तुमचे ट्रेन तिकीट कन्फर्म झाले की नाही?, या ५ स्टेपने करा चेक

नवी दिल्लीःHow To Check PNR Status: भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा दिली आहे. आता WhatsApp द्वारे तुम्ही पीएनआर स्टेट्स चेक करू शकता. या ठिकाणी तुम्ही रेल्वेचे स्टेट्स सह अनेक अन्य माहिती चेक करू शकता. WhatsApp वर पीएनआर आणि लाइव्ह ट्रेनची स्थिती चेक करण्यासाठी चॅटबॉट मध्ये १० अंकाचा पीएनआर नंबर टाकावा लागेल. हे कसे करायचे या संबंधी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

स्टेप 1:आपल्या स्मार्टफोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जा. या ठिकाणी Railofy चा ट्रेन चौकशी नंबर (+91-9881193322) सेव्ह करा.
स्टेप 2:आता, WhatsApp ओपन करा आणि Railofy च्या चॅटबॉट नंबरच्या चॅट विंडो मध्ये जा.
स्टेप 3:पुन्हा तुम्हाला आपल्या ट्रेनचा १० अंकाचा पीएनआर नंबर या ठिकाणी टाकावा लागेल. नंतर याला सेंड करावे लागेल.
स्टेप 4:Railofy चॅटबॉट पीएनआर स्थिती, ट्रेनची स्थिती आणि अलर्ट सारख्या डिटेल्सची माहिती तुम्हाला पाठवली जाईल.
स्टेप 5:चॅटबॉट आता ऑटोमॅटिकली तुम्हाला WhatsApp वर ट्रेनची रिअल टाइम स्थिती पाठवेल.

तुम्ही तुमच्या फोनवरून १३९ डायल करून सुद्धा रेल्वेची स्थिती माहिती करून घेऊ शकता. ही खूपच झंझटचे काम आहे. कारण, यात कॉल लावणे खूपच कठीण काम होते. अनेकदा सूचनांचे पालन करावे लागते. ही झाली ट्रेनची स्टेट्स जाणून घेण्याची माहिती. जर तुम्हाला आता ऑनलाइन जेवण कसे ऑर्डर करायचे आहे. यासंबंधी माहिती करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी याचीही स्टेप बाय स्टेप प्रोसेस माहिती देत आहोत.

हेही वाचा :  तत्काळ तिकीट क्षणात बुक करा; कायम लक्षात ठेवा या Tips आणि Tricks

वाचा:Xiaomi : शाओमीचं फॅन फेस्टिवल, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काऊंट, किंमती वाचून चकित व्हाल!

स्टेप 1:आता तुम्हाला एक नंबर सेव्ह करायचा आहे. हा Zoop चा आहे. WhatsApp चॅटबॉट नंबर +91 7042062070 आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा.
स्टेप 2:WhatsApp मध्ये Zoop चॅटबॉट विंडो ओपन करा.
स्टेप 3:चॅट मध्ये १० अंकाचा पीएनआर नंबर टाका. व आपल्या पुढील अपकमिंग स्टेशनची निवड करा.
स्टेप 4:Zoop चॅटबॉट तुम्हाला निवडण्याची रेस्टॉरेंटचा ऑप्शनची एक लिस्ट देईल. तुम्हाला तुमच्या मन पसंतीचे रेस्टॉरेंट वरून जेवण ऑर्डर करणे आणि नंतर पेमेंट ऑनलाइन करावे लागेल.
स्टेप 5:चॅटबॉट तुम्हाला चॅटबॉटवरून आपल्या जेवणाला ट्रॅक करण्याची सुविधा सुद्धा देते.

वाचाःJio Recharge: २४० रुपयात ८४ दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …