”मी खोटं बोलणार नाही पण..” Mansi Naik ने सांगितले घटस्फोटाचं खरं कारण

‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाणांमुळे प्रकाशझोतात आलेली मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही सध्या तिच्या घटस्फोटाच्या विवादावरून चर्चेत आहे. मानसी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच मानसीनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरामध्ये यांच्यामध्ये दुराव निर्माण झाला या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला आहे. ती लवकरच घटस्फोट घेणार आहे. मानसीने घटस्फोटासाठी अर्ज दिल्याचे एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. मानसी नाईक हिने स्वत: त्यांच्यात काय बिनसले याचा खुलासा केला आहे. (फोटो सौजन्य: @manasinaik0302)

​मानसीच्या घटस्फोटाचे कारण

गेल्या काही दिवसांपासून मानसी नाईक तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे चर्चेत आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिने या घटस्फोटाचे कारण सांगितले आहे. या मुलाखतीत मानसी नाईकने पहिल्यांदा मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. “माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असे तिने म्हटले होते. त्यानंतर मानसी नाईकने तिच्या घटस्फोटामागची कारण सांगितली आहे. (वाचा :- या २ गोष्टी तुमचा संसार सुखाचा करतील, Sudha Murthy यांनी दिला गुरुमंत्र)

हेही वाचा :  "मी एवढेच सांगेन की..."; CM च्या मुलाने आपली सुपारी दिल्याच्या राऊतांच्या दाव्यावरुन अमृता फडणवीसांचा टोला

आमच्यात नेमकं काय चुकलं सांगणं कठीण

“आमच्यात नेमकं काय चुकलं हे सांगणं आता माझ्यासाठी कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत. पण हे सगळं खूपच वेगात घडलं. आजही माझा प्रेमावर विश्वास आहे. मला पुन्हा प्रेम करायचं आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा मला माझं कुटुंब हवं होतं आणि त्यामुळे मी लग्न केलं. अर्थात तेही सर्व खूपच घाईघाईत झालं. आता मला फक्त माझ्या करिअरवर लक्ष द्यायाचे आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे. पण एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊ एवढ्या खालच्या थराला ती व्यक्ती जाऊ शकते हे समजून घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं” असे मानसी नाईक म्हणाली.

आनंदी नसाल तर नात्यात न राहणंच योग्य

जर तुम्ही कोणाससोबत आनंदी नसाल किंवा त्या व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात असल्याने किंवा नसल्याने काहीच फरक पडत नसेल तर अशा नात्यातून तुम्ही बाहेर पडलेलेच योग्य राहिल. (वाचा :- एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी)

हेही वाचा :  'यांच्याकडून शिकावं लागेल'; विराट आणि जाडेजाचा डान्स पाहून शाहरुख झाला इम्प्रेस

​एकाच विषयाची पुनरावृत्ती करू नका

तुमच्या जोडीदाराला प्रत्येक वेळी त्याने केलेल्या गोष्टीबद्दल त्याला त्रास देऊ नका. अशा स्थितीत त्यांना राग येईल त्यामुळे अशा गोष्टींची पुनरावृत्ती करू नका. गोष्टी योग्य पद्धतीने हाताळायला शिका. यामुळे तुम्हाला फायदाच होईल. (वाचा :- Living Happy Married Life: या २ गोष्टी तुमचा संसार सुखाचा करतील, सुधा मूर्ती यांनी दिला गुरुमंत्र)

नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करा

एखादे नाते टिकवण्यासाठी तुम्ही तुमच्याकडून १०० टक्के द्या. पण काही काळाने ही गोष्ट जर तुमच्या स्वाभिमानावर आली असेल तर अशा टॉक्सिक नात्यापासून लांब राहणे योग्य. (वाचा :- बाबा, थांब ना रे तू, बाबा जाऊ नको दूर.. वडिलांच्या निधनाच्या वर्षभरानंतर सायली संजीवने सांगितला ‘तो’प्रसंग)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पुणे अपघातानंतर अजित पवारांचे पोलीस आयुक्तांना अनेक कॉल्स, फोन अटकेसाठी की वाचवण्यासाठी?

Pune Porsche Accident : पुणे अपघातानंतर पोलीस आयुक्तांना अजित पवारांनी (Ajit Pawar) मल्टिपल कॉल्स केले. …

10वी उत्तीर्ण झालायत? एसटी महामंडळात नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

MSRTC Recruitment 2024: दहावी उत्तीर्ण आहात? तुम्ही आयटीआयदेखील केलंय? मग वाट कसली पाहताय? एसटी महामंडळातील …