लोकशाही
सरन्यायाधीश तुम्हा साकडं, वाचवा हो संविधाना
चार चौघात केलाय गुन्हा, सांगा चोरली कोणी शिवसेना?Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

Video : ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’ सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान महिलेनं गायलं डोळ्यात अश्रू आणणारं भजन

C section delivery Viral Video : आई… या शब्दाची फोड करताना आ म्हणजे आत्मा आणि …