आई होण्यासाठी कोणत्याही लिंगभेदाची गरज नाही, ट्रान्सजेंडर गौरी सावंत अनेक किन्नरांचा आधार

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेन ही ‘ताली’ या चित्रपटात ट्रान्सजेंडर गौरी सावंतची भूमिका साकारणार अशी घोषणा झाली होती. पण अनेकांना किन्नर जमातीमधील Gauri Sawant ही काय सामाजिक कार्य करते याची कल्पनाही नाही. अनेक किन्नरांसाठीच नाही तर सेक्स वर्करच्या मुलीला आपलं मानणं आणि आई म्हणून खऱ्या आयुष्यात अनेक मुलींच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या गौरीचं आयुष्य हे सुरूवातीपासूनच अत्यंत हालाखीचे होते. पण त्यातूनही समाजाने लिंगभेद केला असला तरीही समाजासाठी झटणारी गौरी सावंत म्हणून अनेकांची आई बनली आणि आईचं हे नातं अत्यंत सुंदररित्या कायम निभावलं आहे. (फोटो सौजन्य – @shreegaurisawant Instagram)

​लहानपणीच झाली वेगळं असल्याची जाणीव​

​लहानपणीच झाली वेगळं असल्याची जाणीव​

किन्नर गौरी सावंतचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला. जन्मजात असणारा मुलगा ज्याचे नवा आई-वडिलांनी गणेश ठेवले होते. ७ वर्षांचा गणेश आईच्या निधनाने तुटला होता. आजीच्या सहवासात गणेश मोठा होत होता. मात्र कडक वडिलांना घाबरून जेव्हा आपल्या सेक्सुएलिटीबाबत कळले तेव्हा सांगण्याची हिंमत झाली नाही. शाळेत होणारी मस्करी आणि येणाऱ्या घाणेरड्या कमेंट्स याने अजूनच त्रास होत होता. सर्वांच्या नजरा चुकवून आजीच्या साड्या नेसणे आणि वयात आल्यावर मुलांकडे आकर्षित का होतोय याचा अंदाजच नव्हता.

हेही वाचा :  27 December History: हाहाकार, हजारो मृत्यू... आजचा दिवस सारं जग विसरु शकत नाही, का ते पाहा...

​मराठी कुटुंबात जन्म पण जिवंतीपणीच केले जन्मदात्याने अंतिम संस्कार​

​मराठी कुटुंबात जन्म पण जिवंतीपणीच केले जन्मदात्याने अंतिम संस्कार​

शाळेत गौरी सावंतने परिस्थिती कशीतरी हाताळली मात्र कॉलेजला गेल्यानंतर सर्वच अवघड होऊन बसलं. १४-१५ व्या वयात घरात वडिलांना कळल्यानंतर त्यांनी या गोष्टीचा स्वीकार केला नाही. याचा गणेशला अत्यंत मनस्ताप झाला. त्यामुळे घर सोडून जाण्याशिवाय गणेशला पर्यायच नव्हता. त्यानंतर गणेश नंदनने व्हयाजनाप्लास्टी करून ट्रान्सजेंडर होण्याचा निर्णय घेतला आणि अशा पद्धतीने गणेशचे रूपांतर गौरीमध्ये झाले. पण जिवंतपणीच आपल्यासाठी मुलगा मेला असं म्हणून बापाने अंतिम संस्कार घातल्याने गौरी कधीच विसरली नाही.

​किन्नरांसाठी करू लागली काम​

​किन्नरांसाठी करू लागली काम​

आयुष्यात आपल्याला अनुभव पाहता गौरीने हमसफर ट्रस्टच्या मदतीने स्वतःमध्ये बदल घडवला आणि अडचणींशी सामना करत अनेकांना आधारही दिला. काही लोकांच्या मदतीने ‘सखी चारचौघी ट्रस्ट’ची स्थापना केली. ट्रान्सजेंडरकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलावा यासाठीही गौरीने अनेक प्रयत्न केले. तर ‘टच अँड केअर’च्या जाहिरातीत झळकणारी आणि अक्षरशः आई वाटणारी अशी पहिली तृतीयपंथी म्हणून गौरी झळकली होती.

(वाचा – नणंद आणि भावजयीचे नाते होईल अधिक मैत्रीचे, ईशा-श्लोका अंबानीच्या नात्यातून घ्या प्रेरणा)

​आई होण्यासाठी लिंगभेदाची गरज नसल्याचे केले सिद्ध​

​आई होण्यासाठी लिंगभेदाची गरज नसल्याचे केले सिद्ध​

आई होण्यासाठी केवळ स्त्री म्हणूनच जन्माला यावं लागतं या मान्यतेलाच गौरीने तडा दिला. एका मुलीला सेक्स वर्कर धंद्यातून बाहेर काढत तिला लहानाचे मोठे गौरीने केले. कोणत्याही आईपेक्षा कमी प्रेम अथवा पालनपोषण गौरीने केले नाही. तर सेक्स वर्करची मुलगी असणारी गायत्री आज गौरीची मुलगी म्हणून ओळखली जाते. मुलांना सांभाळण्यासाठी आणि जपण्यासाठी प्रेमाची आणि हिमतीचीही गरज लागते. गायत्री सध्या हॉस्टेलमध्ये राहात असून पुढचे शिक्षण घेत आहे ज्यासाठी गौरीने पुरेपूर प्रयत्न केले आहेत.

हेही वाचा :  Recipe: झणझणीत गावरान मिरचीचा खर्डा; 3 पद्धतीने बनवा अस्सल महाराष्ट्रीय ठेचा

(वाचा – Ramesh Deo Birthday: पहिल्याच भेटीत आवडल्या सीमा देव, योगायोग घडतच गेले आणि लाभली जन्मभराची साथ)

​मुलींसाठी खंबीरपणाने उभी​

​मुलींसाठी खंबीरपणाने उभी​

गौरी सावंत सामाजिक कार्यकर्ती असून अनेक मुलींसाठी खंबीरपणे उभी राहाते. केवळ किन्नर समाजासाठीच नाही तर अनेक पीडित मुली, सेक्स वर्कर्सच्या मुलींना चांगले आयुष्य मिळावे यासाठी गौरीचे प्रयत्न चालू आहेत. गौरीच्या स्वभावामुळे आणि काळजीमुळेच ती अनेकांची आई झाली आहे.

(वाचा – लग्नाआधी १० वर्षे लपतछपत केले बायकोला डेट तर परेलच्या ब्रिजवर केले प्रपोज, अंकुश चौधरी दीपाची फिल्मी लव्ह स्टोरी)

​समाजाचा समज केला दूर ​

​समाजाचा समज केला दूर ​

आई होण्यासाठी खरंच केवळ स्त्री असायला हवं हा समजाचा समजच गौरीने दूर केला आहे. कोणतंही नातं जपण्यासाठी एक उत्तम माणूस असणं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. गौरी सावंतचे कार्यच इतके मोठे आहे की त्यामुळेच तिच्या आयुष्यावर चित्रपटही लवकरच येत आहे.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

Ravindra Waikar :  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी …