Aadhaar शी Pan Card ला असे करा लिंक, अन्यथा ३१ मार्चनंतर बिनकामाचे होईल

नवी दिल्लीः इन्कम टॅक्स विभागाकडून शनिवारी एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यात म्हटले की, जर पॅन कार्डला आधारशी लिंक केले नाही तर ३१ मार्च नंतर हे बिनकामाचे ठरेल. जर तुम्ही अजूनही आधारशी पॅन कार्डला लिंक केले नसेल तर तात्काळ याला अपडेट करून घ्या. अन्यथा तुमचे पॅन कार्ड उपयोगाचे राहणार नाही. तुम्ही आयटी रिटर्न फाइल करू शकणार नाहीत. तसेच तुम्ही आवश्यक कामाच्या सुविधेचा लाभ सुद्धा मिळवू शकणार नाही. पॅनला आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे. जाणून घ्या डिटेल्स.

पॅनला आधारशी लिंक कसे कराल
Step 1: सर्वात आधी आपल्या बँक कस्टमर केयर सेंटरला कॉल करा.
Step 2: यानंतर कॉल दरम्यान IVR मेन्यू ऑप्शन मध्ये जा. यानंतर राइट मेन्यू ऑप्शनला सिलेक्ट करा.
Step 3: यानंतर कस्टमर केअर एग्झिक्यूटिव्हला कनेक्ट करा.
Step 4: यानंतर एग्झिक्युटिव्हला सांगा की, पॅन कार्डला आधारशी कनेक्ट करायचे आहे.
Step 5: यानंतर आपल्या कस्टमर केअर व्हेरिफिकेशनसाठी काही प्रश्न विचारतील.
Step 6: यानंतर तुम्हाला पॅन कार्ड नंबर सांगावे लागेल.
Step 7: यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट नंबर आणि कन्फर्मेशन कॉल वर मिळेल. पुढील ७ दिवसात पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.

हेही वाचा :  आई होण्यासाठी कोणत्याही लिंगभेदाची गरज नाही, ट्रान्सजेंडर गौरी सावंत अनेक किन्नरांचा आधार

नोटः सर्व बँकांचे बँकिंग किंवा हॉटलाइन IVR ऑप्शन वेगळे असते.

वाचाः 5G मुळे नेपाळ विमान अपघात?, काय आहे 5G C-बँड, जाणून घ्या डिटेल्स

कसे ऑनलाइन कराल पॅनशी आधार कार्ड अपडेट

Step 1: सर्वात आधी incometax.gov.in/iec/foportal वर जा.
Step 2: यानंतर ‘Quick Links’ सेक्शनवर जा. यानंतर स्क्रॉल करा. नंतर लिंक आधार ऑप्शन वर क्लिक करा.
Step 3: नंतर आपले नाव नोंदवा. नंतर मोबाइल नंबर, आधार नंबर आणि पॅन नंबर नोंदवा.
Step 4: यानंतर व्हेरिफिकेशन ऑप्शन वर क्लिक करा.
Step 5: यानंतर कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करा.
Step 6: पुन्हा तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर एक ओटीपी येईल.
Step 7: नंतर काही पेनल्टी भरल्यानंतर पॅनशी आधार कार्ड लिंक केले जाईल.

वाचाः Nothing Phone 1 ला आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करा, २० जानेवारीपर्यंत ऑफर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …